logo

Search Here

मेक माय ट्रीप आणि आयबिबोचे विलीनीकरण

मेक माय ट्रीपच्या अंतर्गत आयबिबो विलीनीकरण करण्यात आले आहे.

पर्यटन क्षेत्रातील अग्रेसर कंपनी मेक माय ट्रीप आणि आयबिबो ग्रूप या दोन्ही कंपन्यांचे आता विलीनीकरण झाले आहे. या दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाने या निर्णयाला मंजुरी दिली असून दोन्ही कंपन्या एकत्र झाल्याने ग्राहकांना एकाच ठिकाणी दर्जेदार आणि सर्वोत्तम सुविधा मिळतील अशी आशा व्यक्त होत आहे.
मेक माय ट्रीप आणि आयबिबोचे विलीनीकरण झाल्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली. या विलीनीकरणामुळे आता मेक माय ट्रीप, गो आयबिबो, राईड, राईटस्टे आणि रेडबस या उपकंपन्याही एकत्र येणार आहे. मेक माय ट्रीपच्या अंतर्गत आयबिबो विलीनीकरण करण्यात आले आहे. या सर्व कंपन्यांची २०१६ च्या आर्थिक वर्षातील उलाढाल ३४.१ मिलीयन होती. मेकमाय ट्रीप ही वेबसाईट देशांतर्गत आणि विदेशातील हॉटेलमध्ये बुकींग, खासगी तसेच व्यावसायिक टूरचे नियोजन आणि हवाई तिकीटाची नोंदणी यासाठी आघाडीवर आहे. तर आयबिबोच्या गो आयबिबो आणि रेड बस या वेबसाईट हवाई तिकीटांची नोंदणी तसेच बस प्रवासाची ऑनलाईन नोंदणीसाठी प्रसिद्ध आहेत.
विलिनीकरणानंतर दिप कालरा हे मेक माय ट्रीपचे सीईओ आणि समूह अध्यक्ष तर राजेश मॅगोव हे मेक माय ट्रीपचे भारतातील सीईओ असतील. आयबिबोचे संस्थापक आणि सीईओ आशिष कश्यप हे मेक माय ट्रीपच्या व्यवस्थापकीय मंडळात सामील होतील. ते सहसंस्थापक पदावर असतील. ‘भारतातील पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी पाहता हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे ग्राहकांना आणखी दर्जेदार सुविधा मिळेल अशी आशा आहे. नवीन आणि दर्जेदार टीम आमच्यासोबत येत आहे आणि याचे नेतृत्व करायची संधी मला मिळते यासाठी उत्साहित आहे असे दिप कालरा यांनी सांगितले. तर राजेश मॅगोव यांनीदेखील आयबिबोची आपल्या समुहात स्वागत आहे असे म्हटले आहे. आयबिबोचे संस्थापक आशिष कश्यप म्हणाले, दिप, राजेश आणि मी असे आम्ही तिघेही एकत्र आलो आहोत. दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण झाल्याने आता एक नवीन पर्वाला सुरुवात होईल आणि आम्ही यशाचे नवे शिखर गाठू असे त्यांनी सांगितले. आशिष कश्यप यांनी २००७ मध्ये आयबिबो समुहाची स्थापना केली होती.

Source:-loksatta.com

Image source loksatta.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!