logo

Search Here

भारत रशिया संयुक्तरित्या करणार ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती

नवी दिल्ली, १९ ऑक्टोबर, (हिं.स.) : भारत आणि रशिया संययुक्तरित्या नव्या पीढिच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती करणार आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमतादेखील वाढवण्यात येणार असून ती ६०० किमीपेक्षा अधिक असणार आहे. भारताला एमचीसीआरचे सदस्यत्व मिळाल्यानंतर रशियाने भारताबरोबर या क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी तयारी दर्शवली आहे.

या वर्षी जून महिन्यात भारताला एमटीसीआरचे सदस्यत्व मिळाले होते. मात्र याचे सदस्य असणा-या देशांना सदस्य नसलेल्या देशांना ३०० किमी पेक्षा अधिक मारक क्षमता असलेले क्षेपणास्त्र न विकण्याची आणि निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची मदत न करण्याची अट घालण्यात आली होती. सध्या भारताकडे असलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३०० किमी आहे.

सध्या भारताकडे यापेक्षा अधिक मारक क्षमता असलेली बॅलेस्टीक क्षेपणास्त्रे आहेत. मात्र एखादे विशिष्ट लक्ष्य भेदणे हे ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य आहे.

Source:-lokmat.com

Image Source lokmat.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!