logo

Search Here

भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

भारताने आत्मविश्वासपूर्ण, संयत आणि जोखीम न उठवता सरस खेळ करत इंग्लंडवर ६९-१८ असा दणदणीत

कबड्डी विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यात मंगळवारी भारताने आत्मविश्वासपूर्ण, संयत आणि जोखीम न उठवता कबड्डी विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यात मंगळवारी भारताने आत्मविश्वासपूर्ण, संयत आणि जोखीम न उठवता सरस खेळ करत इंग्लंडवर ६९-१८ असा दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले असून ते ‘अ’ गटात दुसऱ्या स्थानावरच राहतील. अन्य एका लढतीत केनियाने अमेरिकेचा ७४-१९ असा धुव्वा उडवत ‘ब’ गटामध्ये १६ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. या विजयानंतरही थायलंड आणि जपान यांच्यातील सामन्यानंतर केनियाचे उपांत्य फेरीचे भवितव्य ठरेल.

सामन्याच्या पहिल्याच चढाईत कर्णधार अनुप कुमारने संघाला खाते उघडून दिले. त्यानंतर थोडय़ा वेळातच स्थिरस्थावर होत भारताने इंग्लंडच्या केशव गुप्ताची सहाव्या मिनिटाला पकड करत पहिला लोण वसूल केला. त्यानंतर १२व्या मिनिटाला संदीप नरवालने चढाईत दोन खेळाडूंना बाद करत इंग्लंडवर दुसरा लोण चढवला. सामन्याच्या १६व्या आणि २०व्या मिनिटाला लोण चढवत भारताने मध्यंतरापर्यंत ४५-६ अशी मोठी आघाडी घेतली. पहिल्या सत्रात प्रदीप नरवाल आणि अजय ठाकूर यांच्या पकडी प्रभावी ठरल्या, तर सुरजीतने पकडींमध्ये पाच गुण मिळवले. मध्यंतरापर्यंत दमदार आघाडी घेतल्यावर दुसऱ्या सत्रासाठी भारताने संघात चार बदल केले.

मध्यंतराला मिळवलेल्या दमदार आघाडीच्या जोरावर भारताने उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले होते. त्यामुळे दुसऱ्या सत्रात भारताने कोणीतीही जोखीम न उचलता सावध खेळ केला. सामन्याच्या २८व्या मिनिटाला भारताने पाचवा लोण चढवला. दुसऱ्या सत्रात भारताला फक्त २४  गुणांची कमाई करता आली, तर इंग्लंडने दहा गुण कमावले.

दुसऱ्या लढतीत केनियाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत अमेरिकेवर अंकुश ठेवला. या सामन्यात केनियाने अमेरिकेवर दोन्ही सत्रात प्रत्येकी तीन असे एकूण सहा लोण चढवले. केनियाचा कर्णधार डेव्हिड मोसमबाईने चढाईमध्ये १२ गुण कमावले, तर जेम्स ओबिलोने पकडींमध्ये सात गुण मिळवले आणि सामन्यात सर्वोत्तम बचावपटूचा मान मिळवला.

थायलंड-जपान सामन्यावर उपांत्य फेरीचे भवितव्य

कबड्डी विश्वचषकामध्ये बुधवारी रंगणारा थायलंड आणि जपान यांच्यातील अखेरचा साखळी सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यावर उपांत्य फेरीचे भवितव्य अवलंबून असेल.

बुधवारचा सामना जर थायलंडने जिंकला तर ते ‘ब’ गटामध्ये अव्वल स्थानावर पोहोचतील आणि त्यांना उपांत्य फेरीत भारताचा सामना करावा लागेल. थायलंडने विजय मिळवल्यावर जपान आणि केनिया यांच्यासाठी उपांत्य फेरीचे दरवाजे बंद होतील. पण हा सामना जर जपानने जिंकला तर ‘ब’ गटामध्ये इराण पहिल्या क्रमांकावर राहील आणि उपांत्य फेरीत इराणला भारताशी दोन हात करावे लागतील. त्याचबरोबर जपानने हा सामना जिंकला तर त्यांच्यामध्ये आणि केनिया यांच्यामध्ये गुणांच्या जोरावर जो संघ सरस ठरेल तो उपांत्य फेरीत जाईल, त्यांना उपांत्य फेरीत कोरियाचा सामना करावा लागेल.

Source:-loksatta.com

Image Source loksatta.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!