logo

Search Here

जिओ म्हणजे व्यावसायिक निर्णय, जुगार नाही : मुकेश अंबानी

मुंबई, दि. 19 - रिलायन्स जिओची ऑफर म्हणजे विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे, त्याला जुगार समजू नये, अशा शब्दात रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी उत्तर दिले आहे.
रिलायन्सने दिलेल्या या ऑफरमधून कंपनीला कसा फायदा होत असेल, ऑफर संपल्यानंतर काय, असा प्रश्‍न अनेकांना सतावतो. त्यावर मुकेश अंबानींनी रोखठोक उत्तरे दिली. कार्यक्रम 'ऑफ दी कफ'मध्ये ते बोलत होते. रिलायन्स जिओ म्हणजे विचारपूर्वक तयार करण्यात आलेला निर्णय आहे. यासाठी कंपनीने 2 लाख 50 हजार कोटींची गुतंवणूक केली आहे, असे अंबानी यांनी सांगितले आहे.

 
Source:-lokmat.com
Image Source lokmat.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!