logo

Search Here

भारतीय हवाईदलाचे हेलिकॉप्टर तिबेट सीमेजवळ कोसळले

लष्कराच्या सरावादरम्यान उड्डाण घेताना हे हेलिकॉप्टर कोसळले.

भारतीय हवाईदलाचे एक हेलिकॉप्टर बुधवारी (दि. १९) उत्तराखंड येथे कोसळले. उत्तराखंड येथील माना पास भागात भारत-तिबेट सीमारेषेजवळ एमआय १७ हेलिकॉप्टर कोसळले. लष्कराच्या सरावादरम्यान उड्डाण घेताना हे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरचे नुकसान झाले असले तरी यात कोणी जखमी नसल्याचे समजते. हेलिकॉप्टरमधील सर्व जवान सुरक्षित असल्याचे वृत्त आहे. हेलिकॉप्टरने उड्डाण करताच पेट घेतला होता.
कुमाव्ह रेजिमेंटच्या सरावात हे हेलिकॉप्टर सहभागी झाले होते. उत्तराखंड येथील माना पास आणि बद्रीनाथ येथील घस्तोली हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. या हेलिकॉप्टरमध्ये किती जण होते याची माहिती समजू शकलेली नाही. हेलिकॉप्टरने उड्डाण करताच काही क्षणातच ते कोसळले. 

Source:-loksatta.com

Image Source loksatta.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!