logo

Search Here

ब्लॉक झालेले एसबीआयचे कार्ड कसे करावे सुरू ?

मात्र ब्लॉक झालेल्या कार्डसाठी पुन्हा अर्ज करता येऊ शकतो.

मुंबई: एसबीआय म्हणजेच स्टेट बॅंक ऑफ इंडियाने दिवाळीच्या तोंडावर आपल्या ग्राहकांना मोठी धक्कादायक बातमी दिली. एसबीआयने सुरक्षेच्या कारणास्तव तब्बल ६ लाख ग्राहकांचे डेबिट कार्ड ब्लॉक केले. त्यामुळे अनेकांना मनस्ताप झाला. कुणालाही याची पुर्वमाहिती न दिल्याने अनेकांना नेमकं काय झालं हे कळालंच नाही. त्यामुळे अनेकजन संभ्रमात होते. आता नेमकं काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र ब्लॉक झालेल्या कार्डसाठी पुन्हा अर्ज करता येऊ शकतो.

* कार्ड कसे सुरू करावे:

एटीएम कार्ड ब्लॉक केल्यानंतर आता एसबीआयकडून ग्राहकांना नवीन कार्ड देण्यात येणार आहेत. यासाठी ग्राहकांना आपल्या बँक शाखेत जाऊन अर्ज करावा लागणार आहे. बँकेकडून ग्राहकांना फॉर्म दिला जाईल. त्या फॉर्मवर बँक खात्याशी संबंधित सर्व माहितीचा तपशील द्यावा लागेल. फॉर्म भरताना आधार कार्ड किंवा पॅन कार्ड अशी कागदपत्र जवळ असणं गरजेचं आहे.

* बँकेकडून पासवर्ड बदलण्याचं आवाहन

एटीएमच्या गैरव्यवहारापासून सुरक्षित राहण्यासाठी ग्राहकांनी पासवर्ड बदलावे, असं आवाहन बँकेकडून करण्यात आलं आहे. कुणाचा पासवर्ड किंवा कसलीही माहिती हॅक झाली असल्यास पासवर्ड बदलल्यामुळे गैरव्यवहार रोखता येऊ शकतात.

Source:-India.com

Image Source India.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!