logo

Search Here

परकीय चलन छपाई शेंद्रे बीडकॉन औद्योगिक वसाहतीत होणार

रो, डॉलर्स अशा परकीय चलनाची छपाई करणारी फ्रान्सची जगप्रसिद्ध डे ला रू कंपनी मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत त्यांची सिक्युरिटी प्रेस औरंगाबादेतील औद्योगिक वसाहतीत सुरू करणार असल्याचे उद्येाग विभागातील सूत्रांकडून समजते. यासाठी महाराष्ट्र शासनाने कंपनीला १० एकर जागा दिली असून कंपनीने या उपक्रमात ३०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. सिक्युरिटी प्रेस भारतात आणणारी डे ला रू ही पहिलीच परदेशी कंपनी आहे. महाराष्ट्रासाठीही ही गुंतवणूक महत्त्वाची ठरली आहे.

ही कंपनी परकीय चलनासोबतच परदेशी स्टँपपेपर, सर्टिफिकेटस, पासपोर्ट, विविध बँकांचे धनादेश, सरकारी दस्ताऐवज यांचीही छपाई येथे करणार आहे. भारतीय चलनाची छपाई करण्यासाठीही कंपनीकडून प्रयत्न सुरू असून त्यासाठी रिझव्हॅ बँकेसोबत चर्चा सुरू झाली असल्याचेही समजते. या प्रेसमुळे किमान २०० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

 
 
Source:-majhapaper.com
Image Source majhapaper.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!