logo

Search Here

हिंदुस्थानमधील ३२ लाख एटीएम ग्राहकांच्या माहितीची चोरी, ६ लाख कार्ड ब्लॉक

स्टेट बँकेसह देशातील विविध बँकांतील ३२ लाख ग्राहकांच्या एटीएम कार्डांची महत्त्वाची चोरली गेली आहे. एटीएमच्या यंत्रणेत शिरलेल्या मालवेअरमुळे हा प्रकार झाला आहे. या चोरीची सुरुवात नेमकी कुठून झाली हे अद्याप लक्षात आले नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून स्टेट बँकेने सहा लाख कार्ड ब्लॉक केली आहेत.

एटीएम अथवा एटीएम कम डेबिट कार्डांच्या माहितीची चोरी झाली आहे. या संदर्भात तपास सुरू आहे. संबंधित ग्राहकांना नवीन कार्ड देणार असल्याचे स्टेट बँकेने जाहीर केले आहे.

 
ज्यांची कार्ड ब्लॉक केली आहेत ते ग्राहक इंटरनेट बँकिंग अथवा फोन बँकिंगच्या माध्यमातून किंवा परंपरागत पद्धतीने आर्थिक व्यवहार करू शकतात. ग्राहकांना त्यांचे कार्ड ब्लॉक केल्याचे तसेच पुढील प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करणारे इ-मेल आणि एसएमएस केले असल्याचे स्टेट बँकेने सांगितले आहे. अन्य बँकाही सुरक्षिततेसाठी स्टेट बँकेचे अनुकरण करण्याची शक्यता आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्डांच्या माहिती चोरी प्रकरणी एका खासगी कंपनीच्या पेमेंट सर्व्हिस स्टिस्टिमशी संबंधित एटीएमची तपासणी तज्ज्ञांमार्फत सुरू आहे.

Source:-lokmat.com

Image Source lokmat.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!