logo

Search Here

एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, येस, अ‍ॅक्सिसची 32 लाख -डेबिट कार्ड करप्ट

मुंबई, दि. 20 - एसबीआयच्या सहा लाखांहून जास्त डेबिट कार्डधारकांची कार्ड्स ब्लॉक केली असतानाच आता इतर बँकांच्या ग्राहकांची ई-सुरक्षाही धोक्यात आली आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय, येस आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या सुमारे 32 लाख ग्राहकांची कार्ड्स करप्ट झाल्याची माहिती आहे.
संबंधित बँकांच्या ग्राहकांना कार्ड रिप्लेस करण्याच्या किंवा सिक्युरिटी कोड (पिन नंबर) बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुमारे 32 लाख डेबिट कार्डधारकांची सुरक्षा धोक्यात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. चीनमधल्या काही ठिकाणांहून आपल्या बँक खात्यात व्यवहार झाल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली आहे. त्यानंतर तातडीने ही पावले उचलण्यात येत आहेत.

हिताची पेमेंट सर्व्हिसेसच्या सिस्टममधून मालवेअर आल्याने खासगी माहिती चोरुन फसवणूक होण्याची भीती आहे. या प्रकरणी फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Source:-lokmat.com

Image Source lokmat.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!