logo

Search Here

नवज्योत सिद्धू यांना उपमुख्यमंत्रीपद देणार?

विधानसभा निवडणुकीद्वारे पंजाबची सत्ता पुन्हा हाती मिळवण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोचेर्बांधणी सुरू केली असून, खासदारकीचा राजीनामा देत, भाजपामधून बाहेर नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी पक्षात प्रवेश करावा, यासाठी प्रयत्न चालविले आहे. ते काँग्रेसमध्ये आल्यास त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास काँग्रेस तयार आहे.

भाजपामधून बाहेर पडल्यानंतर आप वा काँग्रेसमध्ये न जाता सिद्धू यांनी दोन्ही पक्षांवर टीका चढवत, स्वत:ची संघटना स्थापन केली. मात्र नंतर त्यांनी काँग्रेसशी समझोता करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यास सिद्धू यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे समजते. सिद्धू यांच्या निकटवर्तीयांनीच ही माहिती दिली. काँग्रेस नेत्यांनीही सिद्धू यांना अशी आॅफर दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सिद्धू यांनी काँग्रेसकडून आलेल्या प्रस्तावावर विचार करण्यास काही दिवसांची मुदत मागितल्याची समजत आहे. (वृत्तसंस्था)

सत्ता मिळण्याची चिन्हे

सिद्धूच्या काँग्रेस प्रवेशाबाबत पंजाबमधील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग फारसे उत्साही नाहीत. काँग्रेसमध्ये यायचे असेल, तर त्यांनी नव्याने स्थापन केलेली 'आवाज-ए-पंजाब' संघटना काँग्रेसमध्ये विलीन करावा लागेल, अशी अट त्यांनी घातली. दहा वर्षे सत्तेबाहेर राहिल्यानंतर काँग्रेसला सत्ता मिळण्याची चिन्हे आहेत. जनमत चाचणीमध्ये काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Source:-lokmat.com

Image Source lokmat.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!