logo

Search Here

मुकेश अंबानींची संपत्ती इस्टोनियाच्या जीडीपीइतकी

गेल्या नऊ वर्षांपासून भारतातील सर्वाधिक श्रीमंत; 22 अब्ज डॉलरची संपत्ती
नवी दिल्ली - प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी हे गेल्या नऊ वर्षांपासून भारतातील नंबर वनचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असून, सध्या त्यांची एकूण संपत्ती 22.7 अब्ज डॉलर इतकी झालेली आहे. ही संपत्ती युरोपातील विकसित देश म्हणविणाऱ्या इस्टोनियाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाइतकी (जीडीपी) झाली आहे, असे फोर्ब्स इंडिया या नियतकालिकामध्ये नमूद करण्यात आले.

फोर्ब्समध्ये नमूद केल्यानुसार अझीम प्रेमजी यांची संपत्तीही एका देशाच्या जीडीपीइतकी झाली आहे. प्रेमजी यांची एकूण संपत्ती 15 अब्ज डॉलर असून, मोझांबिक या आफ्रिकन देशाचा जीडीपी 14.7 अब्ज डॉलर इतका आहे. भारतातील श्रीमंतांच्या यादीमध्ये प्रेमजी सध्या चौथ्या स्थानावर आहेत. सन फार्मा समूहाचे दिलीप संघवी हे भारतीय श्रीमंतांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे 16.9 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. हिंदुजा कुटुंब भारतीय श्रीमंताच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून, त्यांच्याकडे 15.2 अब्ज डॉलरची संपत्ती आहे.

पालनजी मिस्त्री हे भारतातील पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले असून, त्यांच्याकडे 13.90 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. भारतातील पहिल्या पाच श्रीमंतांची एकूण संपत्ती 83.7 अब्ज डॉलर असून, ही मंगळयान मोहिमेसाठीच्या खर्चापेक्षा अधिक आहे. याचसोबत रिओ ऑलिंपिकच्या एकिूण खर्चाच्या 18 पटीने जास्त आहे.
भारतातील पहिल्या दहा श्रीमंतांमधून फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन आणि बिन्नी बन्सल बाहेर फेकले आहेत, तर नवउद्योजक तौरकीय बंधू आणि आचार्य बालकृष्ण यांनी या यादीत प्रवेश केला आहे.

फोर्ब्स इंडियाने भारतीय श्रीमंतांची प्रसिद्ध केलेली यादी ही भारतीय उद्योग सशक्त होत असल्याचे सांगते. अतिश्रीमंतांच्या गटामध्ये प्रवेश करण्याच्या संपत्तीची पात्रताही 2.25 अब्ज डॉलरवर पोचली आहे. यामध्ये आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे तरुण उद्योजकांचे या यादीत स्थान वाढत आहे.
Source:-esakal.com

Image Source esakal.com

 

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!