logo

Search Here

४ जी वेगाबाबतीत जिओ चौथ्या स्थानावर; ट्रायची माहिती

मुंबई, २१ ऑक्टोबर, (हिं.स.) :४ जी सेवेसाठी देण्यात येणा-या वेगाच्या यादीत रिलायन्स जिओ चौथ्या स्थानावर असल्याची माहिती दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. एअरटेल, व्होडाफोन, आयडिया सेल्युलर आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स या नेटवर्कवर मिळणार ४ जी सेवेचा वेग हा रिलायन्स जिओकडून पुरवण्यात येणा-या ४ जी सेवेच्या वेगापेक्षा अधिक असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. ट्रायने दिलेल्या माहितीनुसार ४ जी सेवा पुरवणा-या कंपन्यांमध्ये ४ जी सेवेचा सर्वाधित ११.७ एमबीपीएसचा वेग भारती एअरटेल देतअसल्याची माहिती मिळाली आहे, तर दुस-या क्रमाकांकावर रिलायन्स कम्य़ुनिकेशन्सचा क्रमांक लागतो.

रिलायन्स जिओच्या अभियंत्यांनी ट्रायकडून करण्यात आलेल्या चाचणीचे निकाल मानण्यास असमर्थता दर्शवली आहेत. हे सर्व निकाल पक्षपाती असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

Source:-lokmat.com

Image Source lokmat.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!