logo

Search Here

ए दिल..ची 'मुश्किल' संपली; राज ठाकरे यांचा हिरवा कंदील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फोन आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'ए दिल है मुश्कील' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला आहे.

चित्रपटाच्या प्रत्येक खेळाच्यावेळी उरी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहिली जावी. पाकिस्तानी कलाकारांना पुन्हा चित्रपटात घेणार नाही असे लिहून द्यावे आणि लष्कराच्या कल्याण निधीमध्ये (आर्मी वेल्फेअर फंड) पाच कोटी रुपये जमा करावेत अशी अट घालून चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी देत असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले.

पाकडे हिंदुस्थानमध्ये दहशतवादी हल्ले करत असताना पाकिस्तानी कलाकार फवाद खान याला घेऊन निर्माता करण जोहरने 'ए दिल है मुश्कील' या चित्रपटाची निर्मिती केली.

या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आंदोलने सुरू झाली होती. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्याची माणुसकी दाखवण्याऐवजी फवाद खान फक्त व्यावसायिक विचार करुन हिंदुस्थानी निर्मात्याकडून पैसे घेतो आहे. अशा स्वार्थी कलाकाराचा चित्रपट हिंदुस्थानात दाखवला जाऊ नये अशी भूमिका घेण्यात आली होती. मात्र निर्माता करण जोहर आणि हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेने केंद्र आणि राज्य सरकारशी चर्चा करुन मार्ग काढण्याची विनंती केली होती. अखेर मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला.

Source:-lokmat.com

Image Source lokmat.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!