logo

Search Here

डेबिट, क्रेडिट कार्डद्वारेही भरता येईल 'जीएसटी'!

इंदोर : जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू झाल्यानंतर तो आॅनलाइन भरण्याची सुविधा राहिल. डेबिट, के्रडिट कार्डद्वारेही जीएसटी भरता येईल, अशी माहिती महसूल सचिव हसमुख अधिया यांनी येथे दिली.

येथे जागतिक गुुंतवणूकदारांच्या एका संमेलनात बोलताना हसमुख अधिया म्हणाले की, '१ एप्रिलपासून जीएसटीची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे नोंदणी, परतावा आणि पेमेंट हे आॅनलाइन करता येईल. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनइएफटी), रिअल टाइम ग्रॉस सेटलमेन्ट सीस्टिम (आरटीजीएस) या प्रकारात पेमेंट करता येईल. डेबिट आणि के्रडिट कार्डद्वारेही हे पेमेंट करता येईल.'

'हे पैसे भरण्यासाठी सरकारी बँकातच खाते असण्याची किंवा नवे खाते उघडण्याची गरज भासणार नाही. तुमचे जर खासगी बँकेत खाते असेल, तर त्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करता येतील. व्यापारी आणि उद्योग जगतासाठी ही पद्धती अतिशय सुटसुटीत असणार आहे. या माध्यमातून संपूर्ण देश एकच बाजारपेठ बनून जाईल. त्यामुळे ही करप्रणाली अतिशय सोपी बनेल. भारतात आज अनेक सुधारणा, उपाय केले जात आहेत आणि जीएसटी ही स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी कर सुधारणा आहे,' असेही ते म्हणाले.

येत्या एप्रिल महिन्यापासून जीएसटी लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. जीएसटी भरण्यासाठी त्याची नोंदणी, रिफंड, रिटर्न फाइल करण्याची व्यवस्था आणि कर भरण्याची व्यवस्था आॅनलाइन असणार आहे.

पेट्रोलियम पदार्थांवर जीएसटी?

पेट्रोलियम पदार्थांवर जीएसटी आकारायचा किं वा नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही, पण अनेक राज्यांत या उत्पादनांच्या दरात एकरूपता आणण्यास उद्योग जगाताचे म्हणणे आहे की, याला जीएसटीच्या कक्षेत आणले जावे, असे मत पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी येथे व्यक्त केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Source:-lokmat.com

Image Source lokmat.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!