logo

Search Here

सायरस मिस्त्री यांच्या गच्छंतीनंतर टाटा समुहाच्या समभागात घसरण

मुंबई, २५ ऑक्टोबर, (हिं.स.) : चार वर्षांपूर्वी टाटा समूहाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतर त्याचे परिणाम शेअर बाजारावर पडलेले दिसले. आज बाजार उघडताच टाटा समुहाच्या प्रमुख कंपन्यांच्या समभागात तीन ते पाच टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून आले. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टीसीएस, टाटा कम्युनिकेशन्स, टाटा बेव्हरेज व टाटा पॉवर या कंपन्यांच्या समभागात घसरण झाली आहे.मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकातही घसरण आली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १३.५३ अंकांच्या घसरणीसह २८,१६५.५५ अंकांवर उघडला. हिंदुस्थान समाचार / हरिता पुराणिक / चंद्रहास मिरासदार

Source:-lokmat.com

Image Source lokmat.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!