logo

Search Here

टाटा समूहाचे अध्यक्ष मिस्त्री यांना हटवले

मुंबई- टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सोमवारी सायरस मिस्त्री यांना हटविण्यात आले. रतन टाटा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2012 मध्ये सायरस मिस्त्री यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती.

चार महिन्यात टाटा समूहाचा नवा अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. त्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती नव्या अध्यक्षाचा शोध घेणार आहे. रतन टाटा 28 डिसेंबर 2012 रोजी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या जागी संचालक मंडळाने सायरस मिस्त्री यांची नियुक्ती केली होती. 2006 पासून सायरस मिस्त्री टाटा सन्सचे संचालक होते. नोव्हेंबर 2012 मध्ये ते या कंपनीचे उपाध्यक्ष झाले होते.

काही दिवसांपूर्वीच सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहातील कर्मचार्‍यांशी वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला होता. समूहाच्या खडतर काळात चपळता आणि धिटाई अंगी बाणवणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी कर्मचार्‍यांना केले होते.

Source:-lokmat.com

Image Source lokmat.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!