logo

Search Here

नेते उदार झाले! पाचशे, हजाराच्या नोटांचे कर्जवाटप केले

 
नवी दिल्ली, दि. 10 -  काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यापासून काळा पैसा असलेल्यांची पळापळ सुरू झाली आहे. आपल्याकडील काळे धन लपवण्यासाठी त्यांनी विविध क्लुप्त्या योजण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटकमधील कोल्लार येथे एका स्थानिक नेत्याने चक्क गावात कर्ज मेळावा आयोजित करून ग्रामस्थांना कर्जवाटप केले आहे. 
या कर्जमेळाव्यात नागरिकांना प्रत्येकी तीन तीन लाख रुपये कर्जाऊ देण्यात आले. मात्र कर्ज घेणाऱ्यांना हे पैसे नव्या नोटांच्या स्वरूपात परत करावे लागणार आहेत. न्यूज 24 या हिंदी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर हे वृत्त प्रसारित झाले आहे. दरम्यान, देशाच्या इतर भागातही अशा अवैध पद्धतीने कर्जवाटप करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. 
 
Source - lokmat.com
Image Source - lokmat.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!