logo

Search Here

जगदीश कुलकर्णी

श्री. जगदीश कुलकर्णी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (वाय्‌.सी.एम्.) येथे चित्रफीत निर्मिती /व्हिडिओ प्रॉडक्शन या क्षेत्रात गेली वीस वर्षे कार्यरत आहेत. यात ते ध्वनिमुद्रण, दृष्यमिश्रण, संपादन, दिग्दर्शन, तांत्रिक बाबी, स्पेशल इफेक्ट्स, लाइटिंग असे विविध विषय हाताळतात.

श्री. जगदीश कुलकर्णी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (वाय्‌.सी.एम्.) येथे चित्रफीत निर्मिती /व्हिडिओ प्रॉडक्शन या क्षेत्रात गेली वीस वर्षे कार्यरत आहेत. यात ते ध्वनिमुद्रण, दृष्यमिश्रण, संपादन, दिग्दर्शन, तांत्रिक बाबी, स्पेशल इफेक्ट्स, लाइटिंग असे विविध विषय हाताळतात.शाळा-कॉलेजमधे असल्यापासूनच जगदीश यांना 'थिएटर' ची आवड होती त्यामुळे त्यातील अ‍ॅक्टिव्हिटीज मधे ते सहभागी असत. दूरदर्शन हे क्षेत्र विशेषत: तेथील दिग्दर्शन व लिखाण यात त्यांना विशेष रस होता.

बी. एस्‌. सी. (इलेक्ट्रॉनिक्स) झाल्यावर त्यांनी फिल्म अँड व्हिडिओ प्रॉडक्शन मधील अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतले. यात- पुण्याची फिल्म इंस्टिट्युट, एस.आय.ई.टी., ई.एम.आर.सी., दिल्लीची इग्नु या मान्यवर संस्था तसेच प्रामुख्याने मुंबई दूरदर्शन येथील अभ्यासक्रम होते. ई.एम.आर.सी. मधे ट्रेनी टेक्नीशियन म्हणून दोन वर्षे काम करताना त्यांना टी.व्ही.-निर्मिती आणि मिडिया या क्षेत्रातील प्राथमिक ज्ञान मिळाले.

येथे दूरदर्शनवरील शैक्षणिक कार्यक्रमांची (कंट्रीवाइड क्लासरूम) निर्मिती त्यांनी केली. हॉंगकॉंग येथे त्यंनी (स्टार टी.व्ही तर्फे) अ‍ॅडव्हान्स्ड एडिटिंग सिस्टीम- मिडिया या विषयातील प्रशिक्षण घेतले.पर्यावरण हा हल्ली शाळा, कॉलेज मधे सक्तीचा विषय; पण तो शिकवण्यासाठी प्रशिक्षित शिक्षक असतीलच असे नाही. तेव्हा वाय्‌.सी.एम्‌. ने पर्यावरण जागृती या विषयावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी फिल्म्स करण्याचे ठरवले.

कुलगुरू डॉ. राजन वेळूकरांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू झाला. श्री. जगदीश कुलकर्णी यांनी या उपक्रमाअंतर्गत सतरा इंग्रजी आणि तेरा मराठी अशा तीस चित्रफितींची मालिका केली.विशेष तज्ञांनी त्यासाठी सहकार्य केले, व्याख्याने दिली; जसे- सुंदरलालजी बहुगुणा, दिलीप कुलकर्णी, प्रसाद सेवेकरी, डॉ. माधव चितळे, डॉ. आनंद कर्वे, डॉ. माधव खांडेकर, डॉ. सोनटक्के, डॉ. प्रवीण सप्तर्षी इत्यादी.

यातील दोन फिल्म्स - ' डिस्कव्हरी ऑफ गॉडस् ' आणि 'अ शॉर्ट स्टोरी ऑफ वॉटर' या दिल्लीतील 'वातावरण' या राष्ट्रीय व फ्लोरिडा येथील आंतरराष्ट्रीय चित्र महोत्सवात दाखवल्या गेल्या. फ्लोरिडा येथे त्यांची स्पेशल फिल्म्स म्हणून निवड झाली. पॅरिस व कोरिया येथील फिल्म महोत्सवात 'अ शॉर्ट स्टोरी ऑफ वॉटर' ला नॉमिनेशन्स मिळाली. तर फिनलंड येथील वासा फिल्म महोत्सवात याच फिल्मला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ते स्वीकारण्यासाठी ते फिनलंडला गेले. त्यावेळी तिथे वन्यजीवन व पर्यावरणविषयक अनेक चित्रीकरणे व कार्यशाळांमधे त्यांनी भाग घेतला.

तसेच तेथील 'टेरानोवा नेचर सेंटर' च्या सहकार्याने 'अनदर इनकन्व्हिनियंट ट्रुथ ' ही फिल्म त्यांनी बनवली. शिवाय इको-डेट या संकल्पनेवर आधारित आणखी काही लघुपटही बनवले. हे सर्व लघुपट पॅरिसच्या ई.एम.एस. पॅरिस इव्हेंटमेधे तसेच जगातील विविध फिल्म महोत्सवांमधे दाखवले गेले.अर्मेनियातील 'सनचाइल्ड फिल्म फेस्टिव्हल' मधे 'अनदर इनकन्व्हिनियंट ट्रुथ ' ला नॉमिनेशन मिळाले होते. महाविद्यालयीन विद्यार्थी गेली चार वर्षे या चित्रफितींचा वापर पर्यावरण अभ्यासक्रमासाठी करत आहेत.

वसुंधरा चित्र-महोत्सवात श्री.जगदीश कुलकर्णी यांच्या या कामास मान्यता मिळाली असून ऑगस्ट २००९ मधे 'वसुंधरा मित्र' (फिल्ममेकर्स) हा पुरस्कार त्यांना मिळाला.जगदीश कुलकर्णी यांचे वास्तव्य नाशिकमधे असून तिथे त्यांचा स्वत:चा सुसज्ज स्टुडिओ आहे. नाशिक येथील पर्यावरण चळवळीमधे ‌त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
त्यासाठी वेबसाइट--http://sanskrutivaibhav.org/environment.html

जगदीश ' संस्कृतीवैभव ' चे जॉइंट सेक्रेटरी आहेत. या संस्थेतर्फे ते अनेक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवतात. येथे एक खास पर्यावरण विभाग त्यांनी सुरू केला आहे.त्यांच्या आतापर्यंतच्या पर्यावरणविषयक फिल्म्स तरुणांसाठी असल्या तरी लहान मुलांसाठीही बनवायचा त्यांचा मानस आहे.

नाशिकच्या के.टी.एच.एम. कॉलेजमधे आणि पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठामधे मिडिया कोर्सेसचे ते गेस्ट लेक्चरर आहेत.श्री.जगदीश कुलकर्णी यांनी आतापर्यंत वाय्‌.सी.एम्‌.च्या उपक्रमाव्यतिरिक्त इतरही काम भरपूर केले आहे.: पाचशे व्हिडिओ/टी.व्ही. कार्यक्रम व डॉक्युमेंटरीज, पाचशे चित्रफिती जाहिरातींसाठी, आठ टी.व्ही.
सिरियल्सचे दिग्दर्शन व एडिटिंग. त्यातील काही असे-

* सचिन ट्रॅव्हल्स साठी भारतातील अनेक प्रेक् पुढे वाचा

मनोरंजन व कला > चित्रफीत निर्मिती,

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!