logo

Search Here

कट्यारीचा आवाज राहुल देशपांडे

संगीत रंगभूमी किंवा संगीत नाटक हा मराठी मनाचा हळवा कोपरा आहे, आत्ता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बालगंधर्व चित्रपटाने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.या चित्रपटात युवा कलाकार श्री. राहुल देशपांडे यांनी केशवराव भोसले यांची भूमिका अतिशय समर्थपणे साकारली आहे.संगीत रंगभूमी राहुलजींच्या रक्तातच आहे..त्यांचे आजोबा पं वसंतराव देशपांडे हे संगीत रंगभूमीवरचे नावाजलेले व्यक्तिमत्व. श्री. राहुल देशपांडे यांनी आजोबांच्या गायकीचा वारसा समर्थपणे पेलला आहे.

संगीत रंगभूमी किंवा संगीत नाटक हा मराठी मनाचा हळवा कोपरा आहे, आत्ता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बालगंधर्व चित्रपटाने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.या चित्रपटात युवा कलाकार श्री. राहुल देशपांडे यांनी केशवराव भोसले यांची भूमिका अतिशय समर्थपणे साकारली आहे.संगीत रंगभूमी राहुलजींच्या रक्तातच आहे..त्यांचे आजोबा पं वसंतराव देशपांडे हे संगीत रंगभूमीवरचे नावाजलेले व्यक्तिमत्व. श्री. राहुल देशपांडे यांनी आजोबांच्या गायकीचा वारसा समर्थपणे पेलला आहे.

राहुलजींवर संगीताचे संस्कार जन्मापासूनच जरी होत असले तरी खरा संगीतप्रवास वयाच्या सहाव्या वर्षापासून सुरु झाला.सहाव्या वर्षापासून पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे पठडीबाज तालमीला सुरुवात झाली. सुरुवातीला सगळ्या मुलांना शास्त्रीय संगीताचा कंटाळा असतो तसा राहुलजींना ही होता.त्यावेळी आई-वडील पाठवतात म्हणून क्लासला जायचे असे चालले होते. नंतर गाण्याचा कंटाळा आला म्हणून त्त्यांनी एक वर्ष गाण बंद ठेवले. त्याच सुमारास १९९२ साली कुमार गंधर्वांचे निधन झाले आणि त्यानंतर दोनच महिन्यांनी राहुलजींच्या वडीलांनी इंदौरहून कुमारजींच्या भजनाची कॅसेट आणली.एक दिवस घरातले सगळे बाहेर गेले असताना काहीच काम नाही म्हणून राहुलजींनी कॅसेट लावली आणि त्या सुरांनी त्यांना अक्षरशः झपाटून टाकले. दोन दिवसात त्यांनी सगळी भजनं पाठ केली. त्यावेळी पहिल्यांदाच कुमारांच्या गायकी बद्द्ल ओढा त्यांच्या मनात निर्माण झाला.

त्यानंतर उषाताई चिपलकट्टी यांच्याकडे सहा वर्ष शिकायला मिळाले. उषाताईंकडचे शिक्षण आव्हानात्मक होते. विचार तयार करणे हे उषाताईंकडे घडले आणि बुध्दी तयार झाली. त्यानंतर मुकुल शिवपुत्र यांच्याकडे सहा-सात वर्ष शिकायचा योग आला. तिथला अनुभव फ़ारच निराळा होता. ज्याला दिशा देणं म्हणतो ते तिथे झाले. सुरांकडे, रागांकडे बघण्याचा दृष्टीकोन मुकुल शिवपुत्रांनी दिला. राहुलजींच्या मते गुरुंकडे शिकत असताना काय घेतलं हे सांगता येत नाही पण जे मिळतं तो एक अनुभव असतो आणि तो अतिशय व्यक्तिगत असतो. पिंपळखरेबुवांकडे शिकताना पठडीबाज तालमीचा कंटाळा यायचा पण नंतर लक्षात आले की आपण जे काही शिकलो त्यावरच आपण उभे आहोत. आपल्या सांगितीक जीवनात सर्वच गुरुंचे खूप महत्वाचे योगदान आहे असे ते मानतात.

गेली अनेक वर्षे ते वसंतोत्सव हया कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. त्यामागची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की त्यांचे वडील दरवर्षी वसंतरावांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कार्यक्रम करायचे. वसंतरावांवर प्रेम करणारे कुमार गंधर्व, भीमसेन, वीणाताई, अभिषेकी असे अनेक कलाकार त्यात गाऊन गेले होते. २५ वर्षे झाल्यावर वडीलांनी सांगितले की मी आता निवृत्त होत आहे. यापुढे तू तुला पाहिजे त्या पध्दतीने कार्यक्रम कर. वसंतरावांचे जसे व्यक्तिमत्व होते त्याला साजेसाच कार्यक्रम व्हावा असे राहुलजींना वाटत होते. नाना पाटेकर आणि वसंतरावांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे राहुलजी पाटेकरांना भेटले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करण्याचा प्रस्ताव पाटेकरांनी लगेच स्वीकारला आणि कायम पाठीशी उभे राहिले. वसंतराव गझल गायचे चित्रपटातही गाणी त्यांनी गायली आहेत.

शास्त्रीय,ठुमरी, नाट्यसंगीत तर ते गायचेच पण लावणीही उत्तम सादर करायचे. पाश्चात्य आणि दक्षिण भारतीय संगीताचाही त्यांचा अभ्यास होता. ते नृत्य शिकले होते. उत्तम अदा करायचे. त्यामुळे राहुलजींनी ठरविले की अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वाच्या स्मृतीप्रीत्यर्थ फ़क्त शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम न करता सर्व प्रकारचे संगीत समाविष्ट असलेला कार्यक्रम करावा, त्यामुळे या उत्सवात गझल, फ़्युजन, शास्त्रीय संगीत, जुगलबंदी, लोकसंगीत, सूफ़ी संगीत असे विविध प्रकार लोकांना ऎकायला मिळाले. युवावर्ग मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाकडॆ आकर्षिला गेला.दरवर्षी विशीतले शंभरएक तरुण स्वयंसेवक या कार्यक्रमासाठी काम करतात. कार्यक्रम आयोजित करणे ही एक वेगळी कला आहे. आणि आजोबांसारखेच हरहुन्नरी व्यक्तिमत्व लाभलेले राहुलजी समर्थपणे गेली काही वर्षे हा कार्यक्रम आयोजित करत आहेत.

कट्यार काळजात घुसली आणि संशयकल्लोळ ही नाटके राहुलजींनी पुन्हा रंगमंचावर आणली. त्याविषयी सांगताना त्यांनी सांगितले की लहान असताना कट्यार मधे छोट्या सदाशिवाचे काम त्यांनी केले होते. पण नंतर नाटकात काम करावे असे कधी वाटले नाही. वसंतोत्सवाच्या निमित्ताने पत्रकार परिषद चालू होती. तेव्हा एका पत्रकाराने विचारले की वसंतरावांनी संगीत नाटका पुढे वाचा

मनोरंजन व कला > शास्त्रीय गायक,

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!