logo

Search Here

तिमिरातूनी तेजाकडे

निराधार बालकांना हक्काचं घर देणारे वृद्धांना उबदार घरकूल देणारे गरजूंसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरु करणारे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी रुग्णालय उभारणारे विजय आणि साधना फळणीकर ---

सारं कसं सरधोपट मार्गानी व्हावं

अशी इच्छा असते तुम्हा आम्हा सर्वांची,

पण फासे टाकणारी असते नियती

सत्ता चालते फक्त तीची,

 

        नियतीने त्यांच्या आयुष्यात विपरीत दान टाकलं. बालपणापासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागला, आघात सोसून कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. या सगळ्यापेक्षा कडेलोट होणारी घटना म्हणजे एकुलत्या एक मुलाच्या अकाली मृत्यूची घटना. नियतीने टाकलेल्या विपरित दानांमुळे जीवनात "पराजय' झालाय असं न मानता "विजय' पथावरुन साधनेसह आयुष्याची वाटचाल करणारं आगळं वेगळं कार्य करणारं दांपत्य विजय फळणीकर आणि साधना फळणीकर ---

सध्याच्या धावपळीच्या धकाधकीच्या काळात जो तो धावतोय, मी, माझं, मला या परिघापलिकडच्या जगात डोकवायलाही कोणाला वेळ नाही. समाजाची ही आत्मकेंद्री ढासळणारी नितीमूल्यांची वाटचाल मनावर निराशेचे ढग निर्माण करते पण त्याचवेळेला विजय फळणीकर आणि साधना फळणीकरांसारखी माणसं आपलं डोंगराएव्हढं दु:ख बाजूला ठेवून निराधार मुलामुलींसाठी, आजी आजोबांसाठी "आपलं घर' नावाची आपुलकी जपणारी, शिस्तीची वाटचाल करणारी संस्था उत्तमरित्या चालवून समाजात आपलं नाव "अधोरेखीत' व्हावे असं कार्य करतात.

"विजय' फळणीकरांच बालपण म्हणजे एक

वेगळीच चित्तरकथा -----

16 ऑक्टोबर 1961 या दिवशी गजानन आणि लिलाबाई यांचं. 3 भाऊ, 1 बहीण या भावंडातील दोन नंबरचं अपत्य, विजयच्या वडिलांचा सोन्याचे दागिने घडविण्याचा व्यवसाय, त्यांच्या निधनानंतर घरच्या लक्ष्मीच्या अंगावरचे दागिने मोडावे लागले;  राहते घर सोडावे लागले. बालवयातील या दाहक अनुभवांना पेटीच्या सुरांचा ओलावा मिळाला. पण नको ती प्रलोभनं खुणावत होती. हिरो बनायचंय, पैसे कमवायचेत थेट मुंबईची वाट पकडली. घर, आई, तिची माया सगळं सुटलं. मुंबईत जीवनाचे सगळे रंग अनुभवले. भुकेल्या पोटी मिळेल ते खाणं, मागून खाणं, पडेल ते काम करणं रवानगी थेट बालसुधारगृहात. तिथे योग्य दिशा मिळाली. रात्र शाळा, महाविदर्भ मधली नोकरी, कलाक्षेत्राची आवड, लेखन, नाट्य या सगळ्यामुळे "विजय फळणीकर' हे नाव अनेक तऱ्हेचे टक्केटोणपे खाल्ल्यावर स्थिर झालं, रसिक मनात खास प्रतिमा निर्माण झाली.

सोन्याचा मुलामा दिलेलं चांदीचं मंगळसूत्र आणि छान शालू इतकाच साज लेऊन भंडाऱ्याच्या डेप्युटी कलेक्टर फाये यांची कन्या साधना, विवाहानंतर साधना विजय फळणीकर झाली. वैभवच्या आगमनाने घरादाराचे वैभव वाढले. सगळं दृष्ट लागावं असं.

पण नियतीचे फासे उलटे पडले. हुशार, सर्वगुणसंपन्न, विद्यार्थीप्रिय, शिक्षकप्रिय, गुणी "वैभव' ऍक्युट ल्युकेमिया या गंभीर आजारा ने ग्रासला गेला. जगाच्या पाठीवर ह्या जीवघेण्या आजारावर उपचार नाहीत ही दाहक वस्तुस्थिती समोर होती. 18 नोव्हेंबर 2001 साली वैभवने अखेरचा श्र्वास घेतला. "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, हेच खरं.

वैभवशिवाय जगणं अशक्य व अवघड होतं. जीवनयात्रा संपवून टाकावी असा अभद्र विचार दोघांच्याही मनात अनेकदा येऊन गेला.

पण पुन्हा परमेश्र्वरी योजना काही वेगळीच असते. वैभवच्या विम्याच्या पैशातून ऍम्ब्युलन्स घ्यावी हा विचार मनात आला. ऍम्ब्युलन्स नाही म्हणून कोणा चे हाल होऊ नयेत ही इच्छा. विख्यात गायक पंडीत सुरेश वाडकर यांनी कल्पना उचलून धरली. आणि काही समविचारी मित्रांच्या सहकार्याने स्व. वैभव फळणीकर मेमोरियल ट्रस्टची स्थापना झाली. सूरमयी शाम या वाडकर यांच्या कार्यक्रमातून मिळालेला निधी आणि विम्याचे पैसे यातून घेतलेली ऍम्ब्युलन्स समाजासाठी रुजू झाली. आणि पाठोपाठ अनाथ मुलामुलींसाठी "आपलं घर' या आश्रमाचीही सुरुवात झाली. निराधार मुलांना आधारही मिळाला अन्‌ छत्रही मिळालं, प्रेमाचं, आपुलकीचं, हक्काचं "आपलं घर'.

आलेल्या प्रत्येक मुलाला हे स्वत:च घर वाटावं म्हणून ठेवलेलं आपलं घर हे नाव लोकप्रिय झालं. येणारी मुलं प्रतिकूल परिस्थितीतून येणारीच होती. तीन ते दहा वयोगटातील, चौदा मुलांसह सुरु झालेलं "आपलं घर' आज वारजे आणि "डोणजे' भागात वटवृक्षासारखं विस्तारलं आहे.

घटाघटातले रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. "आपलं घर' ने नियतीच्या कचाट्यात सापडलेल्या, दैवाचे तडाखे खाणाऱ्या मुलामुलींना माया दिली, प्रेम दिलं, तशीच शिस्तही दिली. प्रत्येक मुलाची प्रत्येक मुलीची कहाणी वेगळीच, कोमल, प्रदीप, प्रताप --- आणि कितीतरी.

चांगल्या कामासाठी, पुढे वाचा

सामाजिक > अनाथालय,

 

6 Comments

माझी यशोगाथा  08 June 2016

तुम्ही इंटरेस्ट दाखवल्याबद्दल धन्यवाद.या संस्थेला डोनेशन द्यायचे असेल तर खालील लिंक वर क्लिक करा.http://www.apalaghar.com/donation

nikita pawar  06 June 2016

सर मी एक सामाजिक कार्यकरती आहे, मला तुमच्यासोबत काम करायला आवडेल संस्थेला जर देणगी द्यायची असेल तर काय कराव लागेल ???

nikita pawar  06 June 2016

सर, मला तुमचे काम खुपच आवडले. जर मला तुमच्या संस्थेबरोबर काम करायचे असेल किंवा देणगी द्यायची असेल तर काय करावे लागेल???

prachi  19 April 2016

khup sunder

sakshi  13 February 2016

सर, मला तुमचे काम खूपच आवडले , जर मला तुमच्या सौस्थेबारोरार काम करायचे असेल किवा देणगी द्यायची असेल तर की करावे लागेल?????

Purva  27 January 2016

Super story, hats of to the duo

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!