logo

Search Here

लिटल्‌ (ग्रॅण्ड) मास्टर

क्रिकेटच्या अतिवेडापायी आपण इतर खेळाकडे दुर्लक्ष करतो. पण हळुहळू ही परिस्थिती बदलत आहे. अन्य खेळांची आवड वाढत आहे. दुसऱ्या खेळामध्येही भारतीय मंडळी यशस्वी होत आहेत. नाशिकचा बुद्धिबळपटू विदित गुजराथी या अठरा वर्षाच्या मुलाने ग्रॅण्डमास्टर हा किताब मिळवला आहे. देशातील हा किताब मिळवणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

क्रिकेटच्या अतिवेडापायी आपण इतर खेळाकडे दुर्लक्ष करतो. पण हळुहळू ही परिस्थिती बदलत आहे. अन्य खेळांची आवड वाढत आहे. दुसऱ्या खेळामध्येही भारतीय मंडळी यशस्वी होत आहेत. नाशिकचा बुद्धिबळपटू विदित गुजराथी या अठरा वर्षाच्या मुलाने ग्रॅण्डमास्टर हा किताब मिळवला आहे. देशातील हा किताब मिळवणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

" I did not picture myself as even a grandmaster to say nothing of aspiring to the chess crown this was not because I was timed I wasn't but beacuse I simply lived in one world and the grandmasters existed in a complitely different one. people like them were not really even people but like gods or mythical heroes. ''
अनातोली कारपोरच्या या अवतरणामुळे बुद्धिबळाच्या साम्राज्यातील "ग्रॅण्डमास्टर' उपाधीचे महत्त्व अधोरेखित होते. नाशिकचा 18 वर्षीय विदित गुजराथी महाराष्ट्रातील तिसरा आणि सर्वात तरुण ग्रॅण्डमास्टर. बुद्धिबळाच्या नकाशात गेल्या दशकात आपले ठळक स्थान निर्माण करणारा विदित भारताचा तिसावा ग्रॅण्डमास्टर. 1987 मध्ये विश्‍वनाथन आनंद भारताचा पहिला ग्रॅण्डमास्टर झाला आणि नंतर जवळजवळ 5 वर्षे तो भारताचा एकमेव ग्रॅण्डमास्टर होता. दीडशेहून अधिक देशांमध्ये बुद्धिबळ खेळले जाते, मात्र या देशांमध्ये ग्रॅण्डमास्टर्सचे शतक गाठणारा एकमेव देश म्हणजे रशिया. दोनशेहून अधिक ग्रॅण्डमार्स्टर्स रशियात आहेत, मात्र रशिया वगळता एकाही देशाने ग्रॅण्डमास्टर्सचे शतकही गाठलेले नाही.
नुकताच ग्रॅण्डमास्टर झालेला विदित गुजराथी मूळचा नाशिकचा. संतोष व निकिता गुजराथी या डॉक्‍टर दांपत्याचा हा मुलगा. अगदी लहानपणी तो आईबरोबर दवाखान्यात जाऊ लागला. तेथे त्याच्या हातात वयाच्या पाचव्या वर्षी देण्यात आला बुद्धिबळाचा डाव. आई-वडिलांना प्रकर्षाने जाणवले ते लहानग्या विदितमध्ये असलेले एकाग्रता आणि संयम हे दोन गुण! तेथून सुरू झाली ती लहानग्या विदितची देदीप्यमान कारकीर्द.
विदित नऊ वर्षांचा असताना घडलेला हा किस्सा. इंदोरमध्ये जानेवारी 2003 मध्ये 16 वर्षांखालील मुलांची राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धा भरवण्यात आली होती. त्या वेळी बक्षीस समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या नजरेस स्पर्धकांच्या घोळक्‍यातील छोटासा विदित आला. त्यांनी मोठ्या कौतुकाने संयोजकांना सुचविले, की या छोट्या स्पर्धकाला प्रोत्साहन म्हणून काहीतरी बक्षीस देण्यात यावे. संयोजकांनी नम्रपणे प्रमुख पाहुण्यांच्या निदर्शनास आणून दिले, की त्याची काहीच गरज नाही. छोटा विदित स्पर्धेत उपविजेता ठरलेला आहे!
लहान वयातच उभारी घेतलेल्या विदितच्या देदीप्यमान कारकिर्दीत त्याच्या प्रशिक्षकांबरोबरच त्याच्या कुटुंबीयांचाही मोठा वाटा आहे. विदितची सातवीत शिकणारी धाकटी बहीण वेदिकादेखील भावाच्या लहानसहान गरजांची खूप काळजी घेते. ज्येष्ठ बुद्धिबळपटू आणि ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे यांच्या आई-वडिलांबरोबर झालेल्या संवादातूनही खूप काही शिकायला मिळाले आणि त्याचा उपयोग विदितला एक खेळाडू म्हणून वाढवताना झाला, असे विदितची आई डॉ. निकिता यांनी सांगितले.
बुद्धिबळात विश्‍वस्तरीय स्थान प्राप्त केलेल्या विदितची "बुद्धी' शालेय अभ्यासातही "बलवान' आहे. दहावीला तब्बल 92.36 टक्‍के गुण मिळविणारा विदित सध्या नाशिकला के.टी.एच.एम. महाविद्यालयात कलाशाखेत बारावीच्या वर्गात आहे. "ओ.एन.जी.सी.'ची क्रीडा शिष्यवृत्ती मिळविलेला विदित रोज सहा तास नेटवर बसून बुद्धिबळाचा सराव करतो. ग्रॅण्डमास्टर ऍलोम ग्रीनफील्ड या नामवंत बुद्धिबळ प्रशिक्षकाकडून त्याने दोन वेळा प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. पाच वर्षांपूर्वी ग्रीनफील्ड यांनी "साई'च्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत खास नाशिकला येऊन विदितला विशेष प्रशिक्षण दिले होते. सध्या ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे यांचे मार्गदर्शन विदितला नियमित मिळत असते. अभिजित कुंटे एकदा भाषणात म्हणाले, ""राष्ट्रीय स्तरावर चमकल्यानंतर अनेक खेळाडू थांबतात, पण ते योग्य नाही. कायम मोठं ध्येय ठेवलं पाहिजे.''
""छोट्या विदितने घरी झाल्यावर बाल्कनीतील दरवाजामागे भिंतीवर "मी आशियाई ज्युनिअर स्पर्धेत विजेतेपद मिळविणारच' अशा स्वरूपाची एक-दोन वाक्‍यं लिहून ठेवली. हा सारा प्रकार आई-वडिलांना दिसला तो आशियाई स्पर्धेत विदित चमकून घरी परतल्यावरच!'' - विदितच्या आईनेच विदित कसा निश्‍चयी पुढे वाचा

क्रीडा > बुद्धिबळ,

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!