logo

Search Here

माझी यशोगाथा - महेंद्र यादव

झेप....एक भरारी कालचक्र हे अविरत फिरत असतं. काळाची गती कोणासाठीही थांबत नाही. त्याचं भ्रमण अखंड चालू असतं. आपल्याच आयुष्याकडे मागे वळून पाहताना, आपली आपणच केलेली वाटचाल बघताना आश्र्चर्य वाटून जातं. आपण कोठून कोठे आलोत याचा आढावा घ्यावासा वाटतो. अशीच ही भरारी शून्यातून थेट संपन्नतेच्या अवकाशातली ..... महेंद्र परशूराम यादव यांची.....

जन्मतारीख 15 जानेवारी 1972, तालुका पुरंदर, गाव पिंगोरी. 72 सालच्या ऐन दुष्काळात झालेला जन्म, आईवडील शेतात मोल मजुरी करणारे. सहा किलोमीटर चालत जायचं अन्‌ परत यायचं अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या जीवन शिक्षण मंदिरात महेंद्र यादव या छोट्या मुलाचं शिक्षण सुरु होतं. 12 किलोमिटरची रोजची पायपीट "महेंद्र'चं शरीर अन्‌ मन दोन्हीही मजबूत करणारी ठरत होती.

    गावाच्या चारही बाजूला डोंगर म्हणजे आधी डोंगराळ भाग, त्यात दुष्काळ, गावामधे 1983 पर्यंत तर दिवेही नाहीत, कंदीलाच्या उजेडात अभ्यास कितीसा होणार? खर तर शिक्षणाला पोषक वातावरण मुळीच नाही अशीच आजूबाजूची वस्तुस्थिती अन्‌ परिस्थिती.

    अशा वातावरणात वाढत असलेल्या महेंद्रचं स्वप्नं फार तर पोलिस बनावं, मिलीटरीमध्ये जावं नाहीतर ड्रायव्हर व्हावं इतकंच होतं. पण वडिलांची इच्छा काही वेगळीच होती. 5वी ला इंग्रजी विषय सुरु झाला. 8वीत महेंद्रची रवानगी पिंपरीला काकांच्याकडे झाली, त्याला चांगल शिक्षण मिळावं हा वडिलांचा हेतू.

    नवीन वातावरण, नवीन भाषा, सगळच नवं, जीव गुदमरायला लागला महेंद्रने घरी परतायचा निर्णय घेतला. "गड्या आपुला गावच बरा' हे वाटणं त्यावेळी स्वाभाविक होतं. पण आपण शिकलो नाहीत तरी मुलानी शिकावं हा वडिलांचा आग्रह त्यामुळेच हिंदुस्थान अँटीबायोटिक्स स्कूल मधून महेंद्र पहिल्याच फटक्यात दहावी पास झाला.

    कॉलेज जीवनाची सुरवात 11वी कॉमर्सला प्रवेश घेतला अन्‌ महेंद्र यादव आकाराला येऊ लागला. पार्ट टाईम नोकरी करत शिक्षण चालू होतं. 200 रुपये स्टायपेंड मिळायचा. त्यातून बचत करत पहिली सायकल खरेदी केली. सायकलवर स्वार होत थेट तळेगावपर्यंतची काम उरकायची. मागे हाटायचं नाही पुढे जायचं हा मंत्र देणारी ती दोन चाकी सायकल. सायकलच्या त्या दोन चाकांच्या गती बरोबर महेंद्र यादव या तरुणाचं नशीब, जीवन वेग घेऊ लागलं...

    यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची

    महेंद्र यादव या होतकरु तरुणाच्या जीवनातली तरुणाई बहरु लागली.

    कासारवाडीतल्या गावठाण परिसरात एक दहा बाय दहाची पत्र्याची रुम घेतली आणि भावाबरोबर महेंद्र  तिथे राहून शिक्षण, नोकरी सांभाळू लागला. शिक्षणातली झेप 50 ते 55 टक्क्यांची असली तरी उमेद, चिकाटी 100 टक्केच होती. ग्रॅज्युएट तर व्हायलाच हवं होतं त्या शिवाय नोकरीत स्थिरता मिळणार नव्हती. अकौंटंटचा जॉब सांभाळत, बाहेरुन परीक्षा देत शिक्षण पूर्ण केलं.

    2 वर्ष सदाशिव पेठेत नोकरी केली. वन बीएचके फ्लॅट मधलं ते घरातूनच सुरु असलेलं ऑफीस घरुन नेलेला डबा खायची पण सोय नाही, समोरच्या हॉटेलमधे 100 रु. देऊन डबा खायला बसायचं.

    ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आता पुढच्या शिक्षणाची ओढ लागलेली एम.कॉम त्यामुळेच पूर्ण केलं. इंजिनियरिंगचं ज्ञान शिक्षण नसून सुद्धा "मार्केटिंग' करणारा माणूस अचानक सोडून गेल्यामुळे मार्केटिंगची जबाबदारी महेंद्र यांच्यावर पडली. पगार हजाराचा झाला चार हजार. पण नेमकं अडत होतं ते "इंग्रजी' भाषा ज्ञान कमी असल्यामुळे. भाषेची अडचण मोठी वाटली. थोडी निराशा आलीच पण महेद्र यांचा मूळ स्वभाव मागे हटायचा नाही.

    या काळात घरच्यांचा विरोध पत्करुन जीवनात आलेली, पत्नीचा धर्म उत्तम निभावणारी "संध्या' मात्र महेंद्र यांच्या जीवनात सुवर्ण "सकाळ' आणणारी होती.

    संध्याच्या पाठबळावर नोकरी सोडली. तिने ही काम करायला सुरुवात केली. भोसरीमधे टेल्को सप्लायरकडे अकाऊंटची नवी नोकरी सुरु झाली. पगार तीन साडेतीन हजार मिळायला लागला.

    "महेंद्र यादव' यांची कामाची पद्धत आणि धडाडी पाहून पहिल्याच ठिकाणाहून परत नोकरीसाठी यावं'अशी खास मागणी आाली. पुन्हा दोन अडीच वर्षे काम त्या काळात 50-60 जनरेटरचे मार्केटिंग झाले.

    स्वत:चे स्वत: काहीतरी केले पाहिजे ही उमेद मनात असल्यामुळे महेंद्र यादव यांनी पुन्हा आपल्या सहधर्मचारिणीच्या सल्ल्याला मान देऊन नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसायात उडी मारायचं ठरवलं. 20-25 हजाराचं सेव्हिंग होतं बस्‌ इतकंच भांडवल. त्यातच दहा हजाराचा कॉम्प्युटर घेतला.

    आता प्रतिक्षा होती ती, पहिल्या ऑर्डरची !! कोटेशन देणे, ऑर्डर मिळविणे धडपड सुरु होती. अशातच महेंद्र यांच्या व्यवसायात "सुवर्णयोग' आला. पहिली ऑर्डर मिळाली ती कर्वे रोड वरील रांका ज्वेलर्स यांची !! फक्त दीड लाखाचं सर्वात कमी कोटेशन दिलं म्हणून ही ऑर्डर मिळाली असावी. नुसती ऑर्डरचं मिळाली नाही तर 50 हजार रुपये ऍडव्हान्स सुद्धा मिळाला.

    मग अविरत कष्ट सुरु झाले. ऑर्डर मिळालीय ती वेळेत पूर्ण करायला हव पुढे वाचा

उद्योजक > जनरेटर,

 

2 Comments

Mahendra Yadav  08 February 2016

"व्यवसाय, उद्योग, संघटना हि चढाओढीची आहेत . ह्या क्षेत्रात यश संपादन करायचे असेल तर सतत स्वतःला सिद्ध करावे लागते . धोका पत्करावा लागतो. श्रम केलेच पाहिजेत. यश मिळाल तरी डोक शांत ठेवलेच पाहिजे. अपयश पदरी आले तरी निराशेला बळी पडायचे नाकारलेच पाहिजे. धडपडून पुंन्हा उठायला पाहिजे, पुंन्हा प्रयत्न करायलाच पाहिजे. प्रगतीचा मार्ग हा असाच असतो. यशा पर्यंत पोहोचायचा हा एकच राजमार्ग आहे". ह्या किर्लोस्कर सरांच्या एकमेव तत्वावर मी आयुष्यभर चालत आलो आहे, ज्याचे फलस्वरूप म्हणजेच ACCURATE ची आजची भरारी होय. तुम्ही सर्वांनी सुद्धा शंतनुरावांचे हे तत्व अनुसरले तर यशस्वी होण्या पासून कोणीही आडवू शकणार नाही.

Sunil  03 February 2016

सर मी तुमची यशोगाथा वाचली , खूपच प्रभावित झालो ... मला पण जीवनात असेच यश मिळवायचे आहे , तुम्ही मला काय सल्ला द्याल ???

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!