logo

Search Here

फत्तेचंद रांका (रांका ज्वेलर्स)

आजच्या घडीला ज्या मोजक्याच सराफ व्यावसायिकांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते त्यापैकी आघाडीचे नाव म्हणजे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री. फत्तेचंद रांका. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ज्या प्रकारे ह्या प्रचंड मोठ्या उद्योगाचा डोलारा सांभाळला आहे त्याला तोड नाही. त्यांनी व त्यांच्या पूर्वजांनी हा उद्योग कशा प्रकारे उभारला आणि वाढवला त्याची हि कथा ...

‘बावनकशी माणूस’
“सुमारे 140 वर्षांपूर्वी म्हणजे इ. स. 1880 च्या आसपास, हजारो किलोमीटरवर असलेल्या राजस्थान मधील सदळी येथून (खापर पणजोबांचे नाव)पुण्यासाठी पायी चालत निघाले... त्यांनी पुण्यात येऊन तीस ते चाळीस वर्षे दोन रुपे पगारावर नोकरी केली. तेव्हा त्यांना तरी कुठे ठाऊक होतं की राजस्थान मधल्या वाळूत चमकणारे रेतीचे कण त्यांच्या आयुष्यात सोनं बनून येतील...!”
नुकत्याच बी. कॉम झालेल्या आपल्या मुलाला स्वत: च्या खापर पणजोबांच्या कष्टाची जाणीव करुन देणसाठी फत्तेचंदजींनी पुन्हा एकदा सांगितलं.
“दूरदृष्टी हवी बेटा...श्रद्धा हवी..!! प्रामाणिकपणा हा धंद्याचा कणा असतो.. आपली प्रतिमा जपणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघ.. तू तुझा निर्णय घ्यायला हवास कारण निर्णय क्षमता माणसाच्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या करते..”
मुलगा ऐकत तर होताच मन लावून पण त्याच्या मनात खूप प्रश्न पण होते. त्याने शब्द जुळवून एक प्रश्न विचारायचा प्रयत्न केला.
“गेल्या सात पिढ्या जे करत आलो आहोता आपण तोच धंदा मी पुढे चालवणं हे शहाणपणाचं नक्कीच आहे.. कळतंय मला.. पण मी त्याच वाटेवर चालत जाऊन वेगळं काय करणार..? त्यात माझं श्रेय काय..?”
फत्तेचंदजींनी हसून त्याच्याकडे पाहिलं. मनातून त्यांना खरं तर बरं वाटलं की आपला मुलगा काहीतरी नवीन करू पाहतोय. नाहीतर आजोबांची मेहनत वडिलांना कळते पण नातवंडांना त्याची जाणीव नसते. आयतं मिळालं असतं त्यांना सगळं.. त्यामुळे लक्ष्मी चा उपभोग घेण्याची वृत्ती अधिक असते.
“हे बघ बेटा, तू ठरव.. तुला धंदा चालवायचाय की तो वाढवायचाय...! शोधावं लागतं धंद्यात.. काळा चष्मा घातलास तर काळं दिसेल.. लाल घातलास तर लाल.. बिन रंगाचा घातलास तर सप्तरंग दिसतील..तू चार दुकानाची दहा दुकानं करशील तर ते श्रेय तुझंच असेल..”
कॉलेजमध्ये शिकत असताना दुपारच्या वेळेत रोज ज्या दुकानात (मुलाचे नाव) बसायचा तेच हे दुकान.. पण आज वडिलांच्या या बोलण्याने त्याला एका क्षणात वेगळं भासलं..
त्याचे डोळे चमकले. फत्तेचंदजींच्या नजरेतून मुलाचे चमकलेले डोळे सुटले नाहीत.. अर्जुनाच्या डोळ्याला जसा फक्त पक्षी दिसतो तसा दिसला बहुदा आपल मुलाला... बस.. आपलं काम झालं .. ते उठले. त्यांना पुणे सराफ असोसिएशनच्या मिटिंगला जायचं होतं. ते उठले तसा मुलगा त्यांच्या जागी बसला. तंनी एकवार आपल जागेवर बसलेल मुलाकडे कौतुकाने पाहिलं आणि ते म्हणाले,
“दहा ते सहा काम करायचं आणि साठाव्या वर्षी निवृत्त व्हायचं.. असं साधारणपणे माणसं करतात.. धंदा असा करता येत नाही... आणि वाढवताही येत नाही रोजचं बॅलन्सशीट, जमा खर्च, उधारी,शिल्लक.. सगळं बघावं लागतं.. मालक जेंव्हा गल्यातून कुठलीही नोंद न करता पैसे काढतो तेंव्हा तो मुद्दलातून चोरी करतो.. आणि नोकर नेहमी नफ्यातून चोरी करत असतो.”
“म्हणजे नोकरांवर विश्वास टाकायचाच नाही का?”... (मुलाचे नाव) प्रश्न विचारला.
“टाकायचा तर...!” फत्तेचंदजींनी डोळे मोठे करून तत्परतेने म्हंटलं.
“उलट ते आपल कुटुंबातील सदस्य आहेत अशीच वागणूक त्यांना द्यायची. पण आपलं लक्ष मात्र चौफेर असायला हवं..
हसत फत्तेचंदजी पुढे म्हणाले आणि त्यांनी त्यांच्याबरोबर गेली पंचवीस वर्ष सहवासात असलेल्या सहकारी आप्तेष्टांना मीटिंगला सोबत चलण्यासाठी हाक मारली... ती लोकं येताच त्यांच्याबरोबर ते निघून गेले.
(मुलाचे नाव) आपल्या वडिलांना पाठमोरं जाताना बघत होता. त्याच्या मनात आलं, स्वत:चे दोन भाऊ आणि एक मुलगा अश्या जवळच्या तीन व्यक्तीच्या आघाती मृत्यूचे दु:ख पचवून खंबीरपणे उभा राहिलेला हा माणूस..! सतत काम करतो.. दिवसातून फक्त चार तास झोपतो.. कुठून येते यांना एवढी एनर्जी..? आपल्या वडिलांचा उत्साह, धैर्य आणि प्रामाणिकपणाच त्यांना इथवर घेऊन आलाय..! मनोमन त्यांच्याविषयी अभिमान बाळगून कामाला लागला.
फत्तेचंदजी सगळ्यांसोबत कार मध्ये बसले. रांका ज्वेलर्स.. वर मान करून त्यांनी आपल्या दुकानाचा बोर्ड पहिला... पिढ्यान पिढ्या चालू असलेला आपला हा व्यवसाय.. तो पुढे चालू ठेवण्याचं कर्तव्य आपण केलं, कुटुंबाचा एक सदस्य म्हणून.. त्यासाठी वेळ पडली तेंव्हा वकिली देखील सोडली.. रविवारात एका भाड्याच्या जागेत 1908 साली ‘गुलाबचंद चतरंजजी’ या नावाने पूर्वजांनी सुरु केलेली छोटीशी सोन्याची पेढी.. हळूहळू करत मग 1967 साली ‘रांका ज्वेलर्स’ सुरु झालं.. वडील केवळ दुसरी शिकलेले... आई तर काहीच न शिकलेली... वडिलांकडे मात्र कमी शिक्षण असलं तरी दूरदृष्टी होती. त्यांनी व्यवसाय वाढवला. मात्र स्वत:चा व्यवसाय असूनही वडिलांनी आपल्याला अनेक वर्ष वकिली करू दिली... खर तर अगदी पुढे वाचा

उद्योजक > सराफ,

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!