logo

Search Here

निषिध्द्तेतील शास्त्रशुध्द यश

साधारणतः २० वर्षा पूर्वी जेव्हा sex हा शब्द उच्चाराने सुद्धा वाईट समजले जायचे त्यावेळी समाजाची गरज लक्षात घेऊन सेक्सोलोजीचे शास्रशुद्ध शिक्षण घेऊन एका तरुणाने वेगळी वाट पकडली त्याला आलेल्या अडचणी आणि त्याने काढलेला मार्ग याविषयीचा हा लेख

देशातील तरूणांची सर्वाधिक संख्या लक्षात घेता भारताला सध्या सर्वात तरूण देश म्हणून ओळखले जाते. या युवाशक्तीच्या मदतीने भारताची लवकरच महासत्ता बनण्याची घोडदौड सुरू झाली असून विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, कला, वाणिज्य आदी प्रत्येकच क्षेत्रात भारतीय विकसीत राष्ट्रांच्या तुलतेत आगेकूच करतांना दिसतात. अलीकडे या प्रगतीबाबत भारतीय व पाश्‍चात्य विचारसरणीत कमालीचे साम्य भासत असले तरी संस्कृती व परंपरेच्या पार्श्‍वभूमीवरील व्दंव्द अजूनही कायम आहे. आधुनिकतेच्या वळणावर पाश्‍चात्यांशी स्पर्धा करण्यात बहुतांश भारतीय व्यस्त असतांना त्यांच्या जीवनशैलीत कळत-नकळत होणारे पाश्‍चात्य संस्कृतीचे अनुकरण आजही वादाचा मुद्दा ठरतो आणि त्यातही सर्वाधिक विवाद्य मुद्दा असतो तो लैंगिकतेविषयीचा.
किशोरवयात लैंगिकतेविषयी निर्माण होणारे कुतुहल किंवा तारूण्याचा उंबरठा ओलांडल्यावर भेडसावणाऱ्या लैंगिक समस्या कितीही नैसर्गिक असल्या तरी त्या भारतीय व्यवस्थेप्रमाणे निषिद्धच मानल्या जातात. परिणामी योग्य वेळी योग्य प्रकारे या शंकांचे निरासरण न झाल्याने अनेकांना विविध शारिरीक व मानसिक विकारांना सामोरे जावे लागते. दिवसेंदविस या समस्यांचे प्रमाण वाढत असून देशाची प्रगती अबाधित ठेवण्याकरीता तरूणांचे स्वास्थ जपणे ही काळाची गरज झाली आहे.
ज्या युवाशक्तीवर आपण अभिमान व्यक्त करतो त्यांच्या प्राथमिक समस्यांचे किंवा शंकांचे निरासरण करण्यात आपण असमर्थ असणे ही चिंतेची बाब असल्याचे मत काही तज्ञ व्यक्त करतात. तर त्यापैकी काहीच यासाठी ठोस पाऊले उचलतांना दिसतात. त्यातीलच एक म्हणजे पुण्यातील डॉ. सुधीर ------------
जवळ-जवळ वीस वर्षांपुर्वी लैंगिक शंकांविषयी आपल्या मित्रांची होणारी कोंडी लक्षात घेता डॉ. सुधीर यांनी या विषयातच तज्ञ होण्याचा निर्णय घेतला. ज्या विषयाला आपल्या समाजात केवळ अश्‍लिलता म्हणून कायमच वर्ज केले गेले, तो विषय अभ्यासणे व त्यातील वैज्ञानिक पैलू इतरांना पटवून देणे हे अतिशय आव्हानात्मक होते. परंतू भारतीयांना पुर्वापार चालत आलेल्या लैंगिकतेविषयीच्या भ्रामक कल्पनांच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा डॉ.सुधीर यांनी ध्यासच घेतला.
पुर्वीपासूनच अभ्यासू वृत्ती असलेल्या डॉ.सुधीर यांनी दहा जिल्ह्यांमध्ये एकमेव असलेल्या पी.जी.ससून वैद्यकीय महाविद्यालयात ३६ क्रमांकाने गुणवत्ता यादीत येऊन प्रवेश मिळवला. १९८८ साली एम.बी.बी.एस. ची पदवी मिळवल्यानंतर माणसाचे मन अभ्यासण्याच्या जिज्ञासेमुळे विविध शाखा खुल्या असतांना देखील मानसशास्त्र विषयात एम.डी. होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यावेळी ससून महाविद्यालयात मानसशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा आपल्यावर विशेष प्रभाव असल्याचे डॉ.सुधीर सांगतात. त्यावेळी मानसोपचार तज्ञांकडे जाणे अत्यंत कमीपणाचे वाटे किंवा मूळात आपल्याला काही मानसिक विकार आहे याचा स्विकार करण्याची वृत्तीच समाजात रूजलेली नव्हती. शिवाय काही रूग्ण आलेच तरी नक्की कोणत्या विकारासाठी कोणत्या तज्ञांकडे जावे याबाबतही प्रचंड संभ्रम असे. अशातच मानसिक विकारांवर उपचार घेण्यास येणार्‍यांमध्ये अनेक रूग्ण लैंगिक समस्यांनी ग्रासलेले असल्याचे डॉ. सुधीर यांच्या लक्षात आले.
भारतात मात्र त्यावेळी लैंगिक समस्या म्हणजे मानसिक आजारच असे समजले जात असल्यामुळे सदर विषयाशी संबंधीत विशेष तज्ञच काय तर संपुर्ण देशात कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात याविषयी स्वतंत्र अभ्यासक्रम देखील उपलब्ध नव्हता. त्यामुळे सर्वसामान्य रूग्णांना याबाबत योग्य समुपदेशन मिळून समाजात जागरूकता निर्माण होणे अवघड बाब होती. याउलट विदेशात मात्र लैंगिक समस्यांवर विविध संशोधने झाली असून या समस्यांवर अनेक वैज्ञानिक उपचारसुध्दा उपलब्ध
होते. अमेरिकेतील एका संशोधनानुसार केवळ तरूणांमध्येच नव्हे तर वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत कुणालाही लैंगिक विकार उद्भवू शकतात हे सिध्द झाले आहे. त्याप्रमाणे र्‍हदयरोग, मधुमेह किंवा कर्करोगांवर जसे उपचार आवश्यक असतात त्या पद्धतीच्या उपचारांची यातही आवश्यकता असल्याचे लक्षात घेत डॉ.सुधीर यांनी विदेशात जाऊन सेक्सॉलॉजी मध्ये पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.
सुदैवाने त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या वरिष्ठांचा व कुटुंबियांचा पाठिंबा मिळाला. डॉ. सुधीर यांचे वडीलसुध्दा डॉक्टर असून ते वयाच्या ५ व्या वर्षापासूनच डॉ.सुधीर यांना “तू माझ्यापेक्षाही चांगला डॉक्टर पुढे वाचा

व्यवसाय > सेक्सोलोजिस्ट,

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!