logo

Search Here

श्री संजय देशमुख

सौर उर्जा .... या त्यामानाने नवीन असलेल्या क्षेत्रात अतिशय कमी कालावधीत नावलौकिकाला आलेल्या माधुरी सोलर या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय दिनकर देशमुख यांची खडतर वाटचाल अधोरेखित करणारी हि कहाणी " मेस मध्ये उरलेले वडे, भजी वायाच जाणार आहेत , ते टाकूनच देणार आहेस त्यापेक्षा निम्या किमतीत आम्हाला दे त्यात तुझाही फायदा आणि आमचाही " ......हे म्हणणारा विद्यार्थी पुढे जाऊन भविष्यात प्रसिद्ध उद्योगपती झाला ....


महत्‌ भाग्याने मिळणारा हा मनुष्यजन्म, या जन्माचं सार्थक करुन घ्यायचं असेल तर जीवनावर प्रेम हवं, प्रयत्नांची करुन पाहण्याची जिद्द हवी तर आणि तरच आयुष्य सार्थकी लागतं. पराकाष्ठा करण्याची तयारी हवी, सतत नवनवीन काही करुन
आपल्या जीवनात यशाची एक एक पायरी चढत "सार्थक' या पायरीवर विसावलेले यशस्वी उद्योजक संजय दिनकर देशमुख यांची यशोगाथा निश्चितच प्रेरणादायी आहे.
सातारा जिल्ह्यातील, कऱ्हाड तालुक्यातलं रेठरे बुद्रुक या गावी "संजय' याचा जन्म 13 डिसेंबर 1970 रोजी झाला. वडिल दिनकर आणि आई मालन यांच्या निगराणीमधील 'संजय ' नावाचं बीज रुजत होतं, बालपण आकाराला येत होतं पण खरी जडणघडणीला सुरुवात झाली ती वाळवा तालुक्यातल्या कासेगावातून. चौथीपर्यंतची जीवन शिक्षण देणारी जिल्हा परिषदेची शाळा या शाळेतूनचं. अतिशय चौकस, प्रत्येक गोष्टीची आवड असलेला "संजय देशमुख' चौथीच्या स्कॉलरशीपचा मानकरी होता.
एकत्र कुटुंबात जडणघडण सुरु होती. दोन काकांपैकी एक काका सरपंच, तर एक काका कराड पंचायत समितीमध्ये कामाला  होते. समाजात, राजकीय क्षेत्रामध्ये दोघांनाही स्थान होतं. वडिल फारसे शिकलेले नव्हते, ते शेती करायचे. "कारभाऱ्याचं', म्हणजे जो कामकाज बघतो त्याचं ऐकायचं, त्यांनी सांगितलेलं करायचं हा एकत्र कुटुंबातला नियम असतो; तोच नियम संजय यांच्या  घरातला होता. 7वी पर्यंतच "रम्य ते बालपण' अती छान मस्त आनंदात गेलं.
काही काळानंतर मात्र कुटुंब वेगळी झाली अन्‌ खरा कसोटीचा काळ सुरु झाला. वडीलांच्या शेती उत्पादनावर सगळं भागेना, क्लासची सहा महिन्याची फी 20 रुपये पण ती देखील देणं परवडेना. एकदा मोठ्या मुश्कीलीने जमवलेली 20 रुपये फी हरवली. खूप वाईट वाटलं होतं, टेन्शन आलं होतं. आईला सांगितलं. बेचैनीत परत एकदा शोधाशोध करायला लागल्यावर ते "हरवलेले” 20 रुपये मिळाले. आज कोट्यवधी/लाखो रुपयांचा व्यवसाय करणारे संजय देशमुख हरवलेल्या रुपयांची ही गोष्ट सांगताना मात्र भावूक होतात, हरवून जातात.
अडचणी होत्या पण मार्ग काढत "संजय' यांची वाटचाल सुरु होती. जिद्द होती, कष्ट करण्याची तयारी होती. 10वी ला केंद्रात पहिला नंबर मिळाला. पण नेमका प्रवेश कोणत्या शाखेला घ्यावा हे ठरत नसतानाच राजक्का सूर्यवंशी या बहिणीने "डिप्लोमा' इलेक्ट्रॉनिक्स करण्याचा सल्ला दिला. 1986 च्या आसपासचा काळ तो "इलेक्ट्रॉनिक्स' युगच सुरु होण्याचाच  काळ होता.
" बहिण म्हणाली स्टेशनवरुन ट्रेन सुटली की दुसऱ्या स्टेशनला पोहचतेच. डिप्लोमाच्या मधे 11वी 12वी ची थांब्यांची स्टेशन येत नाहीत. थोडी इंग्रजीची भीती होती पण हार्डवर्क ने ती पण कमी करण्यात यश मिळवलं.
कॉलेज प्रवास सुरु झाला अन्‌ संजय देशमुखांच व्यक्तीमत्व  आकार घेऊ लागलं. 10 रुपये गावी जायचे ठेवून द्यायचे. आणि मग मेस आणि इतर खर्च भागवायचे असं साधं सोपं आर्थिक गणित. वसंतदादा कॉलेज हे प्रायव्हेट कॉलेज; सर्व राज्यातली मुलं तिथं यायची. कोणत्याही ग्रुपमध्ये न जाता शिक्षण सुरु होत. मेसमधल्या इतर मुलांना केलेली भजी वडे यांचा नाष्टा प्लेट फीफ्टी परसेंट मध्ये मिळायची ती खूप मजा वाटायची. " खपली नाहीतर वाया जातील, फीफ्टी परसेंटना दे'' इथेच व्यवसायाची बीजे रुजत होती. कॉलेजच्या तीन वर्षात धमाल मजा करुनही, पहिल्या प्रयत्नातच तीन वर्षाचा डिप्लोमा कोर्स पूर्ण झाला. साऱ्या गावाला अभिमान वाटावा असा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगचा डिप्लोमा होल्डर संजय देशमुख, गावामध्ये कौतुकाचा विषय झाला.
सतत नवीन गोष्टींच्या शोधात असलेले "संजय देशमुख' सहज सुट्टीच्या दिवशी कऱ्हाडला येतात काय, कोहीनूर टेक्नीकल इन्स्टिट्युटमधे आपल्या बोलक्या स्वभावानुसार माहिती देऊन गावी परतात, ध्यानी मनी नसताना गावाच्या बाजारच्या दिवशी पोस्टमन घरी आला आणि  इंटरव्ह्युचं पत्र हाती दिलं. शिकवायची आवड होतीच. ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांना शिकवायचं काम  होतं. इंटरव्ह्युला सोप्या शब्दात कंडक्टर शब्दाचा अर्थ मुलांना समजावून दिला. सर्व मुलांनी एकमुखाने "आम्हाला देशमुख सरच हवेत अशी घोषणा केली, पुढे हे पण सांगितलं की ते नसतील तर आम्ही कोर्सच करणार नाही.
आयुष्यातली पहिली नोकरी ... "संजय दिनकर देशमुख' सर बनले. कासेगाव ते कऱ्हाड एस.टी. प्रवास. गावातल्या गणिताच्या शिकवण्या. 750 रुपये लेक्चरचे मिळायचे आर.के. हॉटेलमधल्या 5 रुपयाच्या डोसा उत्तापाची चव वेगळीच वाटायची स्वकमाईची. खूप "एन्जॉय' केलेले आयुष्यातले ते 6 महिने.
31 डिसेंबर 1990 ला पुण्यात सगळे मित्र एकत्र जमले, तीच संजय देशमुखांची पहिली पुणे भेट. एक मित्र मुंबईचा येऊ शकला नाही म्हणून मु पुढे वाचा

उद्योजक > सोलर एनर्जी,

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!