logo

Search Here

परफेक्ट' झावरे सर

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गारगुंडी या अतिशय छोट्या गावातून आलेल्या ध्येयवेड्या मुलाची अनोखी गोष्ट

"परफेक्ट' झावरे सर !

गेली जवळजवळ त्रेचाळीस वर्षे, "झावरेज प्रोफेशनल अ‍ॅकॅडमी' ही चार्टर्ड अकाऊटन्सीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी संस्था चालवणारे सी.ए. शिवाजीराव झावरे सर यांचा आजवरचा प्रवास म्हणजे एक ध्यास प्रवास आहे.

गारगुंडी या अहमदनगरमधल्या पारनेर तालुक्यातल्या अत्यंत लहान, गावातून आलेले झावरे सर आज इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्टस्‌च्या सेंट्रल काऊन्सिलचे गेली 6 वर्षे सभासद आहेत. आणि या अत्यंत मानाच्या आणि जबाबदारीच्या पदावरुन चार्टर्ड अकाऊंटन्सी सारख्या अत्यंत महत्वाच्या क्षेत्रामधे, त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये, परीक्षा पद्धतीमधे, कार्यपद्धतीमध्ये, व्यवसायामध्ये काही पायाभूत बदल घडवून आणण्याचे काम ते करत आहेत. ज्या योगे चार्टर्ड अकाऊंटन्सी हे क्षेत्र अधिकाधिक लोकाभिमुख होऊन सर्वच क्षेत्रामधले चार्टर्ड अकाऊटन्सीचे योगदान वाढेल.

सरांचे वडिल प्राथमिक शिक्षक आणि आई निरक्षर, दोन्ही मोठी भावंडे शिक्षण क्षेत्रातच रमलेली. त्यामुळे "शिकवणं' कदाचित रक्तातच असावी सरांच्या. त्यांना मात्र स्वत:तला शिक्षक गवसला तो त्यांचा स्वत:चा सी.ए.चा अभ्यास चालू असताना, त्याचं असं झालं की अहमदनगरहून बी.कॉम झाल्यानंतर राष्ट्रीयीकृत बॅंकेत सहज मिळणारी ऑफिसरची नोकरी घेण्यापेक्षा तू सी.ए. हो असा सल्ला त्यांना एका वडिलधाऱ्यानी दिला. तो मानून शिवाजीराव झावरे सी.ए. करायला म्हणून पुण्याला आले खरे, पण जिकडे तिकडे नाऊमेद करणारे सल्लेच मिळायला लागले. ज्या होस्टेलवर उतरले होते तिथे सी.ए. चा अभ्यास करणारी मुले होती त्यांनी स्वत:चे किस्से सांगितले. सगळ्यांचा सूर एकच सी.ए.च्या नादाला न लागलेलंच बरं. काही सी.एं. ना भेटलो तर त्यांनी गावातून आलेल्या, इंग्रजी बरं नसणाऱ्या मुलांना हा कोर्स जमणार नाही असं सांगितलं. जसजसे वेगवगेळ्या बाजुंनी हा कोर्स अवघड आहे, खेडेगावातल्या मुलांना झेपणारा नाही असं ऐकायला मिळालं तसतसं झावरे सरांचा सी.ए. करण्याचा निश्चय पक्का होत गेला. मनात एक जिद्द निर्माण झाली. आणि मग हा कोर्स नक्की काय आहे, त्याच्या परीक्षा पास होण्यासाठी अभ्यासाची काय पद्धत ठेवली पाहिजे त्याचं विश्लेषण सुरु झालं. त्यांच्याबरोबर होते सी.ए. करु इच्छिणारे ग्रामीण भागामधून आलेले अजून पाच-सहा मित्र. मग सर्वांनी मिळून असं ठरवलं की सोमवार ते शुक्रवार सगळ्यांनी आपापला अभ्यास करायचा आणि शनिवारी ज्याचा जो विषय चांगला आहे; त्याने त्या विषयातल्या इतरांच्या अडचणी सोडवायच्या. आणि या सगळ्याला यश आलं. यथावकाश सगळेजण नंतर सी.ए. झाले. आणि आज एक मित्र सोडला, जो नंतर कायदेतज्ञ झाला तर बाकी सगळेजण यशस्वी सी.ए. म्हणून कार्यरत आहेत.

या अनुभवातून स्वत:मधला शिक्षक सरांना सापडला आणि सी.ए.च्या मुलांना शिकवणं नंतर चालूच राहीलं. नोकरी सांभाळून सकाळ संध्याकाळ वर्ग घेणं चालूच होतं. सुदर्शन केमिकलमधली नोकरी असो नाहीतर नंतर घेतलेली भारतीय ऍग्रो इंडस्ट्रिज फाऊंडेशनमधली सी.ए.चे मार्गदर्शन वर्ग चालूच होते. कारण ती सरांची पॅशन होती.

"मणिभाई देसाईंचा सहवास'

सुदर्शन केमिकलमधली चोख अकाऊंटंटची नोकरी सुरु असतानाच मणिभाई देसाई ह्या मूळ गांधीवादी व संशोधनाद्वारे ग्रामीण भागाचा कायापालट केलेल्या व्यक्तिबद्दल सरांच्या मनात कुतुहल होते. त्यांना भेटण्याची इच्छा होती. आणि तशी संधी चालूनही आली. त्या पहिल्याच भेटीमधे शेवटीमणि भाईंनी सरांना बी.ए.आय.एफ. रिचर्स फाऊंडेशनमधे जॉईन होता येईल का हे विचारले. आणि सरांनी पगार किती, पद कुठले असे कोणतेही व्यावहारिक प्रश्न न विचारता हो म्हणून टाकले. ते एका अनामिक भावनेतूनच !

भारतीय ऍग्रो इंडस्ट्रिज फाऊंडेशन (BAIF) मधल्या जबाबदाऱ्यांमधे मणिभाई देसाईंचा सहवास ही सर्वात महत्वाची गोष्ट होती. त्यांच्याबरोबरच्या चर्चांमधून, सहवासातून सरांची जीवनमुल्ये दृढ होत गेली. एक जीवनदृष्टी निश्चित होत गेली. बाएफमधे केलेल्या कामातून सर्व क्षेत्रात मग ते शेती, गोपालन, शाळा, फळबागा, कॅटल ब्रिडिंग असा सर्व क्षेत्रातल्या खाचाखोचा कळल्या आणि व्यावसायिक कौशल्यं विकसित झाली आणि क्षितिज विस्तारलं. मणिभाईंच्या सहवासातून, आपलं जगणं-वाचणं, विचार करणं कसं असायला हवं याविषयीचे विचार पक्के झाले. इकडे एका बाजूला अ‍ॅकॅडमीचे काम शिकवलं, प्रगती चालू होतीच. आणि अशातच मग अ‍ॅकॅडमी की नोकरी असा पेचप्रसंग निर्माण झाला. मणिभाईंनी पुढच्या प्रशिक्षणासाठी दीड वर्ष फ्रान्सला जावे असे ठरविले आणि ते संगणकाचे प्रशिक्षण संस्थेच्या कामाच्या दृष्टीने महत्वाचे होते. पण दीड वर पुढे वाचा

व्यवसाय > सी ए कोचिंग क्लासेस,

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!