logo

Search Here

Ravindra Ingavale the technosavy head constable

पुण्याजवळील सिंहगड रोड येथील छोट्याशा नांदेड गावातून आलेला रवींद्र इंगवले हा तरुण पोलिस हवालदार ....आपल्या विजीगिषु वृत्तीने सरकारी यंत्रणेमध्ये अमुलाग्र बदल घडवायचा प्रयत्न करतोय. त्याच्या या प्रयत्नांचा घेतलेला हा मागोवा.

प्रवाहासवे गवसला यशोमार्ग
संगणकामुळे जागततिकीकरणाचा वेग प्रचंड वाढला असून व्यक्‍ती असो वा यंत्रणा प्रत्येकानेच सतत अपडेटेड रहाणे ही काळाची गरज झाली आहे. अशातच वयाच्या २९ व्या वर्षापर्यंत संगणकाबाबत पुर्णत: अज्ञात असणार्‍या एका ध्येय वेड्या हवालदाराने पोलीस दलासाठी तब्बल २५ संगणक प्रणाली विकसित करत केवळ शासकीय यंत्रणेसच नव्हे तर यशप्राप्‍तीच्या व्याख्येसही अपडेट केले आहे. प्रवाहाच्या विरूध्द दिशेने मार्गक्रमण केल्यानेच यशोमार्ग गवसतो ही पुर्वापार चालत आलेली संकल्पना मोडीत काढत त्यांनी “ प्रवाहासवे गवसणार्‍या यशोमार्गाचा “ नव्यानेच परीचय करून दिला. त्यांचे नाव श्री. रविंद्र इंगवले.
पुण्याजवळील सिंहगड रोडवरील नांदेड गाव येथे एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या श्री. इंगवले यांना घरच्या बिकट परिस्थितीमुळे १२ वी नंतरचे शिक्षण पुर्ण करण्याऐवजी नोकरीची कास धरावी लागली. इतर हजारो तरूणांप्रमाणे त्यांनीही पोलीस भरतीचा सामान्य मार्ग स्विकारला. परंतु चाकोरीबध्द नोकरी करण्योपक्षा आपण आहोत त्या यंत्रणेच्या उत्कर्षासाठी धडपडण्याची त्यांची महत्वाकांक्षा आज प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरली आहे. आपल्या इच्छाशक्‍ती व परीश्रमाच्या बळावर श्री. इंगवले यांनी समोर आलेल्या या सामान्य मार्गालाच यशोमार्ग म्हणून ओळख मिळवून दिली.

  शिक्षणाचा काहीही गंध नसणार्‍या कुटुंबात जन्म झाला असला तरी आई-वडील आणि आज्जीने दिलेल्या प्रामाणिक परिश्रमाच्या शिकवणीने आपणांस समाजाचे ॠण फेडता येतील इतके सुज्ञ केल्याचे श्री. इंगवले अभिमानाने सांगतात. २५ माणसांचे एकत्र कुटुंब आणि त्यातही उत्पन्‍नाचे एकमेव साधन म्हणजे स्वत:च्या मालकीची अल्पशी शेतजमिन. त्यामुळे एवढ्या मोठ्या एकत्रीत कुटुंबाचा दैनंदीन उदरनिर्वाह भागविण्यासाठी हंगामाप्रमाणे गावातीलच इतर शेतकर्‍यांच्या पेरूच्या बागा किंवा आंबे व जांभळाची झाडे विकत घेऊन त्याची फळे बाजारात विकून पै-पैसा जमवावा लागे. या अल्पशा उत्पन्‍नात कुटुंबातील १५ भावंडांच्या शिक्षणाचा सर्व खर्च भागविणे अवघड बाब होती. कामापुरते लिहिता-वाचता येणे म्हणजेच शिक्षित होणे या समजुतीप्रमाणे घरच्यांनी गावातीलच जीवन शिक्षण विद्यामंदीर या मराठी शाळेत घातले. इयत्‍ता ४ थी पर्यंतचे शिक्षण पुर्ण झाल्यावर श्री. इंगवले यांनी नदीपलीकडील शिवणे गावातील नवभारत हायस्कुलमध्ये प्रवेश घेण्याचा हट्ट धरला. या हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांकरीता असलेले केवळ डेस्क बेंच चे आकर्षण हे त्या हट्टामागचे प्रमुख कारण होते. हायस्कुलमध्ये जाण्याचे सुरूवातीचे हे कारण कितीही बाळबोध असले तरी कालांतराने श्री. इंगवले यांना शिक्षणाचे महत्व पटत गेले. कुटुंबाची परिस्थिती सुधारण्याचा एकमेव पर्याय म्हणजे शिक्षण हे जाणून त्यांचे पुढील प्रयत्न सुरू झाले. शाळा नदीपलीकडे असल्याने दररोज जाणे-येणे सोयीस्कर नव्हते. थंडी, वारा, पाऊस अगदी कोणत्याही परिस्थितीत रोज नदीतून शाळेपर्यंत अनवाणी पायाने चालत जावे लागे. पावसाळ्यात नदीला पूर आला की शाळेत जाण्यासाठी खडकवासला धरणाजवळील १० किलोमीटर लांब असलेल्या एकमेव पुलाच्या मदतीने जावे लागे, तर हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत नदीच्या थंडगार पाण्याने पाय बधीर होत असे. नदी ओलांडल्यावर पुढे गावात कुठेतरी पेटत असणार्‍या शेकोटीचा आधार घेऊन शाळेत जावे लागे. शाळा संपल्यावर दुपारी शेतात पिकणारा भाजीपाला गोळा करणे, त्यांस धुणे, रचणे आणि ते ओझे डोक्यावरून उत्‍तमनगर भाpoliceजी मंडई पर्यंत पुन्हा नदी ओलांडून घेऊन येणे असा त्यांचा ठरलेला दिनक्रमच होता. कधी कधी तर मध्यरात्री देखील शेतास पाणी देण्यास जावे लागे. शालेय जीवनातील त्यांच्या या कष्टमय आयुष्यामागे प्रेरणेबाबत सांगताना श्री. इंगवले यांना त्यांच्या आजीची आठवण होते. आजोबांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाच्या पालनपोषणाचा भार आजीने स्वकष्टाने पेलला होता. जंगलातून लाकडे तोडून ती लाकडाची मोळी डोक्यावर वहात आजी रोज कितीतरी किलोमीटर चालत बाजारापर्यंत येत असे. आजी व आई-वडीलांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी आपणही अविरत कष्ट करावे ही जाणीव श्री. इंगवले यांनी सदैव उराशी बाळगली. शेतीची सगळी कामे सांभाळून त्यांनी अभ्यासावरही लक्ष केंद्रीत केले होते. इयत्‍ता ८ वी पासूनच त्यांनी १० वीचा अभ्यास सुरू केला व १० वीत प्रथम श्रेणीत यश प्राप्‍त केले. या यशाने सर्व कुटुंबिय सुखावले असले तरी पुढील उच्च शिक्षणास लागणार पुढे वाचा

सरकारी > पोलिस,

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!