logo

Search Here

असामान्य मुलांकरिता अपवादात्मक सामाजिक कार्य.... एक प्रेरणादायी कथा

धुळे जिल्ह्यातून आलेला एक तरुण , समाजा कडून आर्थिक मदत घेऊन मानसोपचार तज्ञ डॉक्टर झाला. समाजाचं हेच देणं परत करण्यासाठी दिवस-रात्र झटतोय. अब-नॉर्मल होम सुरु करून विशेष मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करतोय त्याच्या उपक्रमा विषयी हि थोडीशी माहिती...

अब- नॉर्मल होम चा प्रवास...

मुलं ताईला म्हणत होती, “ताई आता आपण अभ्यास करूयात ना प्लीज, आपण सकाळपासून अभ्यासच केला नाही. ”  असा संवाद चालू होता, “अब-नॉर्मल होम” मधील विशेष मुलं आणि ताई मधला. एक पालक तिथेच उभे होते, मला म्हणाले”  किशोरी ताई यापेक्षा यश म्हणजे काय असू शकत.... कि विशेष मुलं मागे लागली आहेत, अभ्यासासाठी..., जिथे त्यांना शिकवण हे एक मोठं आव्हान असत... एका जागी बसवण अवघड असतं...आणि त्यांच्याकडून काम करून घेणं तर त्याहून कठीण” खरच होत त्यांचं, अब-नॉर्मल होमचा प्रवास संचालिका म्हणून मी सुरुवात केली तेंव्हा हे कठीण काम कसं कसं सोप्प होत गेलं, किंबहुना सोप्प करत गेलो, याचा एक आलेखच डोळ्यासमोर उभा राहिला... “अब- नॉर्मल होम”ची संकल्पना 2012 साली श्री. पंकज मिठ्भाकरे यांनी मांडली, त्यावेळी अनेक लोकांनी आमच्या विकास केंद्राच्या नावाबद्दलच हरकत घेतली... अनेकांचे म्हणणं होत कि “अश्या नावाच्या केंद्रात, पालक मुलांना पाठवतील का? नाव बदलायला हवय. ”

  सहसा, विशेष मुलांना “abnormal”  अस म्हटलं जात.. त्यामुळे हा शब्द बऱ्याचदा, नकारात्मकच वापरला जातो. पण याच शब्दात आम्ही सकारात्मकता शोधली आणि सुरु झाल एक वेगळ काम...

“अब” हा हिंदी शब्द आहे ज्याचा अर्थ “आता” असा होतो. म्हणजे “आता विशेष मुलांसाठी एक नॉर्मल वातावरण”,

जिथे ही मुल रमतील, फुलतील आणि त्यांचा विकास होईल.

विशेष मुलांसाठी काम करताना अनेक समस्या पुढे येत गेल्या आणि त्या सुटतही गेल्या, अर्थात या सगळ्याच कामात अनेकांची मदतही झाली.

विशेष मुलांसाठी विकास केंद्र ही संकल्पना जेंव्हा 2012 साली ज्या गतीने विचारात आकार घेत होती, त्याच गतीने अनेक समस्या उभ्या रहात होत्या...

पहिला प्रश्न उभा राहिला, जागेचा... मग सुरु झाला जागेचा शोध...

पहिलं वर्ष तर फक्त जागा शोधण्यात गेले....अनेक ठिकाणी जागेच आसन मिळालं, परंतु मग “विशेष मुलांसाठीच”काम आहे म्हंटल्यावर जागेचे करार रद्द झाले...अनेक ठिकाणी फक्त नकारच मिळाला.

मग एका परिचितांकडून गांधीभवन अश्या कामांसाठी जागी देऊ शकेल असे समजले...मग पोहचलो गांधीभवन च्या कार्यालयात... डॉक्टर सप्तर्षि यांना भेटल्यावर त्यांनी या कामासाठी जागा देण्याची लगेच तयारी दर्शवली...आणि मग आमच्या आशा पल्लवित झाल्या...आणि परत उत्साहाने काम सुरु झाले...

आमच्या मनातलं विकास केंद्र आकार घेऊ लागलं... बांधकाम सुरु झाल... त्यामध्ये देखील प्रत्येक ठिकाणी विशेष मुलाचा विचार करून बांधकामाची आखणी केली... बांधकामात देखील अनेक अडचणी आल्या, परंतु त्या सर्वांवर मात करत आमच्या स्वप्नातलं विकास केंद्र तयार झालं... मार्च 2013 मध्ये, ज्याला आम्ही नाव दिलं, “अब- नॉर्मल होम”... सुरुवातीला तर या मुलांसाठी लागणारे पाणी कशात साठवायच? हा देखील प्रश्न होता... पण एक शुभचिंतक मित्र उभे राहिले पाठीशी आणि अब-नॉर्मल होम ला मिळाली पाण्याची टाकी...

ही संकल्पना सुरु करताना सगळ्यात पहिला विचार मनात आला, तो या मुलांच्या पालकांचा...

मूल विशेष असल की, बऱ्याचदा आईला तिच्या सर्व गोष्टी सोडून द्यावा लागतात आणि चोवीस तास मुलासाठी द्यावे लागतात. बाबांना, मुलं विशेष आहे म्हणून त्याच्यासाठी खूप पैसे कमावून ठेवले पाहिजेत असं वाटत राहत आणि ते जास्त काळ काम करून पैसे कमवत रहातात. घरातलं ‘घरपण’ किंवा आनंद हा मर्यादित होऊ लागतो. विशेष मुलाला देण्यासाठी  खूप एनर्जी लागते आणि लागणारी एनर्जी मिळण्यासाठी पालकांना काही वेळ मोकळा मिळाला पाहिजे, जो वेळ त्यांचा त्यांच्यासाठी असेल…, अस आम्हाला वाटत होत, म्हणजे मग जेवढा वेळ विशेष मूल त्यांच्याबरोबर असेल... तेवढा वेळ पालकांना मुलांबरोबर छान घालवता येईल. म्हणून मग काही वेळ तुमच मूल आमच्याकडे असेल आणि त्या वेळात त्या मुलाच्या विकासासाठीचे काम होईल... आणि पालकांनाही त्यांच्या, स्वत:साठीचा वेळ मिळू शकेल.. हा पहिला विचार... 

या पुढे जाऊन मग कोणत्या प्रकारची मुले आपण आपल्या संस्थेत घेणार आहोत हा विचार सुरु झाला..

एकाच प्रकारची मुले घेण्यापेक्षा सर्व प्रकारची मुले जर घेतली तर त्या मुलांच्या सामाजिकतेवर काम करता येणार आहे, तसच एक गट या मुलांना मिळणार आहे, जो त्यांना स्विकारणारा असेल...

म्हणून मग कोणताही एकच गट डोळ्यासमोर न ठेवता... सर्व प्रकारच्या विशेष मुलांना घ्यायचं अस ठरलं. ज्यात मतीमंद (mental retardation), गतिमंद (slow learner), अध्ययन  अक्षम (learning disability), अतिचंचल (hyperactive), मेंदूंचा पक् पुढे वाचा

सामाजिक > विशेष मुलांची शाळा,

 

2 Comments

माझी यशोगाथा  08 June 2016

तुम्ही इंटरेस्ट दाखवल्याबद्दल धन्यवाद.या संस्थेला डोनेशन द्यायचे असेल तर खालील लिंक वर क्लिक करा. https://abnormalhomeindia.wordpress.com/contact-us/

Ketki Parundekar  08 June 2016

असामान्य मुलांबद्दलचे तुमचे कार्य खुपच उल्लेखनीय आहे. या कार्यासाठी आर्थिक मदत द्यायची असल्यास काय करावे लागेल??

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!