logo

Search Here

संजय गांधी जेटकिंग

कोकणात लहानपण गेलेलं ..... शिक्षण संपवून १२०० रुपये पगारावर नोकरी ...पण जिद्द होती स्वतःच विश्व स्वतः घडवायची.. याच जिद्दीतून जन्माला आले "जेटकिंग" .. त्याच संजय गांधींची हि कथा

संजय गांधी
कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील गोरेगावच्या निसर्गरम्य परिसरात माझे बालपण गेले. माझे पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण तिथेच झाले. पहिल्यापासून माझे स्वप्न होते की आपण आयुष्यात असे काम करावे की जे समजासाठी,तरुणांसाठी उपयोगात येईल.१९९२ मध्ये मी बी.ई. computer झालो. संगणकाचा प्रसार संपूर्ण जगात होत असलेला तो कालखंड
होता. बी.ई. नंतर मी एका कंपनीत १,२०० रुपये पगारावर नोकरी केली. नोकरीत मन रमत नव्हते म्हणून कॉम्प्युटर सेल्स आणि सर्व्हिस व्यवसाय सुरु केला. व्यवसायाच्या निमित्ताने फिरताना असे लक्षात आले की,कॉम्प्युटर रिपेअर करणारी मंडळी कुठे दिसत नाहीत. इंडस्ट्रीला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ निर्माण करणाऱ्या संस्था नाहीत. या मनुष्य बळाची
गरज तेव्हाच माझ्या लक्षात आली. पुढाकार घेऊन कॉम्प्युटर क्षेत्रात रेपेअरिंग नेट्वर्किंग करणारे तरुण आपण उभे करू, अनेक हातांना चांगला रोजगार देऊ, या विचारांतून १९९७ मध्ये ५ व्यक्तींना सोबत घेऊन शिवाजीनगर जे.एम.रोड , पुणे येथे 'जेटकिंग' या नव्या शाखेची सुरवात केली.
आज आमच्या शाखेला १७ वर्षे झालीत.संपूर्ण भारतातून, ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी आले. जवळपास १० हजार विद्यार्थी 'जेटकिंग' चे कोर्सेस करून आज सन्मानाने व्यवसाय किंवा नोकरी करीत आहेत.
आमच्याकडून निम्म्याहून अधिक विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात.
प्रत्येकाचे एकच स्वप्न असते -उज्वल , यशस्वी,करिअरचे ! त्यांचे स्वप्न निव्वळ त्यांच्यापुरते मर्यादित न ठेवता "माझे" देखील स्वप्न पूर्ण करण्यासाठीच गेली १७ वर्षे मी माझ्या टीम सोबत प्रयत्न करतो आहे. विद्यार्थ्यांच्या असंख्य समस्या असतात. काही विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञान खूप कमी असते. त्यामुळे त्यांना बेसिक इंग्रजी पासून सुरवात करावी लागते. कुणीही नाराज होऊन आमचा कोर्स सोडून गेल्याचे १७ वर्षात कधी घडले नाही. प्रत्येक वर्षी ५ अतिशय गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिकवण्याचा शिरस्ता आजवर बाळगला आहे. फी साठी कोणालाच आम्ही अव्हेरले नाही. माझे मिशन एकच आहे -कुशल मनुष्यबळ निर्माण करणे.
'जेटकिंग'चे एम.डी.,चेअरमन म. सुरेश भारवानी यांनी तयार केलेली SMART LABPLUS अतिशय परिणामकारक व सहज समजेल अशी आहे. या पध्दतीमुळे विद्यार्थ्यांना आकलन चटकन आणि परिणामकारक होते. 'जेटकिंग'मध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या कंपनीत प्लेसमेंट देण्याचे नियोजन आम्ही करतो. 'जेटकिंग जे.एम.रोड' च्या यशाचे वेगळेपण असे की, आम्ही इंडस्ट्रीला आमच्या सोबत involve करून घेतले. अनेक कंपनीतले अनुभवी व्यवस्थापक , डायरेक्टर 'जेटकिंग जे.एम.रोड येथे शिकवायला येतात, त्यांचे अनुभव शेअर करतात. इंडस्ट्रीला कशा प्रकारे , कोणते कौशल्य असलेले मनुष्यबळ हवे ते विद्यार्थ्याला कळते.व त्याप्रकारे ते स्वतःला अपडेट करतात. आम्ही prcticle ज्ञान देणारे कोर्सेस तयार केले आहेत. याचमुळे आमच्याकडे शिकणारा विद्यार्थी आयुष्यात अपयशी झालेला नाही. या कामात आम्हा सर्वांना खूप आनंद मिळतो. आपल्या शाखेतून हजारो विद्यार्थांना चांगले करिअर मिळाले, हे समाधान केवळ शब्दातीत आहे. सन्मानाने इथून बाहेर पडलेले विद्यार्थी काही उत्तम काम करीत आहेत, हेच आमचे मोठे यश मी समजतो.मला काय मिळाले यापेक्षा मी माझ्या विद्यार्थ्यांना काय दिले हे मला जास्त महत्वाचे वाटते. या १७ वर्षात अनेक समस्यांना तोंड देत 'जेटकिंग जे.एम.रोड' समर्थपणे उभी आहे. या माझ्या यशात माझी पत्नी समिधा हिचा वाटा मोठा आहे. ती माझ्या प्रत्येक गोष्टीत सर्वार्थाने सोबत असते., तेही अगदी सकारात्मकरीत्या! त्यातूनच आजवर मला मोठे बळ मिळाले आहे.
हा लेख लिहिण्यामागे हेतू एकच-'जेटकिंग'ने गेल्या १७ वर्षात हजारो विद्यार्थी घडवले.त्यातील काही विद्यार्थ्यांनी स्वतःला खूप विकसित केले व आज ते जगप्रसिद्ध कंपनीत मोठ्या पगारावर मोठ्या पदावर काम करीत आहेत.
"असामान्य प्रेरेणेतूनच भावी पिढ्या घडत असतात" हे मानणार मी एक छोटा असामी आहे.
आज मी माझ्या सहकार्यांसोबत महाराष्ट्र, गुजराथ, कर्नाटक, व जम्मू-काश्मीर या राज्यात लाखो विद्यार्थ्यांना skill development चे प्रशिक्षण देत आहे . त्या-त्या राज्यांतील सरकारशी टायप
करून skill education देण्याचे काम करतोय. विद्यार्थी फक्त पदवीसाठी शिक्षण घेणारे होऊ नयेत तर प्रत्येकामध्ये असे skill निर्माण करणे की जेणेकरून शिक्षणानंतर प्रत्येकाला जॉब मिळेलच ,या विचारातून आम्ही या राज्यांमध्ये काम करीत आहोत.
माझ्या १७ वर्षाच्या कालखंडात अनेक मित्रांनी मला खूप पाठबळ दिले , मार्गदर्शन केले , त्या सर्वांप्रती येथे म पुढे वाचा

शिक्षण > व्यावसायिक शिक्षण,
टॅग्ज Jetking Sanjay Gandhi

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!