logo

Search Here

Yashawant Desai

किर्लोस्कर ऑईल इंजिन सारख्या कोर्पोरेट कंपनीमधील चांगल्या हुद्द्याची , चांगल्या पगाराची नोकरी सोडून अत्यल्प भांडवलामध्ये सुरु केलेला आणि आज कोट्यावधींची उलाढाल करीत असलेल्या आपल्या "पेरिनिअल टेक्नोलोजिस प्रायवेट लिमिटेड " कंपनीच्या वाटचाली बद्दल सांगताहेत कंपनीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत देसाई.

                                               “तत्वांच्या गुंतवणुकीवरील चिरस्थायी नफा”
 
उद्योग आणि व्यवसाय अभ्यासक्रमात पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दर वर्षी झपाट्याने वाढ होत आहे. असे असले तरी त्या तुलनेत तरुण उद्योजकांची  संख्या मात्र फारशी समाधानकारक नाही. या मागील कारणांचा आढावा घेतल्यास समाजात जोखमीच्या व्यवसायापेक्षा नोकरीतील सुरक्षतेला प्राधान्य देणारी अनेकांची सावध मानसिकता असल्याचे लक्षात येईल. तसेच व्यवसायासाठी मोठ्याप्र माणातच भांडवल हवे, प्रचंड अनुभव व पुरेसे मनुष्यबळ हवे, किंवा धूर्त, स्वार्थी व्यक्तीच व्यवसाय करू शकतो अशा अनेक भ्रामक कल्पना आजही समाजात कायम आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे व्यापार आणि उद्योगाच्या क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने भूषविल्या गेलेल्या एस. एल. किर्लोस्करांनी ज्या मराठी उद्योजकतेला नवीन ओळख मिळवून दिली त्या मराठी उद्योजकतेबाबत मराठी माणसातच आजही कमालीची नकारात्मकता बघावयास मिळते. मुळात आपली धोका पत्करण्याची तयारीच नसल्यामुळे आपण नोकरीच्या गुलामगिरीत नकळत फसले  जातो.
 भारताची औद्योगिक क्षेत्रात अधिकाधिक प्रगती व्हावी म्हणून अनेक व्यवसाय तज्ञ व यशस्वी उद्योजकांनी आपल्या अनुभवाद्वारे विविध गुरुमंत्र दिले आहेत. परंतु त्याकडे केवळ पुस्तकी ज्ञान म्हणून न बघता समोर येईल ती जोखीम स्वीकारून त्यास प्रत्यक्षात उतरवणारे व किर्लोस्करांचा  मराठी उद्योजकतेचा वारसा यशस्वीपणे पुढे कायम ठेवणारे फारच कमी असतात. त्यापैकीच एक म्हणजे सध्याच्या पेरिनिअल प्रा. ली चे संस्थापक श्री. यशवंत देसाई.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरु केलेल्या शाळेतून शिक्षण घेतलेल्या श्री. देसाई यांनी एनर्जी रेंटल क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यांच्या पेरिनिअल कंपनीला आज संपूर्ण भारतातून सर्वात जास्त प्राधान्य दिली जाणारी कंपनी म्हणून ओळखले जाते. शिक्षणाचा वारसा असलेल्या शेतकरी कुटुंबातील मुलाने स्थापिलेल्या कंपनीमध्ये आज जवळ जवळ ७० ते ८० हून अधिक उच्च शिक्षित अधिकारी व १०० पेक्षा जास्त तांत्रिक कर्मचारी कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना नदीच्या तीरावरील एका लहानश्या गावी जन्म झालेल्या श्री. देसाई यांनी बालपणापासूनच आपला स्वतःचा छोटा व्यवसाय करणाऱ्या आजोबांकडून प्रेरणा घेत नेहमीच स्वतःचा व्यवसाय करण्याचे स्वप्न बघितले होते.
पाटण तालुक्यातील कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरु केलेल्या विद्यालयातून दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. संपूर्ण कुटुंबात श्री. यशवंत देसाई व थोरले बंधु श्री. कृष्णाजी देसाई हे दोघेच केवळ शिक्षण घेत होते. शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शन देणे कुटुंबीयांना शक्य नसले तरी शाळेतील शिक्षक मात्र फार कळकळीचे असल्याने योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळाल्याचे ते नेहमीच सांगतात. शिक्षक कर्तव्यनिष्ठ असतील तर प्रत्येक विद्यार्थी भविष्यात यशस्वी होइलच अशी जणू खात्रीच देता येते याचा प्रत्यय त्यावेळच्या शिक्षण यंत्रणेवरून येतो.या गावातील प्रत्येक कुटुंबातील मुले उच्चशिक्षित होती. अशा वातावरणात वावरत असताना प्राथमिक शाळेत अभ्यासाविषयी काहीही गांभीर्य नसणाऱ्या श्री. देसाई यांनी पुढे मात्र अतिशय चिकाटीने उच्चशिक्षणाच्या ध्येयाचा पाठलाग केला.कोणत्याही क्षेत्रात गेले तरी तेथे उत्कृष्टता कायम ठेवण्याची वडिलधाऱ्याची शिकवण होती. आजोबांचा सदैव अव्वल येण्याचा आग्रह असे तर मोठा भाऊ अभ्यासात नेहमीच अग्रेसर असे त्यामुळे देखील अभ्यासात रुची वाढत गेल्याचे श्री देसाई सांगतात. त्यावेळी त्यांना शेतात अभ्यास करावा लागे परंतु त्याचे त्यांना काहीही वाईट वाटत नसून निसर्गाच्या सानिध्यात व निरव शांततेत अधिक एकाग्र चित्ताने अभ्यास होत असल्याचा अनुभव ते आवडीने सांगतात.अव्वल येण्याचा आग्रह असो वा मोठ्या भावाशी होणारी तुलना, शेतात अभ्यास करणे असो वा कमी शिक्षित कुटुंबीय किंवा कोयनेचा भूकंप असो वा पावसाळ्यात नदीला येणारा पूर या प्रत्येक परिस्थितीत त्यांनी नेहमीच सकारात्मकता शोधली. अलीकडे पालकांकडून सर्व भौतिक सुविधा मिळाल्या नंतरही अभ्यास न होण्याची कारणे शोधणाऱ्या व सतत तक्रार करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने श्री. देसाई यांच्या या वृत्तीचे नक्कीच अनुकरण करावे.इयत्ता सातवी मध्ये असतांना त्यांना गणितात पैकीच्या पैकी गुण मिळाले. त्या पेपर पुढे वाचा

उद्योजक > जनरेटर रेंटल,

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!