logo

Search Here

दीपमाला-एक तेजशलाका

पुणे शहरातल्या आपटे प्रशाळेतल्या गाण्याच्या तासाची विद्यार्थी आवर्जून वाट बघतात, कारण त्यांच्या आवडत्या दीपमाला मॅम शिकवणार असतात. अनेक महाविद्यालयीन गायन स्पर्धेत पहिला नंबर मिळवणाऱ्या दीपमाला लोहाडे मॅम इतकी छान तयारी करून घेतात की आत्त्तापर्यंत त्यांनाच तीनवेळा उत्कृष्ट संगीत शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. सर्वात अलीकडचा म्हणजे २०१५ सालचा पु. ग. वैद्य उत्कृष्ट संगीत शिक्षक पुरस्कार.

दीपमाला प्रकाश लोहाडे, जयपूरच्याअखिल भारतीय अनुराग संस्थेची परिक्षक, रेडिओ मिरचीची परीक्षक, झलक ग्रुपची गायिका, स्वत:चा दीपसरगम म्युझिक ग्रुप चालवणारी, जिने आपल्या शालेय वर्षांपासूनच गायन क्षेत्रात आपला ठसा उमटवायला सुरवात केली. त्या दीपमालाची आणखी एक ओळख आहे ज्यामुळे तिने मिळवलेल्या यशाचं महत्व वाढतं. अधोरेखित होतं.
 दीपमाला जन्मांध आहे.

  त्याचं असं झालं की, एकोणिसशे ब्याऐंशी साली लोहाडे कुटुंबामधे एक चमत्कार झाला. सात पिढ्यांनंतर त्यांच्याकडे एक कन्यारत्न जन्माला आलं. तोपर्यंत सगळे मुलगेच होत होते. श्री व सौ प्रकाश लोहाडेंना कन्येची आस होती ती पूर्ण झाली. तिचं स्वागत अक्षरश: बँड वाजवून करण्यात आलं. अशी ही अलौकिक तेज घेऊन आलेली दीपमाला. इतक्या वर्षांची मनोकामना पूर्ण झाली पण आपल्या लाडक्या कन्येचा नामकरण समारंभ मात्र दीपमालाच्या आईबाबांनी केला नाही, दुसरं तिसरं काही कारण नव्हतं, फक्त लोकांनी ही अलौकिक कन्या अंध आहे  हे   बघून हळहळून नावे ठेवू नयेत अवहेलना करू नये  . त्यामुळे तिचं जन्मनावच रुढ झालं दीपमाला।अतिशय जाणीवपूर्वक काही गोष्टी आवर्जून करणारे आणि काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळणारे आईबाबा मिळणे ही दिपमालाची पुण्याईच आहे. दुसरं अलौकिक देणं तिच्या गळ्यातल्या सुरांचं. हा आवाज, निसर्गानं गळ्यात पेरलेला सुरेल सूर हाच आज तिची ओळख बनलाय.
 बघायला गेलं तर कौटुंबिक पार्श्वभूमी सर्वसाधारण चारचौघांसारखीच. बाबा बँकेचे पिग्मी एजंट, आई गृहिणी. मारवाडी कुटुंब औरंगाबादसारखं तेव्हाचं निमशहरीगाव जिथे फारशा सोयीसुविधा नाही, स्वत:चे. शिक्षणही फार नाही तरीपण मनाचा आवाका प्रचंड. मुलीच्या अंधत्वाचा कुठेही बाऊ नाही. आपल्या मुलीच्या अंधत्वाचा बिनतक्रार स्विकार आणि बाहेरच्या जगात तिला जगण्यासाठी सक्षम करण्याचा निर्धार हे प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असणारा, लोकांच्या नानाविध प्रतिक्रिया झेलून दीपमालाला स्वावलंबी करण्यासाठीचा धीर, धाडस, दुरदृष्टी, आत्मबळ, दीपमाळाच्या आईबाबांनी कशी कमावली असेल हे समजून घेण्यासारखी गोष्ट आहे.
 मुलांच्या अंधत्वावर मात करण्यासाठी काही वैद्यकिय उपचार आहेत का याचा शोध घेतलाच आईबाबांनी तिच्या पण सगळीकडून यावर उपचार नाहीत असेच कळल्यानंतर मग सुरु झाला आपल्या मुलीच्या सर्वांगीण विकासाचा विचार, तिच्या अंधत्त्वासकट.
 सर्वप्रथम शालेय शिक्षण तारामती बाफना ब्लाईंड स्कूल ही खरतर अंध मुलामुलींसाठीची निवासी शाळा. अतिशय चांगली शाळा. पण दीपमालाच्या आईबाबांनी ठरवलं की  हिला या शाळेत घालायचं पण घरीच राहून. शिक्षणासाठी अनुकूल परिपूर्ण आणि पोषक वातावरण दीपमलाला या शाळेत मिळेल असा विश्वास होता
तिची रोज ने-आण करायची व्यवस्था केली. ज्यामुळे तिला बाहेरच्या डोळस जगात राहयची, वावरायची सवय  होईल. तिला पुढे डोळस जगात रहायचं आहे  याची पूर्ण जाणीव ठेवून तसंच वावरायला शिकवलं. आईबाबा स्वभावानं वृत्तीनं धार्मिक त्यात लहान दीपमालाला  संगीताची जाण आणि गायची हौस. मग मंदिरात गेलं  माईकसमोर गायचं हे ठरलेलंच. असेच एक दिवस गात असताना संगीतगुरु शिवराम गोसावी ह्याच मंदिरासमोरून जात असताना दिपमालाचा आवाज त्यांच्या कानावर पडला आणि ते थबकले कोण लहान मुलगी इतकं छान गातेय म्हणून उत्सुकतेपोटी  मंदिरात आले आणि बघितलं तर चिमुरडी दीपमाला आत्मविश्वासाने गाणं म्हणत होती. तिच्या आईबाबांना भेटून सांगितलं की मुलीला आवाजाची निसर्गदत्त देणगी आहे. आपण तिला गायनक्षेत्रात पुढे आणूया. मी शिकवीन  गाणं तिला. हा एक मोठा योगायोगच. दीपमालाच्या आयुष्याला संगीताचं कोंदणमिळवून  देणारा ! गोसावी सरांनी तिला चवथ्या वर्ष्यापासून गायला शिकवलं आणि पुढे सहाव्या वर्ष्यापासून हार्मोनियमही वाजवायला शिकवली.
 मग गोसावीसरांकडे गाणं शिकायला सुरुवात केली. औरंगाबाद्मध्ये विश्वनाथ ओक सर हे दिप्मालाचे सुगम संगीतातले गुरु. बाफना स्कूलतर्फे अनेक स्पर्धांमधे भाग घेऊन मोठमोठी बक्षिस मिळवली. एक गायिका घडत गेली, फुलत गेली.इकडे घरी मोठ्या भावाने तिला कॅरम खेळायला शिकवलं. या घरच्या पोषक वातावरणामुळे अंधत्वासकट आयुष्याचा आनंद घ्यायला शिकली दीपमाला. पण आईबाबांना दीपमालाला तिच्या बाफना स्कूलमधे मर्यादीत करायचं नव्हतं. तळ्यातला बेडूक घेऊन रहाणं तिच्या आईबाबांना नकोच होतं. पुन्हा एक धाडसी निर्णय. लेकिला पुण्याला शिकायला ठेवायचा. एकटीला हॉसटेलवर पाठवण्याचा ! डोळस शाळेत आठवीते दहा व पुढे वाचा

शिक्षण > शिक्षक,

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!