logo

Search Here

अनाथ मुलां साठी माई...

सिंधुताई सपकाळ ....म्हणजेच ..माई....वयवर्षे ६५, पहिल्या पासून ..काही तरी करण्याची जिद्द ..लग्न नंतर हि त्यांनी गावातल्या महिलां साठी त्यांच्या हक्क साठी लढा केला ...पण त्याचा मोबदला म्हणजे त्यांना त्यांच्या नवर्याने व सासर कड्च्यांनी घर बाहेर काढले लहान मुली सोबत ...पण २१ वर्ष च्या माईनि धीर सोडला नाही .. पूर्वी चे दिवस फार कठीण गेले ...पुणे च्या रेल्वे स्थानकावर भिक मागून गेले ... पण जे काही मिळायचे ते पण स्वतःकडे न राखून बाकीचे जे भिकारी आहेत त्यांना वाटायचे ...खास करून लहान मुलांना ...

त्यांचा एका मुलाखतीत त्या म्हणाल्या.." मला जेव्हा घर बाहेर काढले तेव्हा जगण्या साठी मी भिक मागायचे, पण आज पण मी कटोरा घेऊन सगळी भिक मागत असते, फरक फक्त एवढाच आहे कि, पूर्वी स्वतः साठी भिक मागायचे आणि आता माझी मुलांसाठी". पुढे जेव्हा त्यांना आपल्या पूर्वी च्या आयुष्य बद्दल विचारले असता त्या म्हणाले कि "मी माझ्या पतीचे खूप आभार मानते कि जर त्यांनी मला घर बाहेर नाही काढले असते तर आज मी या ठिकाणी येऊन पोहोचली नसती... ते सुद्धा माझ्या आश्रमात राहतात ....खूप थकले आहेत आता ..त्यांना बघणारे कोण नव्हते म्हणून मीच त्यांना इथे आणले.. पण त्यांना आणताना मी स्पष्ट सांगितले कि इकडे यायचे असेल तर माझा मुलगा म्हणून या .. पती म्हणून नव्हे..." हे ऐकून मुलखात घेणारे.. थक्क झाले...आणि ती मुलखात बघणारे सुद्धा...!!!!!अर्ध्याहून जास्त आयुष्य अनाथ मुलां साठी घालवले त्याच माई...

Source ;- http://mysindhutaisapkal.blogspot.in/

"चिंधी" ही अभिराम साठे या अतिसामान्य शेतकऱ्याची मुलगी. हिला शाळेत जाण्याचा व नवीन गोष्टी शिकण्याचा खूप उत्साह. पण आईचे मत असे कि मुलीला शाळेत घालून, शिकवून काय उपयोग. लग्नाचे वय झाले कि लग्न करावे झाले. शिवाय घरकाम यायला पाहिजे त्यामुळे आई सतत घरात काही न काही काम सांगायची. शिवाय म्हशी चरायला नेणे हि पण "चिंधी" चीच जबाबदारी. बिचारी, म्हशींना चरायला सोडून अर्ध्या सुट्टीनंतर का होईना पण शाळेत दाखल होत असे. मन लावून अभ्यास करीत असे. उशिरा येऊन देखील मुलगी ४ थी पास होते. ४ थी पास झाल्यावर हिच्या आईला खूप घाई होते, कि आता हिचे लग्न करायचे. वडील मनाने आणि विचाराने पुरोगामी असतात, पण बायकोपुढे त्यांचे काही चालत नाही. त्यामुळे ह्या १० वर्षाच्या मुलीचे एका टोणग्याबरोबर लग्न लावून देण्यात येते. सासरी २ दीर, सासू, सासरे व दिरांची मुले अशी बरीच मंडळी असतात. आता शिकणे वगेरे तर दूरच राहते, पण घरात सासूच्या हाताखाली राब राब राबावे लागते. त्यात सासू सारखी नवऱ्याचे काही न काही कान भरतच असते.

या सगळ्या त्रासात देखील चिंधी तिच्या वाचनाचे वेड सोडत नाही. घरात कुठलाही पेपरचा कागद घरी आला कि त्यावर लिहिलेले सगळे वाचून काढायचे असा उपक्रम सुरु करते. बरेच वेळा ती वाचत असताना, सासू बोलते, तेव्हा कागद लपवून ठेवून नंतर वाचायचा असे करून तिचे वाचनाचे वेड पूर्ण करते.

लग्न झाल्यानंतर माहेर तर सुटल्यासारखेच असते. वडील मधून-मधून चिंधीला भेटायला येतात. काही वर्ष्यांनी हिला ३ मुले होतात. यांच्या गावात जंगलात जाऊन शेण गोळा करायचे आणि ते गावातील कंत्राटदाराला द्यायचे. तो कंत्राटदार ते शेण जाऊन विकतो, पण गावातील लोकांना त्याच्या बद्दल काहीच मोबदला मिळत नाही. चिंधीच्या हे कधीच लक्षात येते, पण गावात कोणाचीच हिम्मत नसते याबद्दल बोलण्याची. त्याच दरम्यान चिंधीला चवथ्यांदा दिवस गेलेले असतात. चिंधी या कंत्राटदारा बद्दल मोठ्या वन अधिकाऱ्याकडे तक्रार करते. यामुळे चिंधी बद्दल सगळ्या गावात खूप आदर वाढतो. घरी पण अचानक सासू, आणि जावा तिची एकदम काळजी करायला सुरवात करतात.

पण हे प्रेम काही खूप काळ टिकून राहत नाही. गावातील कंत्राटदार चिंधीच्या नवऱ्याचे कान भरतो कि तुझ्या बायकोच्या पोटातील मुल तुझे नसून माझे आहे. हिचा नवरा इतक्या हलक्या कानाचा असतो कि त्याला ते सगळे खरेच वाटते. आणि नवव्या महिन्यातील गर्भारशीला घराच्या बाहेर काढण्यात येते. कधीहि बाळतीन होणार अश्या स्थितीत असलेली, चिंधी कोठे जाणार? हि बिचारी घरातील गोठ्याचा सहारा घेते. आणि तिथेच तिचे बाळंतपण होते. कोणीच नाही जवळ, स्वताच बाळाची नाळ तोडते. ओळी बाळंतीण घर, गोठा सोडून माहेरी जायला निघते. हातात पैसे नाही, खायला अन्न नाही, हातात तान्हे बाळ, जाऊन जाऊन कुठे जाणार. चिंधी कसे बसे माहेरी पोचते. वडील काही वर्षापूर्वीच गेले असतात, फक्त आईच असते. आई तिला बघून म्हणते कि तू इथून निघून जा, तोंड काळे केल्यावर इथे का आलीस. इतक्या छोटा मुलीला घेऊन कुठे जाऊ असे विचारल्यावर आईचे उत्तर असते कि कुठेही जा, कुठेच नाही जमले तर विहिरीत उडी मार. अशी प्रतिक्रिया आल्यावर चिंधी अगदी हिरमुसली होते. आणि आत्म्यहत्या करायला म्हणून रेल्वेच्या रुळावर जाते.

सिंधुताई जसे तिच्या नवऱ्याला त्यांच्या आयुष्याला वळण दिल्याचे श्रेय देते, तसेच त्यांच्या आईने हाकलून दिल्यामुळे पण, चिंधीच्या मनात जगण्याची इच्छा निर्माण झाली असावी. 

"देवा आम्हाला हसायला शिकव परंतु आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नकोस."

Source ;- http://cinema-baghu-ya.blogspot.in/

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!