logo

Search Here

सुजाता मस्तानी सचिन कोंढाळकर

अस्सल फळांची चव तुफानी करणाऱ्या सचिन कोंढाळकर यांची कथा

‘सुजाता मस्तानी’
   बाहेर तापमानाचा पारा वाढायला लागला की पावलं आपोआपच जिथे येऊन  थांबतात ते पुण्यातलं ठिकाण म्हणजे ‘सुजाता मस्तानी’
   उन्हामुळे जेवण नीट केलेलं नाहीये मुलांनी तरी पुण्यातला आईवर्ग फारशी चिंता करत नाही कारण एक सुजाता मस्तानी मुलांच्या पोटात गेली की तिला त्यांचं पोट भरायची चिंता नसते. शुद्धतेची खात्री आणि चवीची तर त्याहूनही खात्री जास्त!
   कुठलाही खास प्रसंग साजरा करायचा असेल तर जायचं कुठं हा प्रश्‍न तरुणाईला पडतच नाही. सुजाता मस्तानीनं तो आधीच सोडवून ठेवला आहे.
१९६७ पासून पुणेकरांच्या जिभेला आपल्या गारेगार आणि मऊशार पोताचं चवीतल्या वैविध्यानं वेड लावलेली ही ‘सुजाता मस्तानी’. या जादूचे किमयागार. सचिन कोंढाळकर यांच्या उद्योजकतेला दाद द्यावी तितकी कमीच आहे.
   तसा हा व्यवसाय पिढीजात आहे. कोंढाळकरांच्या आजोबांचा टांग्याचा व्यवसाय होता व नंतर साधी पानाची गादी होती. मग वडिलांनी शेजारचा गाळा घेऊन तिथे भेळ, आईस्क्रिम असं विकायला सुरवात केली. आणि पुढे आईस्क्रिमनं शर्यत जिंकली.
त्याकाळी आईस्क्रिम्स तयार व्हायची ती हातानी फिरवायच्या आईस्क्रिम पॉटमधे त्याला लागणारा बर्फ, दूध, त्यात घालायचे फ्लेवर्स असा सगळा व्याप लहानपणापासून सचिन कोंढाळकरांच्या नजरेस पडतच होता. यात त्यांच्या वडिलांनी अनेक प्रयोग केले. चवीचा दर्जा वाढवण्यासाठी ही प्रयोगशीलता लहानपनापासूनच सचिन कोंढाळकरांच्या मनात रुजली असणार यात शंका नाही.
   ‘मस्तानी’ या अद्वितीय पेयाचा जन्म जरी कोंढाळकरांच्या दुकानातला नाही, तरी सध्याचं स्वरुप मात्र निश्चितपणे कोंढाळकरांच्याच कल्पनेतलं. आधी दूध कोल्ड्रिंक हा प्रकार प्रचलित होता. थंड केलेले दूध, थोडासा बर्फ, त्यात फ्लेवर घातलेला. त्यात मग वर एक आईस्क्रिमचा गोळा असं सुरवातीचं मस्तानीचं स्वरुप होतं. पण मग त्यामधे दूध-कोल्ड्रिंकची चव आणि वरच्या आईस्क्रिमची चव यात फरक पडायचा. बर्फ वितळून खालचं मिश्रण अजूनच पातळ, पाणचट व्हायचं. हे काही बरोबर नाही असं म्हणून कोंढाळकरांनी बर्फ काढून टाकला. दूध आटवायला  लागले आणि मग टप्याटप्यानि प्रयोग करत करत ‘मस्तानींची’ रेसिपी प्रगल्भ झाली ; सेट झाली.
   सचिन कोंढाळकर दहावीपासून दुकानात लक्ष घालत होतेच. सुरुवातीला पानाची गादी आणि मस्तानी हाऊस असं दोन्ही चालायचं. वडिल, आत्येभाऊ आणि सचिन या तिघांनी ही जबाबदारी वाटून घेतली होती. नंतर पानाची गादी बंद करुन संपूर्ण लक्ष मस्तानी हाऊसवर केंद्रित करायचं ठरलं.
    साधारण १९६२ पर्यंत कोंढाळकरांचे वडिल कार्यरत होते. व्याप तसा प्रचंड, यंत्रसामुग्री मर्यादीत. बरीचशी भिस्त कामगारवर्गावर. तरीही ग्राहकांचा प्रतिसाद चांगलाच होता. दर्जाच्या बाबतीत, शुद्धतेच्या बाबतीत कधीही, कोणतीही तडजोड आजतागायत केलेली नाही. सगळ्या प्रोसेसमधे स्वत:चं वैयक्तिक लक्ष यामुळे व्यावसायिक यश सुरवातीपासूनच साथ देत होतं.
हळूहळू वडिलांनी सचिन कोंढाळकरांवर जबाबदारी सोपवली. लहानपणापासून दृष्टीसमोरच सगळा व्याप असल्यानं व्यावसायिक शिक्षण तर होतच होते. जोडीला बृह्नमहाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या बी.कॉम. एम.कॉम अशा पदव्यांनी ज्ञानाची क्षितिजं विस्तारत गेली. व्यवसायवृद्धी करायची तर त्यातलं प्रॅक्टिकल ज्ञान जितकं महत्त्वाचं तितकंच येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची, माहिती असणं महत्त्वाचं. साधारणपणे १९९२ पासून पुढची सात-आठ वर्ष ही नवनवीन फ्लेवर्स मशिनरी, रेसिपी, नवनवीन प्रक्रिया यांची माहिती गोळा करणे, समजून घेणे आपल्याला काय-काय शक्य आहे काय करता येईल याचा शोध घेणे यात गेली. ही व्यवसायतली  नॉलेज इन्व्हेस्टमेंट. त्यात १९९१ साली दुकानात कामगारांचा संप झाला. चार महिने संप चालला. हा एक विचारांना कलाटणी देणारा काळ होता असं म्हटलं तरी फारसं वावगं ठरणार नाही. या अनुभवातून जाताना मग कुठेतरी ऑटोमेशनचा विचार पक्का झाला. पण हवी तशी मशिन्स बाजारात उपलब्ध नव्हती. मग ती तयार करुन घेणे त्याचा पाठपुरावा करणं ओघानं आलंच. शिवाय मशिनप्रमाणे  रेसिपी बदलायची नाही तर आपल्या रेसिपीप्रमाणे आईस्क्रिम्स् करणारी मशिन्स शोधायची, तयार नसतील तर बनवून घ्यायची हा बाणा आणि कष्टाची तयारी. यशलक्ष्मीनी अशांच्या घरी पाणी नाही भरायचं तर कुणाच्या?
     वेगळा विचार करणारे लोक थोडे जगात पण असतात. कोंढाळकरांनाही त्यांच्या गरजेप्रमाणे आईस्क्रिम्स, शेक्स बनवणारी मशिन्स करुन देणारी लोकं भेटली आणि जवळजवळ दहा वर्षांच्या शोधानंतर जागाही पुढे वाचा

उद्योजक > अन्न उत्पादने,

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!