logo

Search Here

मानसोपचार तज्ञ डॉ. विद्याधर वाटवे

मी आजवर ‘इंडिअन सायकीएट्रीक सोसायटीचा’ मेंबर या नात्याने खूप काम केलं..आणि करत राहीन..माझ्याकडे कामाला असणारे माझेच दोन पेशंट आहेत..जे त्यांच्या आजाराच्या पहिल्या दिवसापासून आहेत..आणि इथेच काम करतात.. गेली वीस वर्ष..! याहून मला समाधानाची दुसरी गोष्ट नाही..!!

                                                                                     ‘ओअॅसीस’
                                                                                विद्याधर वाटवे
     माझा जन्म बेळगावला झाला. माझे आजोबा वैद्य होते आणि वडील बेळगाव मधे संस्कृतचे प्राध्यापक होते. नंतर ते पुणे विद्यापीठात  ‘अॅडव्हान्स सेंटर फॉर संस्कृत स्टडीज’ या विभागात नोकरी करायला आले.. म्हणून आम्ही पुण्यात आलो आणि माझे आठवी नंतरचे सगळे शिक्षण पुण्यात झाले. आई गृहिणी होती. मी आणि माझा भाऊ श्रीधर अशी त्यांना दोन मुले..
     माझे पाहिल्या पासूनच मेडिकलला जायचे पक्के ठरले होते. घरात आजोबा वैद्य असल्याने तसे वातावरण होतेच..बी.जे.मेडिकलला १९६४ मध्ये प्रवेश मिळाला..मला केवळ ६५% असूनही...! कारण तेंव्हा इतकी स्पर्धा नव्हतीच. शाळेपासून नाटकाची खूप आवड होती. पण मेडिकलला गेल्यावर ही नाटकाची आवड आपण कोणालाही कळू द्यायची नाही असं मी मनातून ठरवलं होतं. कारण त्यात मग अडकायला होणार हे माहित होतं. पण कोणीतरी सांगितलंच की हे विद्याधर वाटवे.. शाळेत नाटकात काम करायचे..मग काय,जब्बार पटेलनेच आम्हाला गाठलं आणि पुन्हा माझं नाटक सुरु झालं...डॉ .मोहन आगाशे, श्री. सतीश आळेकर,यांच्यासोबत मग मी थिएटर अॅकॅडमी मध्ये जाऊ लागलो... पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत डॉ. पानवळकर आणि डॉ. परदेशी यांच्याबरोबर मी ‘पाच दिवस’ नावाच्या एकांकिकेत काम केलं...ज्यात मला प्रथम पारितोषिक मिळालं. मग ‘लोभ नसावा हि विनंती’ हे अजून एक नाटक पटेलांनी बसवलं, ज्यात मी काम केलं. ‘घाशीराम कोतवाल’ मध्ये काम केलं... डॉ.पटेलांनी ‘खेळिया’ नावाचे नाटक बसवले..या नाटकाचे आम्ही जवळजवळ ४० ते ५० प्रयोग केले...मी जे जग बघितलं ते सगळं या नाटकाच्या प्रयोगांच्या निमित्तानेच...!
     माझा ओब्सेसिव्ह स्वभाव हेच नाटक करण्यामागचं खर कारण आहे असं मला नेहमी वाटतं...मी सिरीयल मधेही काम केलं...एम्.बी.बी.एस्.झालो...मग डी.पी.एम्.केलं...मग असं वाटलं की सायकिएट्री मध्ये एम्.डी.करावं... खूप खटाटोप केले...बी.जे. ला तेंव्हा एम्.डी. नव्हतं..म्हणून मग  A F M C ला प्रयत्न केले..प्रवेश मिळाला पण तेवढ्यात इकडे बी.जे.ला M Dते सुरु झालं..मग बी.जे.लाच केलं..
सायकिएट्री म्हणजे वेड्यांचा डॉक्टर असं जरी सामान्य मणसाला वाटत असलं तरी आता हे क्षेत्र खूप पूर्वीसारखं फ्रॅईड आणि एवढच मर्यादित राहिलेलं नाही..या क्षेत्रात पूर्वी कमी इमर्जन्सीची शक्यता होती.. त्याचा विचार करून मी ते निवडलं खर... पण आज मला कितीदा तरी धावाधाव करावी लागते....इमर्जन्सी येते...आत्महत्येसारख्या कितीतरी घटना घडत असतात..तेंव्हा आता हे क्षेत्रही खूप कामाचा ताण असलेल होत चाललं आहे..
     १९८० मध्ये मी एम्.डी. झालो आणि जवळजवळ १९९२ पर्यंत नाटक आणि माझा व्यवसाय दोन्ही आघाड्यांवर काम करण्याची कसरत करत राहिलो...नाटकांच्या प्रयोगासाठी जगभर फिरलो...दौरे केले.. नाटकानेच मला माझा आयुष्याचा जोडीदार दिला..त्यावेळी ती बी.एस्.सी. झाली होती..पण विवाहानंतर तिने माझ्या क्षेत्राचा विचार करून परत कलाशाखेत प्रवेश घेऊन मानसशास्त्र विषयात बी.ए. केलं आणि नंतर एम्.ए.देखील केलं...पुढे जाऊन P.hd पण केलं..माझ्यासोबात २० वर्ष क्लिनिकल सायकोलॉजीस्ट म्हणून काम केलं...आणि आता त्या ज्ञानप्रबोधिनी मध्ये गिफ्टेड मुलांकरीता काम करतात..आमच्या घरी जे रात्री १० ते १ या वेळात क्लिनिक चालतं त्यात त्या माझ्यासोबत काम करतात..मी सकाळी ९ ते रात्री ९ पूना हॉस्पिटलमधे काम करत असतो.. आणि रात्री घरी जाऊन परत ताजातवाना होऊन १० पासून पेशंट बघतो...ते पार १ वाजेपर्यंत..!
    सुरुवातीच्या काळात मी  माझं काम आणि अभिनय यांची सांगड घालण्यासाठी खूप धडपड केली..मी तेंव्हा एका ‘महानगर’ नावाच्या विनय धुमाळे यांच्या सिरीयल मध्ये काम करत होतो. त्यात नाना पाटेकर काम करायचे.. मी श्रेयश हॉस्पिटल मधून पेशंट बघून निघायचो..स्कूटर ला किक मारून रणजीत हॉटेल मध्ये जायचो..नाना पाटेकरांसोबत एक सीन करायचो..परत हॉस्पिटल मध्ये येऊन पुढचे पेशंट बघायचो..बेन्जामिन गिलानी यांच्यासोबत पण एका सिरीयल मध्ये काम केलं..पुढे १९७६ मध्ये गिरीश कर्नाड जेंव्हा फिल्म इंस्टीटयूटला प्रमुख होते तेंव्हा त्यांनी असं सुचवलं कि तुमच्यासारखा माणूस इथे फिल्म इंस्टी पुढे वाचा

व्यवसाय > मनोसोपचार तज्ञ,
टॅग्ज Dr. watve psychiatrist

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!