logo

Search Here

Rajendra Gaikwad

......राजेंद्रना आपण पाहताक्षणी आपल्यावर छाप पडते ती त्यांच्या हसऱ्या, उमद्या व्यक्तिमत्वाची आणि त्याला जोड आहे ती अत्यंत गोड वाणीची. त्यांचं बोलणं पहिल्याच भेटीत कुणालाही आपलंसं करेल असं आहे.

''अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही, अत्यंत जिद्दीने आणि धडाडीने त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, आपल्या दुर्दम्य आत्मविश्वासाच्या जोरावर एखादा अत्यंत गरीब कुटुंबातला मुलगा - एक अत्यंत यशस्वी उद्योजक बनतो, एव्हढंच नव्हे तर भारताबाहेरही आपल्या व्यवसायानिमित्त ऑफिस थाटतो'' हे अत्यंत दुर्मिळ आणि विस्मयकारक वाटावं असं उदाहरण आज आपल्यामध्ये आहे ते 'राजेंद्र शंकर गायकवाड' यांच्या रूपाने! आणि एव्हढा मोठा उद्योग उभा करताना, त्यासाठी पडेल ते कष्ट उचलताना त्यांनी आपल्या आईची एक शिकवण मात्र सुरुवातीपासून जपली आणि अंगिकारली ती म्हणजे,'' कुणाला फसवायचं नाही, लुबाडायचं नाही''!....

......राजेंद्रना आपण पाहताक्षणी आपल्यावर छाप पडते ती त्यांच्या हसऱ्या, उमद्या व्यक्तिमत्वाची आणि त्याला जोड आहे ती अत्यंत गोड वाणीची. त्यांचं बोलणं पहिल्याच भेटीत कुणालाही आपलंसं करेल असं आहे. आणि शून्यातून एव्हढा मोठा पसारा निर्माण करतानाही त्यांची वृत्ती आणि आचार अत्यंत निगर्वी असेच आहेत. आपल्या यशाचं श्रेय ते निसर्गातल्या शक्तीला देतात. त्याचं म्हणणं आहे की नियतीनेच बहुदा मला मोठं कारायचं ठरवलं आणि म्हणून मला आयुष्याच्या विविध टप्प्यांवर उत्तम साथ देणारी, मदत करणारी माणसं भेटत गेली.

         त्यांच्या विस्मयकारी यशाचा आलेख आपण थोडक्यात पाहू या.

राजेंद्रजींचे वडिल आपलं सहामुलांचं कुटुंब घेऊन पुण्यात गाडीतळावर एका अगदी झोपडीवजा घरात राहायला आले. पुढे तो 12जुलै 1961चा पानशेतचा प्रलय झाला. त्यांतून वाचलेल्या आणि बेघर झालेल्या अनेक कुटुंबाचं शासनातर्फे पुनर्वसन करण्यात आलं आणि अशातऱ्हेने राजेंद्रजींचं लहानग्या वयात दत्तवाडीमध्ये खडतर जीवन सुरू झालं. कमालीची गरिबी. त्यामुळे शाळकरी वयात एका वीटभट्टीसमोर उभं राहून त्यांनी आलेपाक, पापड विकून घरासाठी चार पैसे कमवण्यासाठी प्रयत्न केले.

        पुढे बारावीनंतर शिक्षण सुटलं पण विठ्ठलराव गाडगीळांच्या वाड्यावर काम मिळालं. त्यातूनच 'फॉगींग मशीन' हाताळण्याचं तंत्र शिकता आलं आणि या फॉगींग मशीनचा मेंटेनन्स टेक्नीशियन म्हणूनच त्यांचं काम सुरू झालं. सुरुवातीला पाठीवर ते मशीन लटकावून सायकलवर फिरून कामं करता करता श्री. थावरे यांची ओळख झाली आणि त्यातूनच पुढे दोघांच्या आडनावांच्या इंग्लीश आद्याक्षरांतून 'G. T. pest control 'चा जन्म झाला.

        दैव्य प्रसन्न झालं आणि वेंकटेश्र्वर हॅचरीजच्या पोल्ट्रीमधल्या उंदरांचा बंदोबस्त करण्याचं काम मिळालं... त्यात त्यांनी इतकी चोख कामगिरी बजावली की लवकरच पुणे आणि आसपासच्या पोल्ट्री व्यावसायिकांत त्यांची प्रतिमा जणू त्या जर्मन दंतकथेतल्या 'पाएट पायपर ऑफ हॅर्मालन' सारखी झाली. 'उंदीर  झालेत ?'बोलावं गायकवाडांना ....' माझ्या, ढेकूण त्रास देतायत ?' बोलवा गायकवाडांना !.... असं करत करत राजेंद्र गायकवाडांच्या G. T. pest control ने स्वतः:ची अशी एक इमेज तयार केली. व्यवसायाचा विस्तार वाढत असतानाच एकीकडे त्यांनी राजकारणाची चव ही घेऊन पहिली - तर दुसरीकडे समाजकारण ते सांभाळत होतेच. लोकांना मदत करण्याच्या परोपकारी वृत्तीमुळे त्यांनी अफाट माणसं जोडली आणि अनेकांचा दुवा मिळवला.

....पुढे मनाजोगती पत्नी मिळाली आणि सुरुवातीच्या कठीण काळानंतर पुढे व्यवसायाच्या भरभराटीनंतर त्यांचं वैवाहिक जीवनही सुंदर प्रकारे फुललं....

फक्त 'माश्या, उंदीर, ढेकूण' अश्या पेस्टचा कंन्ट्रोल एव्हढ्यावरच न थांबता त्यांनी नवनवीन तंत्र आत्मसात करून ''प्रीकन्स्ट्रक्शन अॅन्टीटरमाईट ट्रीटमेंट'' आणि ''एकस्पोर्ट फ्युमिगेशन'' सारख्या नवीन उद्योगांतही प्रवेश केला आणि आपल्या व्यवसायाचा विस्तार केला.

व्यक्तिगत आयुष्यात एकीकडे हळवे असणारे राजेंद्रजी, प्रसंगी भुतांचा अनुभव घेण्यासाठी रात्री बारा वाजता स्मशानात मुक्काम ठोकण्याइतके धाडसीही आहेत आणि थेट सिंगापूरला ऑफिस थाटण्याइतके धडाडीचेही आहेत!

समस्त गायकवाड कुटुंबियांचे अभिष्टचिंतन!

धन्यवाद!

 

उद्योजक > पेस्ट कंट्रोल,
टॅग्ज kalidas aapal ghar

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!