logo

Search Here

नरेंद्र बऱ्हाटे

'सीड इन्फोटेक' ह्या सुप्रसिद्ध कंपनीचे रचिते आणि प्रमुख व्यवस्थापकीय संचालक आणि डायरेक्टर ह्या नात्याने काम पाहणारे श्री. नरेंद्र बऱ्हाटे सांगतात की त्यांचा एका गोष्टीवर पूर्ण आणि ठाम विश्वास आहे आणि ती म्हणजे, ''आपला जर स्वकर्तृत्वावर विश्वास असेल, तर जगात अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा साध्य होऊ शकतात ! आपलं मन हा एक अक्षय्य ऊर्जास्रोत आहे

नरेंद्र बऱ्हाटे ! एक प्रचंड उत्साहाचा धबधबाच जणू ! त्यांच्याशी बोलताना, त्यांच्यातल्या  अथक ऊर्जेने आपण अक्षरश: भारुन जातो ! त्यांच्याशी बोलताना कुठलाच बेतशुद्धपणा आड येत नाही, त्यांचं नर्मविनोदी, हजरजबाबी बोलणं आणि स्पष्टवक्तेपणा क्षणार्धात त्यांच्यातली आणि आपल्यातली दरी कमी करतो आणि आपण कधी दिलखुलास गप्पांना सुरुवात केली, ते आपल्याला कळतही नाही. त्यांची अक्षय्य ऊर्जा आणि त्यांचं  स्वानुभवातून आलेलं प्रचंड ज्ञान, ह्यांनी आपण प्रभावित तर होतोच, पण त्याचवेळी आपल्यालाही कुठेतरी आत्मपरिक्षण करायला भाग पाडतं की, "अरे, आपण तरी आपल्या स्वतःमधले सर्व सुप्त गुण ओळखून त्यांना वाव आणि न्याय दिलाय का?'' त्यांच्याशी बोलताना, त्यांच्या आयुष्याचा प्रवास जाणून घेताना हे लक्षात येतं, की एखाद्या लढवय्या योध्द्याच्या थाटात, त्यांनी जिद्द आणि चिकाटी रुपी चिलखतच जणू अंगावर चढवून, ह्या खडतर आयुष्याशी दोन हात करून विजय, यश प्राप्त केलंय !

'सीड इन्फोटेक' ह्या सुप्रसिद्ध कंपनीचे रचिते आणि प्रमुख व्यवस्थापकीय संचालक आणि डायरेक्टर ह्या नात्याने काम पाहणारे श्री. नरेंद्र बऱ्हाटे सांगतात की त्यांचा एका गोष्टीवर पूर्ण आणि ठाम विश्वास आहे आणि ती म्हणजे, ''आपला जर स्वकर्तृत्वावर विश्वास असेल, तर जगात अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा साध्य होऊ शकतात ! आपलं मन हा एक अक्षय्य ऊर्जास्रोत आहे आणि आपली कर्तृत्वशक्ति ही खरं तर अथांग आहे!'' आणि ह्या विश्वासानेच श्री. बऱ्हाटे आजही सतत नवनवीन गोष्टी आत्मसात करून स्वतःमधल्या सुप्तगुणांना वाव देऊन काही ढाशीव कार्य करु पाहताहेत !

सर्वसामान्य परिस्थितीत जन्माला येऊन, केवळ अथक परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपलं आयुष्य घडवलंय !  त्यांना आयुष्यात  कायमच  खडतर परिस्थितीला तोंड द्यावं  लागलं, पण '' येईल अंगावर, तर घेईन शिंगावर'' अशा अत्यंत झुंजार आणि पराक्रमी वृत्तीने त्यांनी आलेल्या संकटांना सामोरं जात, त्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढलाय. जळगाव जिल्ह्यातल्या, भुसावळ  जवळच्या 'पडळसे' नामक छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्यात पिढयानपिढया 'शेती' हाच व्यवसाय होता. पण त्या बऱ्हाटे घराण्यात प्रथमच नरेंद्रच्या वडिलांनी वयाच्या 20 व्या वर्षी नोकरी करायची ठरवून ते घराबाहेर पडले. सुरुवातीला त्यांनी 'क्लीनर' ची नोकरी केली. त्यावेळी जेमतेम पंचवीस रुपये पगार होता. पुढे मग त्यांना महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळात नोकरी लागली आणि त्यातूनच त्यांची पुण्याला बदली झाली. त्यांचं शिक्षण जेमतेम अकरावीपर्यंत झालेलं तर त्यांची पत्नी सातवीपर्यंत शिकलेली. पण दोघांनी आपल्या मुलाला, नरेंद्रला शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

वडिलांच्या पुण्यात झालेल्या बदलीमुळे, त्यांचं कुटुंब पुण्यात आलं  आणि लहानग्या नरेंद्रचं शिक्षण पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात सुरु झालं. प्राथमिक शिक्षणासाठी नरेंद्रला प्रवेश मिळाला होता, भांडारकर  रोड वरच्या बालशिक्षण मंदीरात. तर त्यावेळी ते राहात होते खडकी मध्ये. साहजिकच त्या कोवळ्या वयात नरेंद्रला शिक्षणासाठी खडकीहून इतक्या दूर यावं लागे. पण त्याची त्याबद्दल कोणतीच तक्रार नव्हती, किंबहुना त्याला त्यात आनंदच वाटायचा. नरेंद्रशी  बोलताना जाणवते की  त्यांच्याकडे आपल्या बालपणीच्या खूप रम्य आठवणी आहेत. त्यावेळी त्याच्यावर झालेले आई-वडिलांचे आणि सभोवतालच्या परिस्थितीचे संस्कार, त्याला पुढच्या आयुष्यातल्या यशासाठी उपयोगी पडले.

वेळप्रसंगी त्याच्या आई-वडिलांना पैशाची चणचण भासे, पण आपल्या मुलाला त्यांनी त्याची झळ लागू दिली नाही. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत ते सगळेजण आवर्जून आपल्या गावी जात, आणि तिथे गेल्यावर शेतात जाऊन तिथल्या मंडळींशी गप्पा मारायला त्यांच्याबरोबर शेतीची कामं शिकायला नरेंद्रला भारी आवडे ! असं वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांबरोबर मिळून-मिसळून, काम  करण्याच्या वृत्तीचा, नरेंद्रला पुढे जाऊन त्याच्या व्यवसायात खूपच फायदा झाला.

शेतकऱ्यांत मिळून-मिसळून, इतक्या जवळून त्यांचं काम पाहिल्यामुळे, नरेंद्रला पावसावर शेती कशी आणि का अवलंबून असते, आणि चांगला पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर कोणता दूर्धर प्रसंग ओढवतो त्याची चांगलीच जाण आली. त्यातून नरेंद्र एक गोष्ट मात्र शिकला की संस्कार ही काही दागिन्यांसारखी मिरवायची गोष्ट नाही, तर संस्कार हे साधन आहे खाचखळग्यांनी भरलेल्या आयुष्यातून व्यवस्थित मार्ग काढून यशस्वी होण्यासाठी ! नरेंद्र हे मानतात की क पुढे वाचा

शिक्षण > आय टी प्रोफेशनल ट्रेनिंग,

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!