logo

Search Here

Hemant S. Revankar

एकीकडे चालू व्यवसाय वाढवतानाच हेमंतराव आजूबाजूला होणा-या घडामोडींच्या बाबतीत जागरूक होतेच. अल्फा लाव्हलच्या एका अधिकारी व स्नेह्यांनी एकदा बोलता बोलता सौर उर्जेच्या क्षेत्रात पाऊल टाकण्याबद्दल सुचवलं. पारंपरिक उर्जा स्रोतांची आणि इंधन पुरवठ्याची टंचाई हळूहळू जगभर जाणवू लागली होतीच.

   

पुणे सातारा रोडवर बिपिन इंजिनियर्सच्या फॅक्टरीत पाऊल ठेवलं की सगळ्यात आधी जाणवते ती म्हणजे टापटीप आणि स्वच्छता. सामान्य माणसाची शॉपफ्लोअरबद्दल असलेली कल्पना म्हणजे भलीमोठी काळवंडलेली यंत्रं, तेलाचे डाग पडलेली फरशी आणि चहूकडे पडलेला कच्च्या मालाचा किंवा ‘वेस्टेज’चा पसारा. इथे मात्र वेगळंच चित्र दिसतं. सगळं कसं जागच्याजागी ठेवलेलं आणि शिस्तीत काम चाललेलं. अगदी एखाद्या घरावर सुगरणीचा हात फिरलेला असतो तसं. आश्चर्य वाटायला नको, कारण सध्या बिपिन इंजिनियर्स मध्ये ‘लीन मॅनेजमेंट’ चा उपक्रम चाललाय आणि त्यावर जातीनं देखरेख करताहेत सौ. नंदा रेवणकर, म्हणजेच बिपिनचे संस्थापक हेमंत रेवणकर यांच्या पत्नी आणि कंपनीच्या संचालिका.

१९७९ मध्ये श्री. हेमंत रेवणकरांनी बिपिन इंजिनियर्सची स्थापना केली, तेव्हापासून आजपर्यंतचा जवळजवळ ३७ वर्षांचा त्यांचा प्रवास म्हणजे चिकाटी, धडाडी आणि कुटुंबाच्या टीमवर्कचा प्रेरणादायी पाठ म्हणायला हरकत नाही. आज नंदाताईंनी ‘लीन मॅनेजमेंट’ आणि ५एस या व्यवस्थापनशास्त्राच्या आधुनिक तंत्रांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी उचलण्यामागे हेच खंदे टीमवर्क आहे.

 

रेवणकरांचे कुटुंब मूळचे कर्नाटकमधल्या कारवार गावचे. वडिलांची, म्हणजे सदाशिवरावांची  आर्थिक परिस्थिती तशी हलाखीचीच. पण स्वभाव धडपड्या आणि अतिशय कष्टाळू. खांद्यावर साड्यांची गाठोडी घेऊन गावोगाव साड्या विकत फिरण्यापासून, किराणा मालाचं दुकान चालवण्यापर्यंत अनेक उद्योगधंदे त्यांनी केले. एकेकाळी तर तंबू थियेटरसुद्धा त्यांनी चालवलं! असे अनेक व्यवसाय जोखत पारखत शेवटी ते सोनारीचा व्यवसायात स्थिरावले. एव्हाना, म्हणजे १९४० च्या सुमारास ते कारवार सोडून सोलापुरात स्थायिक झाले होते. 

हेमंत रेवणकरांचा जन्म इथलाच. शाळा, कॉलेज सोलापुरातच झाले. Technical विषय घेऊन दहावी उतीर्ण झाल्यानंतर त्यांनी वाणिज्य शाखा निवडली. शिक्षण चालू असताना एकीकडे खो खो, लंगडी अशा खेळांमध्ये सतत सहभाग असायचा, एवढंच नव्हे तर टीमचं नेत्तृत्वही ते करायचे. सुट्यांमध्ये दुकानात मोठ्या भावाला आणि वडिलांना मदत करण्यासाठी नियमित हजेरी लागायची. डिलिव्हरीसाठी तयार झालेले दागिने ब्राउन पेपर आणि पातळ गुलाबी कागदात अलगदपणे पॅक करायचं काम छोट्या हेमंतकडेच असायचं. कॉलेजच्या काळातदेखील लेक्चर्स संपल्यानंतर निळा गणवेश घालून कारखान्यात दागिन्यांचे कच्चे डिझाईन तयार करण्याच्या कामात त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. हे सर्व करत असताना नेतृत्त्वगुण, कामातली सफाई, श्रमप्रतिष्ठा या सर्व गुणांचा भक्कम पाया आपोआप तयार होत होता हे त्यांच्या गावीही नव्हतं. याच पायावर पुढे जाऊन त्यांनी एका वेगळ्याच क्षेत्रात स्वत:चं उद्योगविश्व उभारलं हे बिपिन इंजिनियर्सच्या चढत्या आलेखावरून लक्षात येतं.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९७५ मध्ये मोठ्या भावाला त्याच्या व्यवसायात मदत करण्यासाठी हेमंतराव पुण्याला आले. वर्कशॉप गावात, नाईकांच्या जागेत चालत असे. जेमतेम २०० चौरस फुटांची ही जागा एकेकाळी नाईकांच्या घोडागाड्या ठेवण्यासाठी वापरात होती. इथून  पाच वर्षं काम केल्यानंतर ते मंगळवार पेठेत मोठ्या जागेत हलवलं.

इंजिनियरिंग क्षेत्राशी निगडीत व्यवसायाचा प्रत्यक्ष अनुभव हेमंतरावांना वर्कशॉपमध्ये मिळाला. ग्राहकाने सांगितल्याप्रमाणे यंत्राचा एखादा भाग विकसित करणे, तो बनवणे, कबूल केलेल्या वेळेत काम पूर्ण करून देणे, पैशाची वसुली करणे, हे सर्व शिकण्याची संधी या काळात मिळाली.

त्या काळात रेवणकर बंधूंचे प्रमुख ग्राहक होते पुण्यातली आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लीशमेंट ही केंद्र सरकारची संस्था. तिथे विकसित केल्या जाणा-या तोफा व शस्त्रसामुग्रीसाठी लागणारे भाग ते यांच्याकडून तयार करून घेत. त्या काळात अनेक भागांची फोर्जिंग्ज रशियामधून तयार होऊन येत व त्यांच्या मशीनिंगचे काम रेवणकरांकडे व्हायचे. बॉम्बगोळ्याचे कामही त्यांच्या वर्कशॉपमध्ये केले जाई. सरकारी कामात सातत्य होते, आवक ही सुरळीत होती पण अधिकांश काम डेव्हलपमेंटचे असायचे. उलाढालीच्या दृष्टीने काम पुरेसेही नव्हते. यावर तोडगा म्हणून रेवणकर बंधूंनी खासगी कंपन्यांची कामं मिळवायचं ठरवलं.

मुंबई-पुणे महामार्गावर अनेक इंजिनियरिंग कंपन्या होत्या. स्नेह्यांच्या ओळखीने त्यांना पहिलं काम त्या काळाची व्हल्कन लाव्हल म्हणजेच आजची अल्फा लाव्हल या कंपनीकडून  मिळालं. त्यांच्यासाठी हॉपर बनवण्याचं काम यशस्वीपणे पूर्ण झाल्यान पुढे वाचा

उद्योजक > सोलर एनर्जी,

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!