logo

Search Here

कै. डॅा. शंकरराव रामकृष्ण माचवे

सर्वसामान्य मुलांच्या संस्थेत काम करताना येणारे अनुभव आणि अशा संस्थेतील अनुभव यात निश्चिमतच फरक आहे. द्घीशिक्षणासंबंधीच्या अनेक अनुभवांना सामोरे जावे लागते. शाळा प्रवेशासाठी मोल मजुरी करणारे, हातावर पोट असलेले अनेक पालक कुठल्याशा खेड्यातून आलेले असतात.


समाजातील दयनीय अवस्थेतील अंध व्यक्तींना शिक्षण देऊन स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने 28 फेब्रुवारी 1943 रोजी कै. डॅा. शंकरराव रामकृष्ण माचवे यांनी पुणे अंधशाळेची स्थापना केली. व्यवसायाने नेत्रतज्ज्ञ असलेल्या डॅा. माचवे यांनी  दृष्टीचे मह्त्व ओळखून ज्यांच्या डोळ्यांवर काहीही इलाज करणे शक्य नाही अशा व्यक्तींच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे ठरविले. तमसोमां ज्योतिर्गमय याप्रमाणे अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचे ध्येय निश्चिलत केले.

भारतात त्याकाळी एका हाताच्या बोटावर मोजाव्या इतक्याच अंधासाठीच्या शाळा कार्यरत होत्या. त्या संस्थांचा एकमेकांशी कोणताही संबंध नव्हता. त्यातील प्रत्येक संस्था आपापल्या, आपल्या प्रदेशाला योग्य वाटेल अशा तर्हेोने कार्य करीत होती. डॅा. माचवे आपली शाळा कशी असावी याची योजना करुन पुणे येथे आपले कार्य सुरु केले

आणि बघता बघता अंध अपंगांच्या शिक्षणाला पुण्यात प्रारंभ झाला. आज पुणे तिथे काय उणे किंवा पुणे हे विदयेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते, त्याचा विचार करताना मनात प्रश्ने येतो, डॅा. माचवे यांनी पुण्यात शाळा सुरु केलीच नसती तर? म्हणून विद्येच्या माहेरघरी पुणे अंधशाळेची स्थापना ही निश्चिपतच महत्त्वपूर्ण घटना मानावी लागेल.

हळूहळू या कामाचे महत्त्व समाजमानाला समजू लागले. त्यासाठी निधी जमविण्याची जबाबदारी डॅा. माचवे यांनी स्वखुशीने उचलली. ती वाटचाल अतिशय कष्टप्रद अशीच म्हणावी लागेल. समाजातील संवेदनशील धनिकांची पावले संस्थेकडे वळू लागली. त्याच जोरावर डॅा. माचवे यांनी सुरुवातीस सोमवार पेठेत भाड्याच्या जागेत असलेली संस्था देणगीदाखल मिळालेल्या कोरेगांव पार्क येथील प्रशस्त 5 एकर परिसरात हलविली.

मुंबईतल्या एन. एस. डी होम व हॅपी होम या अंधांसाठी आजही कार्यरत असलेल्या संस्था छत्रपती एच. डी. यांच्या सहकार्याने सुरु करण्याचा अनुभव कै. डॅा. माचवे यांच्याजवळ होताच. अंध मुलांच्या गरजा, शिक्षण पध्दती याचाही त्यांनी अभ्यास केला, त्याची साधने मिळविली आणि शाळा सुरु झाली. अंधव्यक्तिंना स्वावलंबी बनवायचे याचा त्यांना ध्यास लागला होता. त्यासाठी त्यांनी अखंड मेहनत घेतली, आतापर्यंत संस्थेत फक्त अंध  मुलांनाच प्रवेश दिला जात होता पण अंध स्त्रियांचे काय? मुलींचे काय? त्या अंधत्व घेऊन खडतर जीवन जगत आहेत हे ही त्यांच्या लक्षात आले आणि म्हणूनच सन 1958-59 मध्ये त्यांनी मुलांच्याच शाळेत मुलींनाही प्रवेश देण्यास प्रारंभ केला. अंध मुले आणि अंध मुली यांची स्वतंत्र शाळा असावी हे ही त्यांचे स्वप्न होते. त्याकरिता त्यांनी कोथरुड परिसरात 5एकर जागा देणगीदाखल मिळवून ठेवली. 5नोव्हेंबर 1959रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॅा. राजेंद्र प्रसाद यांचे हस्ते मुलींच्या शाळेची कोनशिला बसविली गेली. पुढे आपले हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली कन्या कै. सौ. मंगलाताई देसाई यांच्यावर सोपवून स्वत: 21 नोव्हेंबर 1969 मध्ये अनंतात विलीन झाले.

मा. श्री. रा. का. पाटील आणि मा. बिडेश कुलकर्णी यांचे सहकार्य तसेच संस्थेच्या अडचणींच्या वेळी मा. प्रतापरावजी पवार यांचे सहकार्य, त्यांनी वटवृक्षाप्रमाणे दिलेला भरभक्कम आधार, दाखविलेली दूरदृष्टी निश्चिपतच मोलाची ठरली. कोणत्याही अडचणीत शांत राहून, संयम दाखवून मार्ग शोधण्याची वृत्ती सर्वांना आजही मार्गदर्शकच ठरते. कोणत्याही नवीन योजनेला त्यांनी दिलेल्या पाठबळामुळेच संस्थेच्या निरनिराळ्या शाखा आज कार्यरत आहेत.

अंध मुला-मुलींची मोफत शिक्षण, निवासाची सोय करताना स्वत: सौ. मंगलाताई देसाई त्यांच्यात इतक्या रममाण झाल्या की शाळा हेच घर आणि घर म्हणजेच शाळा ! अंधांच्या प्रगतीचा जणू त्यांनी वसाच घेतला. वडिलांची संस्था वंडिलांचे कामही अगदी बालपणापासूनच पाहिले असल्याने कोणत्याही अनुभवाची कमतरता नव्हती. त्या सांगत असत त्यांचे वडिल नेत्रशल्य चिकित्सक असल्याने त्यांचा अनेक आफ्रिकन देशांशी संपर्क होता. सुमारे 25 देशांशी संपर्क असल्याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत. या सर्वांशी ते एकटे पत्रव्यवहार करुन देणगी मिळवत असत. कै. मंगलताईंनीही अशाचप्रकारे कामास प्रारंभ करुन आपल्या वडिलांप्रमाणेच प्रचंड मेहनत घेतली. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेल्या मंगलाताईंनी त्या वेळच्या संचालक मंडळाच्या सहकार्याने तसेच संचालक मा.बा.वा. जोशी साहेब यांच्या सहकार्याने कोथरुड येथे अंध मुलींसाठी स्वतंत्र शाळा उभी केली ती सन 1974 मध्ये. सन 1958-59 मध्ये सुरु झालेल्या अंध मुलींच्या शाळेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्षह पुढे वाचा

सामाजिक > अनाथालय,

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!