logo

Search Here

Dr. Anand Deshpande

५ डिसेंबर १९९० मध्ये त्यांचा विवाह झाला त्यावेळी त्यांच्याकडे नोकरी नव्हती आणि व्यवसाय तर नुकताच सुरु केला होता..परंतु तरीही जिच्याशी विवाह झाला तिने आणि तिच्या कुटुंबाने याविषयीची कसलीच हरकत घेतली नाही हे देखील आजच्या काळात खरे तर दाखल घेण्याजोगे आहे.

                                                                    ‘द्रष्टा’ सारथी
                                                                  डॉ. आनंद देशपांडे

                                                        “जंगलात दोन रस्ते फुटले होते...
                                                                     आणि मी ,
                                                         मी कमी मळलेला रस्ता निवडला.
                                                         त्यामुळेच तर सारे काही बदलून गेले..!

              -रॉबर्ट फ्रोस्ट

असाच वेगळा रस्ता निवडून ‘Persistent Systems Limited’ चे स्वप्न सत्यात उतरविणारे, प्रामाणिक आणि पारदर्शी व्यक्तिमत्वाचे, कंपनीचे अध्वर्यू ,M.D. आणि C.E.O. डॉ. आनंद देशपांडे.

  ओळख Persistent म्हणजे ‘चिकाटी असणारा’, ‘प्रत्येक गोष्टीसाठी दीर्घकाळ प्रयत्न करणारा’..!
शालेय शिक्षण भोपाळमध्ये पूर्ण करणारे आनंद देशपांडे IIT खरगपूर येथून computer science घेऊन १९८४ साली इंजिनिअर झाले. त्यानंतर परदेशातील अनेक विद्यापीठांना त्यांनी पदव्युत्तर अध्ययनासाठी अर्ज केले. १९८६ मध्ये अमेरिकेत ब्लुमिंग्टन येथील इंडियाना युनिव्हार्सिटी मधून त्यांनी पदव्युत्तर अध्ययन पूर्ण केले आणि १९८९ मध्ये पी.एच.डी. मिळवली.  संशोधन पूर्ण झाले की जगातील अग्रगण्य व नावाजलेल्या एखाद्या कंपनीत सुरुवातीला काम करायचे असे त्यांनी ठरवले. परंतु नोकरी कायमची करायची नाही, तर स्वतःचा व्यवसाय करायचा हे मात्र मनाशी पक्के ठरवले होते. संशोधनाचे काम संपताच कालीफोर्नियातील Hewlett Packard Laboratories मध्ये त्यांनी दीड वर्ष नोकरी केली. नजीकच्या भविष्यकाळात भारतात software product development  या क्षेत्रातील उद्योग हा महत्वपूर्ण आणि प्रगतीशील असा उद्योग ठरणार आहे हे त्यांना जाणवले. जगप्रसिद्ध कंपनीतील नोकरी पुढे चालू न ठेवता, मनाशी एक स्वप्न जोपासून १९९० मध्ये ते भारतात परत आले.

स्वप्नपूर्ती
१९९० मध्ये भारताची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. जागतिकीकरणासाठी भारतीय धोरण नुकतीच खुली होत होती. या विपरीत परिस्थितीतही उद्योगधंदा सुरु करायचा ठाम निर्णय घेतला ज्याला अर्थातच त्यांच्या कुटुंबाने पूर्णपणे पाठिंबा दिला. मराठी माणूस उद्योगधंदा करण्यापेक्षा मिळेल ती नऊ ते पाच नोकरी करणे अधिक पसंत करतो अशी एक समजूत असते. पण असा कोणताही विचार किंवा दृष्टीकोन न बाळगता, स्वतः नोकरी करून देखील त्यांच्या वडिलांनी त्यांना व्यवसाय करण्यास सर्वतोपरी सहाय्य करण्याचा निर्णय घेतला, हे निश्चितच महत्वाचे आहे.
स्वतःचा व्यवसाय करायचा तर पैसा हवा..दीड वर्षाच्या कामातून कमावलेला असा कितीसा पैसा त्यांच्याजवळ असणार होता..! सर्व्हिस टॅक्स मधून आलेला दोन लाखाचा परतावा त्यांच्या हातात होता..पण तेवढे भांडवल पुरेसे नव्हते म्हणून त्यांनी आपल्या वडिलांकडून एक लाख साठ हजार रुपयांचे कर्ज घेतले. सहा जणांच्या सोबत आणि एका कॉम्प्युटर च्या साक्षीने त्यांनी ‘पर्सिस्टंट’ या कंपनीची नोंद सप्टेंबर १९९० मधे केली..अर्थातच त्यांचे वडील या कंपनीचे सह संस्थापक म्हणून त्यांच्या सोबत काम बघू लागले..
५ डिसेंबर १९९० मध्ये त्यांचा विवाह झाला त्यावेळी त्यांच्याकडे नोकरी नव्हती आणि व्यवसाय तर नुकताच सुरु केला होता..परंतु तरीही जिच्याशी विवाह झाला तिने आणि तिच्या कुटुंबाने याविषयीची कसलीच हरकत घेतली नाही हे देखील आजच्या काळात  दखल घेण्याजोगे आहे.

  कंपनी तर तयार झाली..आता काम कसे मिळवायचे हे मोठेच आव्हान होते. त्यासाठी आनंद देशपांडे यांनी स्वतःचे आजवर जपलेले व्यक्तिगत हितसंबंध आणि ओळखी यांचा अतिशय प्रामाणिक आणि जाणीवपूर्वक वापर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जवळजवळ दोनशे पत्र  पाठवली ज्यात आपली कंपनी काय प्रकारचे काम करते, कोणत्या सेवा पुर पुढे वाचा

उद्योजक > आय. टी टेक्नॉलॉजी,

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!