logo

Search Here

ध्यासपर्व

"प्रतीक केबल ट्रे' नावारुपाला झाले त्यामागचे यशाचे काहीतरी गमक असणार कोणत्याही व्यवसायाची पार्श्वभूमी नसलेल्या साध्याशा कुटुंबातून केवळ 10 वी पर्यंतचे शिक्षण झालेले श्री. प्रशांत हे इतका मोठा व्यवसाय कशाच्या जोरावर करु शकतात...? पण त्यांच्या यशाचा फॉर्म्यूला सोपा व साधा आहे.

परिचय :-
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर हंगरगा(नळ) येथील या गावी श्री. प्रशांत बसवणप्पा हत्ते यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण छोट्याशा गावात गेलं. 10 वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर 12 वी चा फॉर्म भरला. पण परीक्षा दिली नाही. 1989 मध्ये मुंबईला –डोंबिवली मध्ये कामाला सुरुवात केली. 1994 मध्ये पुण्यात आलो आणि साधारणपणे 2008 पर्यंत एलकॉन नावाच्या कंपनीत नोकरी केली. 2008 साली स्वत:चा "प्रतीक केबल ट्रे’ नावाचा चा व्यवसाय सुरु केला.
    सातवी बोर्डाची परीक्षा नापास झालेले आणि पुढे जाऊन 10 वी ची परीक्षा 50% मार्कांनी पास होणारे श्री. प्रशांत हत्ते हे आज वर्षाला 10 ते 12 कोटीचा व्यवसाय करतात. एक इलेक्ट्रिकल वायरमन म्हणून सुरुवात केली तेव्हापासून ते "प्रतीक केबल ट्रे' उभं राहण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अर्थातच सोपा नाही.                                                   

                                            
प्रवास:-
    2008 साली नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरु केला. 22,000/- रुपयाची नोकरी सोडून भावासोबत पुण्यासारख्या ठिकाणी व्यवसाय करायला अर्थातच कुटुंबातल्या व्यक्तींनी उत्साहाने पाठिंबा दिला नाही. तरीही स्वत:च्या मेहनतीवर, कष्टावर विश्वास असलेल्या श्री. प्रशांत यांनी व्यवसाय सुरु करण्याची हिंमत दाखवली. छोट्याश्या नोकरीतून बाजूला टाकलेला पैसा असा कितीसा असणार ...! त्यांनी  50,000/- रुपयाचे कर्ज घेऊन सुरुवात केली. कुटुंबात या व्यवसायाची कोणतीच पार्श्वभूमी नसताना स्वत:च्या ज्ञानाच्या आणि पैशाच्या भांडवलावर त्यांनी सुरुवात तर केली. सलग दोन वर्ष खूप त्रास सहन करावा लागला. वेगवेगळ्या अडचणी आल्या. मार्केटिंग करणे आणि व्यवसायातील स्पर्धेला तोंड देणे हे सगळ्यात मोठे अडथळे या दोन वर्षात सतत समोर येत राहिले. "इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर' म्हणून काम करत असताना खूप लोकांशी संपर्क आला होता. ही संपर्कातील माणसे मार्केटिंगचा अडथळा दूर करायला उपयोगी ठरली. माणसांशी असलेले चांगले संबंध आणि स्वत:च्या कामातली उत्तम गुणवत्ता या दोन गोष्टींवर त्यांचा व्यवसाय उभा राहिला आणि वाढलाही...! ग्राहकाला कधीही न फसवता प्रामाणिकपणे  काम करण्याचे व्यवसायातले तत्त्व त्यांनी तंतोतंत पाळले जे आजही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
    सुरुवतीला केवळ ट्रेडिंगचे स्वरुप व्यवसायाला होते. पण एक 5 लाखाची मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर मात्र ते उत्पादनाच्या क्षेत्रातही काम करु लागले केबल ट्रे च्या उत्पादनाची सगळी जबाबदारी आज त्यांचे धाकटे भाऊ श्री. प्रदिप बसवणप्पा हत्ते हे बघतात. आज त्यांच्या ग्राहकांची संख्या  साधारणपणे 180 ते 200 इतकी आहे. वर्षाला 10-12 कोटीचा व्यवसाय करणारे "प्रतीक केबल ट्रे' भविष्यात 50 ते 100 कोटींचा व्यवसाय करण्याचे स्वप्न पाहत आहे.                                             

  अडथळ्याची शर्यत:-
    ठीकठाक पगार असलेली नोकरी सोडण्याचे श्री. प्रशांत हत्ते यांनी ठरवले कारण कंपनीच्या मालकाने त्यांच्या वरच्या हुद्यावर मुद्दाम एक माणूस नेमला ज्याचा त्रास सातत्याने श्री. प्रशांत यांना व्हायला लागला. एक दिवस वैतागून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि "एलकॉन' कायमची सोडली. ज्या दिवशी राजीनामा दिला त्याच दिवशी त्यांना प्रचंड मोठा अपघात झाला. एलकॉन चे मालक त्यांना हॉस्पिटल मधे भेटायला आले. परंतु जेव्हा त्यांना कळले की श्री. प्रशांत यांनी राजीनामा दिला आहे.त्यानंतर ते परत हॉस्पिटलला फिरकले नाहीत. घरातले दागिने गहाण ठेवून त्यांना हॉस्पिटलचे बील चुकते करावे लागले. पण पुढे व्यवसाय सुरु केल्यावर "एलकॉन' मधील श्री. प्रवीण ओसवाल यांनी मोलाची मदत केली. एका शब्दावर 2 कोटीचे मटेरिअल प्रतीकला दिले. "डी टॅप ऑटोमेशनचे' श्री. राजु करीअप्पा यांनीही खूप सहकार्य केले.  "RYB इलेक्ट्रिकल्सचे' श्री. एलपले सर यांनी 15 लाख रुपये रोख दिले. ते पैसे श्री प्रशांत यांनी जवळजवळ दोन वर्षांनी त्यांना परत केले. या सगळ्यांनी केलेली मदत ही न विसरता येणारी आहे. माणसांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंधच शेवटी टिकतात, उरतात आणि ते पैशापेक्षा मोठे व महत्त्वाचे असतात. आयुष्यात येणाऱ्या अनंत अडचणींवर मात करण्यासाठी माणसेच मदत करतात. श्री. प्रशांत यांचा पुढे वाचा

उद्योजक > केबल ट्रे,

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!