logo

Search Here

एका जिद्दीची यशोगाथा

मनालीच्या पाळंदे टेक्नोसर्व्हिसेस ने बनवलेली आणखीन एक उपयुक्त यंत्रणा म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयेडेंटीफिकेशन (RFID). याच्यामुळे बसमध्ये चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या मुलांनी त्यांचं आयकार्ड दारात बसवलेल्या यंत्रावर फिरवलं की वेळेची नोंद होते आणि त्यांचा बसमधला एकूण कालावधीही कळतो. मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचं ठरलं.. आपल्याला वेळेच भान असलं पाहिजे आणि त्या त्या वेळेची, परिस्थितीची निकड/गरजही ओळखता आली पाहिजे -

मनाली राजेश पाळंदे

मुंबईच्या राजेश पाळंदेशी लग्न होऊन वंदना भातखंडेची सौ. मनाली राजेश पाळंदे झाली ते साल होतं 1991 !! त्यावेळी तिने इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सची B.E. ची परीक्षा नुकतीच दिली होती आणि ती रिझल्ट्सच्या प्रतिक्षेत होती. इंजिनियर  असलेला राजेश त्यावेळी एका छोट्या कंपनीत  नोकरी करत होता.  मनालीचे मामे सासरे त्यावेळी गोव्यामध्ये मांडोवी इथे असलेल्या मांडोवी पेलेट्स कंपनीत इलेक्ट्रीकल इंजिनियर म्हणून काम करत होते आणि योगायोगाने त्यांनी त्यांच्या कंपनीकरता काही प्रॉडक्ट बनवण्यासाठी त्यांना ऑर्डर मिळवून दिली.  स्वत:चा उद्योग सुरु करुन दाखवण्याच्या प्रेरणेने उत्साहीत असलेल्या मनालीने ती संधी आनंदाने स्विकारली. दोघांचही इंजिनियरींग झालेलं असल्याने स्वत:चं काहीतरी प्रॉडक्ट असावं ह्या विचाराने उचल खाऊन,दोघांनी मिळून वांद्रे इथे प्रोसेस कंट्रोल इंन्स्ट्रुमेंट्स बनवण्याचं एक छोटं युनिट सुरू करण्याचे स्वप्न बघितले.

   झालं! मग दोघा नवरा-बायकोने मिळून त्या कामाला स्वत:ला जुंपून घेतलं. मनालीने एकटीने ग्रँड रोडला जाऊन पी.सी.बी. (प्रिंटेड सर्कीट बोर्ड) साठी लागणारे छोटे छोटे सुटे पार्ट्स विकत आणले. राजेशकडे त्या उत्पादनासाठी लागणारं डिझाईन करण्याची कामगिरी होती. लवकरच त्यांनी ते सर्किट तयार करुन ते कंट्रोल इंन्स्ट्रुमेंट  तयार केलं आणि मांडोवी पेलेट्स कडे सुपूर्त केलं. त्याकाळातल्या त्यांच्या त्या पहिल्यावहिल्या उत्पादनाचा रु. 1350/- चा चेक त्यांच्या हातात पडला. अर्थात ही जरी सुरुवात असली तरी, त्या दांपत्यासाठी तो खडतर काळ होता. नुकतंच लग्न झालेलं त्यामुळे आर्थिक गरज भागवण्यासाठी मग दोघांनी त्या काळात मिळतील तशी काम स्विकारणं सुरु केलं. त्यात अगदी टी. व्ही. सेट्स रिपेअर करण्यापासून ते अँटेना बसवून देण्यासारखी छोटी छोटी कामंही होती कारण त्यांच्या नवीन व्यवसायाला लागणार्‍या सुट्या भागांच्या खरेदीसाठी पैशाची बचत असणं फार महत्त्वाचं होतं. आपलं पहिलवहिलं प्रॉडक्ट आपल्या पहिला ग्राहकाच्या पसंतीला पडल्याचा आनंद, त्यांचा आत्मविश्वास वाढायला मदत करणारा ठरला आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर मग त्यांनी आपल्या उत्पादनाची जाहीरात करायला सुरुवात केली. अर्थात ते मार्केटिंग त्यांच त्यांनाच करायचं होतं. मनालीचा पहिला कस्टमर होता अंधेरीच्या साकीनाका इथल्या एका इंडस्ट्रियल इस्टेट मधला एक उद्योजक. मनालीने त्याला भेटण्याची वेळ ठरवली आणि त्याप्रमाणे ती निघाली खरी. पण आपल्या त्या मार्केटिंगच्या पहिल्याच अपॉइंटमेंटने तिच्या छातीत धडकी भरली होती आणि त्याने ती इतकी घाबरली की चक्क ती अपॉइंटमेंट न पाळताच ती तशीच परत आली. पण परतल्यावर तिने एक ठाम निर्णय घेतला आता घाबरून चालायचं नाही- आता इस पार या उस पार. एक तर आपला बिझिनेस वाढवायचा तरी नाहीतर चक्क बासनात गुंडाळून ठेवायचा! तिने फिरून पुन्हा एक वार त्या उद्योजकाकडे  भेटीसाठी वेळ मागितली- घरी बोलण्याची चांगली प्रॅक्टीस केली आणि मग तिला हुरुप आला. यावेळी मात्र न थरथरता तिने धिटाईने त्या उद्योजकाची भेट घेतली. त्याला आत्मविश्वासाने आपल्या प्रॉडक्टची माहिती दिली आणि इतकंच नव्हे, तर चक्क ती प्रॉडक्टची ऑर्डर मिळवूनच तिथून निघाली. अश्या तऱ्हेने हळूहळू दोघां पती-पत्नींची मेहनत फळाला यायला लागली. आणि त्यांना एकेक करून ऑर्डर्स मिळायला लागल्या. मग त्यांनी नवनवीन डिझाईन्स करायला आणि त्यानुषंगाने ऑर्डर्स मिळवायला सुरुवात केली. एकीकडे थोडी थोडी बचत करत असतानाच, व्यवसायाला आवश्यक असणारी कम्पुटरसारखी काही महत्त्वाची साधनंही त्यांनी घेतली. लवकरच त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन काही नामांकित कंपन्यांनी उदा. ग्लॅक्सो इंडिया, फुलफोर्ड, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, इन्क्युबेटर्स मॅन्युफॅक्‍चर्स या कंपन्यांनी त्यांना ऑर्डर्स द्यायला सुरुवात केली. मनालीला पतीच्या सहकार्यामुळे इंडस्ट्रियल प्रोसेस पॅनल्स सारख्या मोठ्या प्रॉडक्टच्या उत्पादनातही  शिरता आलं. प्रोसेसिंग इंडस्ट्रिजमध्ये असणार्‍या महत्त्वाच्या क्रिया म्हणजे मशिन सुरु करणे, पॅकेजिंग करणे, पॅकेजिंगचं काऊंटींग करणे अशी सर्व कामं हे प्रोसेसर्स करू शकत होते.

पुढची 7-8 वर्षं भराभरा गेली आणि मनालीचा व्यवसाय समाधानकारकरित्या वाढत गेला पण अश्याच वेळी एक आकस्मिक समस्या उभी ठाकली, ती म्हणजे तिचा धाकटा मुलगा  एकाएकी फारच आजारी पडला. वाढता व्यवसाय तडकाफडकी  बंद करणं शहाणपणाचं पुढे वाचा

उद्योजक > टेक्नॉलॉजी,

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!