logo

Search Here

देणाऱ्याने देत जावे

थिओडोर रूझवेल्टचं एक सुंदर वाक्य आहे- “जिथे असाल तिथे, तेव्हढ जवळ असेल तेव्हढयानं, जितकं करू शकाल तितकं करा !” - आणि याची चालतीबोलती प्रचिती आहे " गुडविल इंडिया'' चे संस्थापक श्री. कालिदास हरिभाऊ मोरे !------

“देणाऱ्याने देत जावे --------!”

थिओडोर रूझवेल्टचं एक सुंदर वाक्य आहे- “जिथे असाल तिथे, तेव्हढ जवळ असेल तेव्हढयानं, जितकं करू शकाल तितकं करा !” - आणि याची चालतीबोलती प्रचिती आहे " गुडविल इंडिया'' चे संस्थापक श्री. कालिदास हरिभाऊ मोरे !------

पुण्यापासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोपरे गावातल्या एका सधन शेतकरी कुटुंबात कालिदास यांचा जन्म झाला. त्यांच्या गावात बहुतांश घरं ही 'मोरे' आडनावाचीच, पण कालिदास यांचं घराणं त्या सर्वांमध्ये श्रीमंत आणि वजनदार असं ! पीढीजात मिळालेल्या शेतीच्या वारश्याने त्यांचे वडिल हरिभाऊ हे सधन होते. शेतीबरोबरच खडकवासला इथं ते एम. ई. एस. कॉन्ट्रॅकटर  सुद्धा होते. शिवाय कोपरे आणि कोंढवे गावात त्यांची दोन सायकलींची दुकानं, किराणामालाची दुकानं होती. हरिभाऊंना एकूण सहा मुलं ! सुशीला सर्वात मोठी, तिच्याहून मग क्रमाने लहान रोहीदास, कालीदास, सुलोचना, दिलीप आणि सर्वात धाकटा चंद्रशेखर. हरिभाऊ स्वभावाने अत्यंत मनमिळावू होते आणि लोकांना मदत करण्यात आघाडीवर असायचे. त्यांचा जनसंपर्क दांडगा  होता. त्याकाळी त्यांच्या घरी प्रतिष्ठीत पुढाऱ्यांची आणि विचारवंतांची ऊठबस असायची.

                                              

कालीदास आणि त्याच्या भावंडांचा जन्म जणू सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच झाला होता. त्याकाळात त्यांच्या घरी इंग्लंडहून मागवलेली एक मोटरबाईक होती. एक दूर्मिळ दूर्बिण होती आणि एक रेडिओही होता. त्यांच्या घरची सुबत्ता आणि अश्या किंमती वस्तू त्या काळात गावातल्या इतरांना  परवडणं शक्यच नव्हतं. पहिली ते सातवीपर्यंतचं शिक्षण कोपरेगावच्याच जीवनशिक्षण मंदिरात झाल्यावर, कालीदास आणि रोहीदास हे आठवीपासून पुढे अकरावी उत्तीर्ण होईपर्यंत, पुण्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या महाराष्ट्र विदयालयात शिकले.

अकरावी झाल्यानंतर कालीदास यांनी बी. एम. सी.सी. महाविदयालयात बी. कॉम साठी प्रवेश घेतला. पहिल्या वर्षी कालीदास यांनी अगदी मनापासून कॉलेजला उपस्थिती राहून अभ्यास केला. आपल्या वर्गाचे 'क्लास रिप्रेझेंटीटीव्ह' म्हणून त्यांची निवडही झाली होती. पण दुसऱ्या वर्षी मात्र भारतीय मैदानी खेळांची जबाबदारी सांभाळताना त्यांचं अभ्यासाकडे साफ दुर्लक्ष झालं आणि ते चक्क तीनहून जास्त विषयात नापास झाले. मग मात्र त्यांनी अभ्यासाकडे पूर्ण लक्ष केंद्रीत करायचं ठरवलं आणि त्यासाठी पुण्यातच आंबेडकर होस्टेलमधे राहायला सुरुवात केली. पुढे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी बँकसेवेची परीक्षा दिली आणि त्यात उत्तीर्ण होऊन 1973 साली कँम्पमध्ये असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत क्लार्कची नोकरी सुरु केली. त्यावेळी त्यांचा पगार होता साडेतीनशे रुपये. त्यावेळी त्यांच्या गावच्या घरून, म्हणजे कोपरेहून कॅम्पपर्यंत दररोज ये-जा  करायचे आणि मग यायला उशीर झाला की ऑफिसचे ठरलेले तास पूर्ण करण्यासाठी त्यांना उशीरापर्यंत थांबावं लगे. पुढे ऑफिसर म्हणून त्यांना बढती मिळाली आणि 1981 ते 1985 पर्यंत त्यांनी चाकण शाखेत नोकरी केली. पुढची दीड वर्षं त्यांनी थेऊर शाखेत काढली आणि पुढे नाशिकजवळच्या पिंपळगाव इथल्या शाखेत 1989 पर्यंत सेवा करून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्विकारली. त्यावेळी त्यांची जवळजवळ 20 वर्षं एव्हढा नोकरीचा कालावधी शिल्लक होता.

                                                  

सुरुवातीला म्हणजे बँक ऑफ इंडियाची नोकरी झाल्यानंतरच्या वर्षादोनवर्षातच कालीदास यांना रोहिदासबरोबर एखादा  छोटा व्यवसाय सुरु करावा असं वाटू लागलं आणि त्यातूनच 1975 साली दोन्ही बंधूंनी मिळून 'युनिव्हर्सल इंडस्ट्री' नावाने व्यवसाय सुरु केला. त्याचं काम मुख्यत रोहीदास सांभाळत  असत. त्याचदरम्यान मोरे कुटुंबियांच्या पुण्यातल्या परिचित अश्या नाईक नवरे कुटुंबाकडून कालीदास यांच्यासाठी ग्वाल्हेरच्या शिर्के घराण्यातल्या मुलीचा लग्नासाठी प्रस्ताव आला. नाईक नवरे  यांच्या जवळच्या कुटुंबातून आलेली ही सोयरीक  पसंत पडून 1975 साली कालीदास यांनी कात्यायनी शिर्के यांच्याशी विवाह केला. कात्यायनी या स्वतः एम. एस. सी. बी. एड पर्यंत  शिकलेल्या होत्या. त्यांनी लग्नानंतर एन. डी. ए. संस्थेतल्या केंद्रीय विदयालयात नोकरी सुरु केली आणि 1987 पर्यंत त्या तिथे नोकरीत होत्या. सोयीसाठी कालीदास यांनी त्या काळात पुण्यात भाडयाच पुढे वाचा

सामाजिक > सामाजिक बांधिलकी,
टॅग्ज goodwill Social workers

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!