logo

Search Here

जीवनव्रतीचे एक तप समाजसेवेचे...

अलकागौरी जोशी, पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधीसुधी मुलगी, सामान्य बुद्धिमत्तेचा मापदंड, चारचौघींसारखी बी.ए. झाली. व्यावसायिक छायाचित्रणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. करियरचा विचार करताना 'कशासाठी जगायचं' हा साधा प्रश्न तिच्या मनात उभा राहिला आणि तो ध्यास घेऊन योग्य उत्तर धुंडाळत राहिली. काहीतरी वेगळं, अधिक चांगलं आयुष्य जगण्याचा तीव्रतेनं विचार करू लागली.भोवतालच्या घटनांनी स्वतःच्या मनात उमटणार्या सर्व साध्या प्रतिक्रियांची नोंद घेऊ लागली, वेगळं, अधिक चांगलं आयुष्य जगायचा नवा मार्ग शोधू .

अलकागौरी जोशी, पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधीसुधी मुलगी, सामान्य बुद्धिमत्तेचा मापदंड, चारचौघींसारखी बी.ए. झाली. व्यावसायिक छायाचित्रणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. करियरचा विचार करताना 'कशासाठी जगायचं' हा साधा प्रश्न तिच्या मनात उभा राहिला आणि तो ध्यास घेऊन योग्य उत्तर धुंडाळत राहिली. काहीतरी वेगळं, अधिक चांगलं आयुष्य जगण्याचा तीव्रतेनं विचार करू लागली.भोवतालच्या घटनांनी स्वतःच्या मनात उमटणार्या सर्व साध्या प्रतिक्रियांची नोंद घेऊ लागली, वेगळं, अधिक चांगलं आयुष्य जगायचा नवा मार्ग शोधू लागली

अलकागौरी जरी स्वत:ला चारचौघींसारखी समजत असली तरी तिच्या अंतरंगात सुप्त का होईना, पण एक स्फुल्लिंग नक्कीच होता. घरची परिस्थिती सामाजिक कार्याला पोषक होतीच; त्यामुळे हे साहजिकच होतं. शिबिराच्या निमित्ताने अचानक ती विवेकानंद केंद्राच्या सान्निध्यात आली, आणि तिच्या अंतरंगातला स्फुल्लिंग चेतला! जीवने यावद् आदानं स्यात् प्रदानं ततोधिकम्' (आयुष्यात जितकं मिळालयं त्यापेक्षा जास्त द्यावं) या केंद्राच्या प्रार्थनेतल्या वचनानी तिला दिशा सापडली. उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान्निबोधत हे स्वामी विवेकानंदांचे आवाहन आणि अथक परिश्रमाने कठीण, विपरीत परिस्थिती बदलता येते, असाध्य ते साध्य करता येतं हा सागरातील शिलास्मारकानं दिलेला विश्वास तिला दीपस्तंभ वाटला. जीवनव्रती कार्यकर्ती होऊन अर्थपूर्ण जीवन जगणार्या केंदाच्या कार्यकर्त्यांच्या सागरात मिळून जायचे तिने ठरवले.

जीवनव्रती होण्यासाठी कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदारी नसावी, साधी राहणी, भारतभर कुठेही रहायची तयारी आणि कमीतकमी ५ वर्षे अविवाहित रहावे या अटी आहेत. ज्यांना निवृत्तीनंतर २ ते ३ वर्षे पूर्णवेळ काम करायचे आहे ते पूर्णवेळ वानप्रस्थी म्हणून काम करु शकतात. पूर्णकालीन कार्यकर्त्यांच्या योगक्षेमाची आणि निर्वाहाची जबाबदारी विवेकानंद केंद्राची असते. जीवनव्रती होण्यासाठी गौरीने आई-वडिलांची संमति घेतली. घरचं वातावरण सामाजिक कार्याला पोषक होतं तरी तिच्या आईने तिच्या निश्चयाची दृढता पारखली. आव्हानात्मक राष्ट्रकार्य करायला तिला आई-वडिलांनी प्रोत्साहितच केले. गौरीच्या भावंडांनी तिला पाठिंबा दिला. आपल्या ऐन तारुण्यात ३ वर्षे पूर्णकालीन कार्यकर्ते असणारे आजोबा आणि कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी उद्योगधाम-अनिकेत निकेतन या त्यांच्या कामात पुढाकार घेणार्या आजीने गौरीच्या पंखातील भरारी घेण्याचे सामर्थ्य जाणले. ११ जुलै १९९६ ला गौरीने विवेकानंद केंद्राची सेवाव्रती म्हणून केंद्राच्या विशाल घरात प्रवेश केला.

सेवाव्रतीच्या प्राथमिक प्रशिक्षणानंतर नागपूर, नाशिकचं दायित्व मिळालं. कायर्पद्धतीची ३ अंगं - संस्कार, स्वाध्याय आणि योग वर्ग घेता घेता नित्य प्रार्थना आणि योगाभ्यासामुळे आत्मविश्वास वाढू लागला. स्वाध्याय वर्गातून वैचारिक स्पष्टता, सखोलता व सुसूत्रता आली. सततच्या कार्यकर्ता व्यक्तिमत्व विकास शिबीरांमुळे सामूहिक संस्कार झाले. लोकसंग्रह, लोकसंपर्क, लोकसंस्कार आणि लोकसेवा ही चतुःसूत्री डोळ्यांसमोर ठेऊन आदर्श समाज रचनेचे स्वप्न साकार कसे होईल याची स्पष्टता आली. आता मात्र गौरीला आपल्या कार्यक्षेत्राची जाणीव झाली. ही अडीच वर्षे संपल्यावर तिला घरी स्वस्थ बसवेना. पुन्हा तीन वर्षांसाठी व्रत स्वीकारले.पण महासागराला मिळालेली नदी परत फिरते थोडीच? त्यामुळे ही तीन वर्षे संपल्यावर तिथेच कायम कार्य करायचा निर्णय तिने घेतला. जीवनव्रती कार्यकर्ती होण्याचा ध्यास पूर्णत्वाला नेला. त्यासाठी कन्याकुमारीला प्रशिक्षण झालं आणि कार्यक्षेत्र मिळालं---- अरुणाचल!

ईशान्य भारतातले, तीन आंतरराष्ट्रीय सीमा असलेले राज्य अरुणाचल! निसर्गसौंदर्याने संपन्न; निसर्ग व ईश्वराच्या सान्निध्यात राहणाऱे तेथील नितळ, पारदर्शी स्वभावाचे लोक! पण तेथील परिस्थिती मात्र खडतर, प्रतिकूल! आठ नऊ महिने पावसाळा, बेताची वाहतूक व्यवस्था, प्रचंड ब्रह्मपुत्रा आणि तिचे ते पूर; या तर नैसर्गिक अडचणी. याबरोबर धर्मांतर; पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव; युवकांना व्यसनाधीन, निष्क्रीय बनवणाऱ्या स्वार्थी, देशद्रोही प्रवृत्ती; आणि एवढं पुरेसं नाही म्हणून की काय, सशस्त्र अतिरेकी संघटना. यामुळेच विवेकानंद केंद्राचं मुख्य काम 'सृजनात्मक नेतृत्व' घडवणे! आणि 'संस्कृतीच्या माध्यमातून विकास' हे ब्रीद! त्यांच्या कार्याच पुढे वाचा

सामाजिक > समाजसेविका,

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!