logo

Search Here

कावेरी आगाशे सागेदर

"नृत्य मला एका अनुभवातीत विश्वात घेऊन जाते" असे म्हणणारी ही नृत्य कलाकार म्हणजेच कावेरी आगाशे सागेदर! कावेरी मूळची पुण्याची. 'नादरूप' च्या संचालिका, ज्येष्ठ नृत्य कलाकार शमा भाटे यांची शिष्या. आपल्या आईच्या प्रेरणेने कावेरीने सातव्या वर्षापासून शमा भाटे यांच्याकडे कथ्थक शिकायला सुरुवात केली. त्यात ती इतकी रमली की तेच तिचं जग बनलं.

नृत्य तिचा ध्यास-
नृत्य तिचा श्वास!
नृत्य तिची प्रार्थना-
नृत्य तिची साधना!
 

"नृत्य मला एका अनुभवातीत विश्वात घेऊन जाते" असे म्हणणारी ही नृत्य कलाकार म्हणजेच कावेरी आगाशे सागेदर!
कावेरी मूळची पुण्याची. 'नादरूप' च्या संचालिका, ज्येष्ठ नृत्य कलाकार शमा भाटे यांची शिष्या. आपल्या आईच्या प्रेरणेने कावेरीने सातव्या वर्षापासून शमा भाटे यांच्याकडे कथ्थक शिकायला सुरुवात केली. त्यात ती इतकी रमली की तेच तिचं जग बनलं.
 
देशभरातल्या स्पर्धा, विविध महोत्सव यांत कधी स्वतंत्रपणे तर कधी गटात तिचं सादरीकरण होऊ लागलं. तिचं नृत्य पाहून प्रत्यक्ष बिरजू महाराजांनी तिचं कौतुक केलं होतं. नृत्यातलं तिचं लालित्य, तिची निष्ठा पाहून ही आपला वेगळा ठसा उमटवणार असं भाकित त्यांनी तेव्हाच केलं होतं. बिरजूमहाराजांप्रमाणेच गुरू शमा भाटे, रोहिणी भाटे, पं. सुरेश तळवलकर, उस्ताद शाहिद परवेझ, डॉ. श्रीराम लागू यांनी तसेच काही परदेशी कलाकारांनीही तिच्या नृत्याची तारीफ केली. तिच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल या दिग्गजांच्या मनात तिळमात्र शंका नव्हती.
 
१९९८-२००० या दोन वर्षांसाठी कावेरीला केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याकडून शिष्यवृत्ती मिळाली. तिने पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून नृत्य व संगीतातील मास्टर्स ही पदवी विशेष प्रावीण्यासह मिळवली. यानंतर कथ्थक आणि जाझ/जागतिक संगीत यांच्यातील संबंधाचा अभ्यास करण्यासाठी कावेरीला अमेरिकेची फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळाली. त्यासाठी बर्कले येथील जाझ स्कूलमधे राहून तिने हा अभ्यासक्रम पूर्ण केला
 
देशांतर्गत कार्यक्रमांत कावेरीने मुंबईतील काळा घोडा फेस्टिव्हल, दिल्लीतील कथ्थक महोत्सव, पुणे महोत्सव, मुंबई महोत्सव तसेच चेन्नई येथील महोत्सवात नृत्याविष्कार सादर केले आहेत.
 
फ्युजन या प्रकारात तिने पं.सुरेश तळवलकर (तबला), आरती अंकलीकर (गायन), मुकुल डोंगरे (ड्रम्स), तौफिक कुरेशी, विजय घाटे (तबला), निलाद्री कुमार (सतार) अशा मोठमोठ्या कलाकारांबरोबर कार्यक्रम केले आहेत.
 
परदेशातही तिचे असंख्य कार्यक्रम झाले आहेत. त्यांपैकी काही पुढील ठिकाणी-- कन्सर्ट बाय वेदिक हेरिटेज, न्युयॉर्क (२००९)गुरूंबरोबर ऑस्ट्रिया, इटली (२००२-०३) सिंगापूर, मलेशिया (२००४) कथकगुंजन (रामदास पळसुले संयोजित) अमेरिका, कॅनडा येथे.ऑस्ट्रियामधे, तेथील ग्रुपच्या सहयोगाने.वृंदावन गुरुकुल आयोजित- पं.हरिप्रसाद चौरासियांबरोबर
कॉस्मिक नाद तर्फे अमेरिकेत व कॅनडामधे ठिकठिकाणी कार्यशाळा.(२००८) सिझेरो सादरीकरण मोरोक्को व फ्रान्समधे (२०१०), लिंझ दिवाली- ऑस्ट्रियात (२०१०)
2002 मधे गुरू शमा भाटे यांच्याबरोबरील व्हिएन्ना दौऱ्याच्यावेळी कावेरीला तिचा जीवनसाथी भेटला. पाश्चिमात्य शास्त्रीय गायक व पर्कशनिस्ट फिलिप सागेदर. मग 2008 मधे फिलिपशी विवाह करून कावेरी व्हिएन्नाला गेली. 'कथ्थक आणि व्हिएन्ना हे तसं माझ्यासाठी 'ऑड'च समीकरण होतं. पण फिलिपनं साथ दिली.'---कावेरी सांगते, 'तिथे घेतलेल्या कार्यशाळांमुळे तिथं कथ्थक कसं शिकवता वेईल याचा अंदाज आला होता. फक्त सफाईदार जर्मन आणि कथ्थकमधल्या संकल्पना समजून देण्यासाठी कष्ट करावे लागले.'आता तिथे तिचे पंधरा विद्यार्थी तयार झाले आहेत. पण एवढ्यावर तिचे समाधान होणार नाही.
 
तिला कथ्थकचा युरोपात प्रसार करायचा आहे. त्या दृष्टीने तिचे प्रयत्न चालू पुढे वाचा
मनोरंजन व कला > कथ्थक नृत्य,

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!