logo

Search Here

कोल्हापूरचा यशस्वी उद्योजक आनंद देशपांडे

कोल्हापूर! कलानगरी तसेच उद्योजकांची नगरी! मे २०११.-कोरिया.व्हेंडर्स मीटसाठी गेलेल्या कोल्हापूरच्या साउंड कास्टिंग्ज प्रा.लि. चे मॅनेजिंगडिरेक्टर श्री आनंद देशपांडे यांनी कंपनीच्या वतीने महिंद्रा अँड महिंद्रा कडूनउत्कृष्ट पुरवठादार (बेस्ट सप्लायर इन कास्टिंग्ज कॅटॅगरी) हे पारितोषिकस्वीकारले.

कोल्हापूर! कलानगरी तसेच उद्योजकांची नगरी! मे २०११.-कोरिया.व्हेंडर्स मीटसाठी गेलेल्या कोल्हापूरच्या साउंड कास्टिंग्ज प्रा.लि. चे मॅनेजिंगडिरेक्टर श्री आनंद देशपांडे यांनी कंपनीच्या वतीने महिंद्रा अँड महिंद्रा कडूनउत्कृष्ट पुरवठादार (बेस्ट सप्लायर इन कास्टिंग्ज कॅटॅगरी) हे पारितोषिकस्वीकारले.

गेल्या पाच सात वर्षातलेहे कंपनीचे दहावे/अकरावे कस्टमर अवॉर्ड असेल. बेस्ट परफॉर्मन्स इन क्वालिटी (महिंद्राअँड महिंद्रा), बेस्ट सप्लायर इन कास्टिंग अँड फोर्जिंग (किर्लोस्कर ऑइल इंजिन्स),बेस्ट परफॉर्मन्स इन कास्टिंग्ज कॅटॅगरी (ब्रेक्स इंडियाकडून सलग चार वर्षे), तरअशोक लेलॅंडकडून गोल्डन अवॉर्ड. जागतिक दर्जाचे उत्पादन करणारी साउंड कास्टिंग्जअशा पारितोषिकांची मानकरी न ठरली तरच नवल!

१९८८ साली आनंद यांच्या वडिलांनी, श्री. विलास देशपांडे यांनीआपल्या दोन सहकाऱ्यांसह शिरोली येथे ही फौंड्री सुरू केली व नावारूपाला आणली.

आनंद यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यानंतरआय.आय.टी. मुंबई मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन तेपुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग (मॅन्युफॅक्चरिंग) मधेएम.एस. करून ते एका अमेरिकन कंपनीत प्रोसेस इंजिनिअर म्हणून काम करू लागले.त्याचवेळी ऑपरेशन्स मॅनेजमेंटमधे त्यांनी एम.बी.ए.ही केलं. यानंतर डेट्रॉइट येथे मॅस्कोटेकया कंपनीत दोन वर्षे इंजिनिअरिंग/मॅनेजमेंट या क्षेत्रात काम केलं. ज्ञान आणिअनुभवाची एवढी शिदोरी गाठीशी बांधून त्यांनी मायदेशीपरतायचा निर्णय घेतला. या निर्णयात त्यांच्या आर्किटेक्ट पत्नीचा, अर्चनाचा,मोलाचा वाटा होता.

१९९९ साली, वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी ते भारतात परतले ववडिलांच्या व्यवसायात सहभागी झाले.साउंड कास्टिंग्जमधे विविध पदांवर यशस्वीरीत्याकाम केल्याने एप्रिल २००९ पासून कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाचे (मॅनेजिंगडिरेक्टर) हे पद ते भूषवित आहेत. कंपनीचे संपूर्ण व्यवस्थापन, म्हणजेच योग्यदर्जाच्या कच्चा मालाची वेळेवर उपलब्धता, उत्पादनक्षमता वाढवणे व त्याचा दर्जा उंचावणे,यंत्रसामग्रीची देखभाल व मानव संसाधन विकास (एच. आर.डी.) या जबाबदाऱ्या तेसांभाळतात. आधुनिक यंत्रसामग्री, उत्पादनाची नवनवीन, आधुनिक तंत्रे, कायझन व सिक्ससिग्मा या प्रणाली राबवणे आणि यासाठी कामगार व इतर सहकाऱ्यांचे वेळोवेळी प्रशिक्षणकार्यक्रम घेणे हे कंपनीच्या प्रगतीला पोषक ठरले. व्यापार व्यवस्थापन (बिझिनेसमॅनेजमेंट), उत्पादन-तंत्रज्ञान (मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी) तसेच नेतृत्व यातत्यांना विशेष रस आहे.

शिस्त, नियमितपणा, परिश्रम हे वडिलांचे गुणआत्मसात केलेल्या आनंद यांनी मग मागे वळून पाहिलेच नाही. २००७ साली त्यांचे धाकटे बंधू श्री. अभिजीत हेही त्यांच्याचप्रमाणेज्ञान व अनुभव घेऊन अमेरिकेहून परतले. तेही या कंपनीच्या व्यवसायात सामील झाले वमार्केटिंग विभाग सांभाळू लागले. कंपनीची घोडदौड सुरू झाली.

२००७-०८ साली कागल येथे कंपनीचा नवीन कारखाना सुरू झाला. २०१०-११साली तेथेच संपूर्णपणे स्वयंचलित असा नवीन प्लांट (हाय प्रेशर मोल्डिंग लाइन) सुरूझाला. त्याच्या उभारणीत आनंद यांचा मोलाचा वाटा आहे. या भागाचे उद्घाटन महिंद्राअँड महिंद्राचे अध्यक्ष डॉ. पवन गोएंका यांच्या हस्ते झाले.

२००० साली कंपनीचा विक्रीचा टर्नओव्हर सहा कोटी होता,तो २०१०-११ साली एकशे त्रेसष्ट कोटींवर गेला. आता हातकणंगले येथे २५ एकरातल्या तिसऱ्या कारखान्याचे स्वप्न साकारहोऊ पाहात आहे. या यशाचे श्रेय आनंद विनम्रपणे आपले वडील, कंपनीतील इतर संचालक, सहकारी वकामगार यांना देतात.


(कागल येथील कारखाना)

कंपनीत कामगार व सहकाऱ्यांबरोबर स्वत: कंपनीचा गणवेष घालून काम करणारे, रोज कारखानासुरू होण्याआधी अर्धा तास स्वत: समक्ष हजर असणारे श्री. आनंद हे मितभाषी, मृदुभाषी,अतिशय साधे असे व्यक्तिमत्व आहे. सुटीचा दिवस ते कुटुंबाबरोबर घालवतात.फिटनेसबाबतही ते तेवढेच जागरूक आहेत.

श्री आनंद यांना व साउंड कास्टिंग्जला असेच उत्तरोत्तर यश लाभो!

 

 

कंपनीची वेबसाइट- www.soundcastings.com

इ-मेल: avd@soundcastings.com

स्त्रोत :- www.globalmarati.com

 

उद्योजक > फौंड्री उद्योजक,

 

एक टिप्पणी द्या

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!